मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात संततधार पाऊस सुरु असून, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील 24 तासांत पुणे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. कोकणातही गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. कोकणात अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर आठ ठिकाणी 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिह्यातील हेदवी येथे सर्वाधिक 245 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा, नगर आणि जळगाव जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांतही कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, मॉन्सून सक्रिय होऊन, राज्यात पाऊस जोर धरणार आहे.
सौजन्य – ॲग्रोवर्ल्ड जळगांव