• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जपान मधील रंगीत भातशेती

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in यशोगाथा
0
जपान मधील रंगीत भातशेती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


‘राईस पॅडी आर्ट फार्मिंग इन जपान’ संकल्पना

जपानने रंगीत भातशेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाताच्या पारंपरिक रंगीत वाणांच्या सहाय्याने भातशेतीत विविध आकर्षक चित्रे (म्युरल्स) रेखाटण्याची कला जपानच्या नागरिकांनी आत्मसात केली आहे. दरवर्षी ते एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित म्युरल्स आपल्या भाताच्या शेतांमध्ये काढतात. ही म्युरल्स पाहण्यासाठी दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यातील पर्यटक जपानमध्ये दाखल होतात. ‘राईस पॅडी आर्ट फार्मिंग इन जपान’ नावाने ही संकल्पना आता जगभरात ओळखली जाऊ लागली आहे.

जपान देशाचे स्थान भौगोलिकदृष्ट्या उत्तर-पूर्व आशियात आहे. हा देश विविध लहान-मोठ्या बेटांचा समूह असून त्यात सुमारे 3 हजार लहान तर 4 मोठ्या बेटांचा समावेश आहे. जपानचा काही भाग पर्वतीय प्रदेशात मोडतो. या प्रदेशात लहान-लहान क्षेत्रात शेती केली जाते. भात हे जपानी शेतीतील प्रमुख पारंपरिक पीक असून, जपानच्या भातशेतीला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहराच्या उत्तरेस सुमारे 600 मैल अंतरावर पर्वतीय प्रदेशात इनाकाडेट हे गाव वसलेले आहे. येथील ग्रामस्थांनी भात लागवडीच्या पारंपरिक पद्धतीचे संवर्धन व्हावे, तसेच गावाचे अर्थकारण सुधारावे या हेतूने पारंपरिकरित्या केल्या जाणार्‍या भातशेतीविषयी दुसर्‍या बाजूने विचार करत त्या दिशेने पाऊल टाकले. जपानमध्ये भाताचे विविध नैसर्गिक वाण असून ते रंगीबेरंगी आहेत. चित्र रेखाटण्यासाठी चित्रकार ज्या पद्धतीने कॅनव्हासवर रंगसंगतीची जुळवाजुळव करतो, त्याच पद्धतीने इनाकाडेटवासीयांनी भाताच्या रंगीत वाणांची रंगसंगतीनुसार लागवड करत भातशेतीत आकर्षक अशी चित्रे (म्युरल्स) काढली. ही कला अल्पावधितच लोकप्रिय ठरली. त्यामुळे पर्वतीय प्रदेशात पर्यटनाच्या संकल्पनेला व्यापक रूप प्राप्त होऊन गावाचे अर्थकारण बळकट झाले. कल्पकता, प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब केल्याने इनाकाडेट येथील नागरिकांना भात लागवडीच्या पारंपरिक पद्धतीचे संवर्धन करण्यासह अर्थकारण सुधारण्यात यश आले. त्यांच्या प्रयत्नांची दखल आज सार्‍या जगाला घ्यावी लागली आहे.
अंगी दुर्दम्य इच्छाशक्ती
कितीही संकटे आली तरी जपानचे नागरिक खचून जात नाहीत. मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ते प्रत्येक संकटावर मात करतात, हा आजवरचा इतिहास असून त्याची प्रचिती सार्‍या जगाला आलेलीच आहे. अमेरिकेने केलेले अणुबॉम्ब हल्ले असो किंवा अनेकदा आलेल्या नैसर्गिक आपत्ती असो, प्रत्येक संकटात जपानकरांनी आपल्या संयमीवृत्तीचे दर्शन घडवत स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे. म्हणूनच जपान सर्वच आघाड्यांवर पुढे असून जगातील प्रगत राष्ट्रांपैकी एक मानले जाते. इनाकाडेट येथील नागरिकांच्या बाबतीतही असेच आहे. पूर्वी या गावाचे संपूर्ण अर्थकारण फक्त शेतीवरच अवलंबून होते. गावात पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जात होती. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने येथील नागरिकांची आर्थिक बाजू कमकुवत होती. ती भक्कम करण्यासाठी काय करता येईल, या विचारात ते होते. गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन जपानमधील प्रसिद्ध न्योलिथिक संकल्पनेवर आधारित मनोरंजन पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. मनोरंजन पार्कच्या माध्यमातून गावाचे आर्थिक सुधारणा करणे, हा त्या मागचा हेतू होता. मात्र, या प्रयत्नात त्यांना अपयश आले. एवढेच नाही तर गावावर सुमारे 106 दशलक्ष डॉलरचे कर्ज झाले. या कर्जाचा आकडा इनाकाडेटच्या वार्षिक बजेटपेक्षा तीन पटीने मोठा होता. या संकटातही गावातील नागरिक डगमगले नाहीत. संपूर्ण गाव कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने आता दुसरा सक्षम पर्याय शोधण्यावाचून गत्यंतर नव्हते.
अशी सूचली कल्पना…
मनोरंजन पार्कच्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर इनाकाडेटच्या नागरिकांकडे पारंपरिक भातशेती करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. याच भातशेतीत काहीतरी वेगळे करावे, असा निर्णय त्यांनी घेतला. परंतु, नेमका मार्ग सापडत नव्हता. दरम्यानच्या काळात गावातील एका व्यक्तीने आपल्या कल्पकतेच्या जोरावर एक भन्नाट पर्याय शोधून काढला. एके दिवशी या व्यक्तीने गावातील प्राथमिक शाळेत एक दृश्य पाहिले. शाळेतील लहान विद्यार्थी पटांगणातील शेतात एका विशिष्ट पद्धतीने भात लागवड करत होते. त्यातून सुंदर कलाकृती तयार होत असल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले. तेथेच त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. आपल्याकडे भाताचे पारंपरिक रंगीत वाण उपलब्ध आहेत, या वाणांची विशिष्ट पद्धतीने लागवड केली तर निरनिराळ्या कलाकृती भाताच्या शेतात साकारता येतील. जगात अशा रितीने भाताची लागवड कुठेही होत नसल्याने पर्यटनाचा एक नवा पर्याय पुढे येऊ शकतो, असे त्या व्यक्तीने गावातील नागरिकांना सांगितले. सर्वांना त्याची संकल्पना आवडली. तेथूनच या अभिनव संकल्पनेवर कामाला सुरवात झाली. यानंतर राईस पॅडी आर्ट फार्मिंग, ही त्यांची संकल्पना जगभरात प्रसिद्धी झाली.
शेतकरी एकत्र आले
जपानमधील इनाकाडेट आणि आओमोरी येथून 1993 मध्ये राईस पॅडी आर्ट फार्मिंग या संकल्पनेला खर्‍या अर्थाने सुरवात झाल्याचे मानले जाते. सुरुवातीच्या काळात इनाकाडेटमधील भातशेती करणारे शेतकरी एकत्र आले. त्यांनी या संकल्पनेची पायाभरणी केली. भात लागवडीच्या पारंपरिक पद्धतीचे संवर्धन करण्यासह आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधणे, शेतीविषयी लोकांच्या मनात तयार झालेली नकारात्मक भावना बदलणे, असा हेतू त्यामागे होता. राईस पॅडी आर्ट फार्मिंगसाठी आधी जांभळा आणि पिवळ्या रंगाचे भाताचे पारंपरिक वाण वापरले जात होते. पुढे अजून वेगळ्या रंगांच्या वाणांचा उपयोग केला जाऊ लागला. पहिल्या वर्षी इनाकाडेट येथील माऊंट इवाकी या प्रसिद्ध पर्वताचे डिझाईन (म्युरल) तयार करण्यात आले. त्या डिझाईनखाली गावाचे नाव टाकण्यात आले होते. पहिलाच प्रयत्न असल्याने हे डिझाईन तयार करताना त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागले. या प्रयत्नात यश आल्याने त्यांचा उत्साह दुणावला. तसेच संपूर्ण जपानमध्ये त्याची चर्चा झाली. भातशेतीतील कलाकृतीच्या विशिष्टतेकडे जपानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले. पुढे जगभरातील प्रसारमाध्यमांनी जपानच्या भातशेतीतील कलाकृतीची दखल घेतली.
‘राईस पॅडी आर्ट’ संकल्पना
इनाकाडेट येथील शेतकर्‍यांच्या एका गटाने रंगीत भातशेतीला नवा आयाम दिला आहे. या शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे असलेल्या भाताच्या पारंपरिक रंगीत वाणांचा वापर करून भातशेतीत आकर्षक म्युरल्स साकारण्याची कला आत्मसात केली आहे. दरवर्षी ते एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित म्युरल्स भातशेतीत काढतात. ही कला राईस पॅडी आर्ट म्हणून नावारूपास आली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीला हे शेतकरी एकत्र येतात. चालू हंगामात कोणत्या संकल्पनेवर म्युरल्स तयार करायचे? यावर ते चर्चा करतात. सर्वानुमते एक संकल्पना (थीम) निश्चित केली जाते. त्यानंतर संगणकावर त्या थीमचे वेगवेगळे डिझाईन तयार केले जातात. त्या डिझाईनच्या रंगसंगतीनुसार मे महिन्यात भाताच्या रंगीत वाणांची लागवड केली जाते. या रंगीत वाणांमध्ये सुगारू रोमन (हिरवा), युकियाओबी (पांढरा), बेनिओबी (लाल), मुरसाकीन (गर्द जांभळा), किन (पिवळा), कोशीहिकारी (पांढरा), ससानीशिकी (फिक्कट गुलाबी), हिनोहिकारी (बदामी) या वाणांचा समावेश आहे. शेकडो शेतकरी लागवड प्रक्रियेत सहभागी होतात. दरवर्षी ते काहीतरी नवे तंत्र शिकतात. त्याआधारे गेल्या काळात झालेल्या चुका टाळून उत्तम कलाकृती साकारण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मे महिन्यात लागवड झाल्यावर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यादरम्यान भाताच्या शेतांमध्ये आकर्षक म्युरल्स नजरेस पडतात. तत्पूर्वी जसजसे भाताचे पीक वाढते तसतसे म्युरल्स आकर्षक दिसू लागतात. साधारणपणे, जुलै महिन्याच्या अखेरपासूनच पर्यटकांची हे म्युरल्स पाहण्यासाठी गर्दी होऊ लागते. इनाकाडेट येथून अस्तित्त्वात आलेली ही कला आता जपानमधील तोहोकू, सॅनदाई, इव्हेट, मियागी, अकिता, आओमोरी, यामागता, फुकुशिमापर्यंत विस्तारली आहे. परंतु, अजूनही इनाकाडेटसारखी सुबकता त्यात नाही, हे मात्र खरे.
पर्यटनाला मिळाली चालना
राईस पॅडी आर्ट फार्मिंगच्या माध्यमातून जपानच्या इनाकाडेट, आओमोरी, फुकुशिमा, तोहोकू यासारख्या पर्वतीय प्रदेशात पर्यटनाला चालना मिळाली. राईस पॅडी आर्ट फार्मिंग पाहण्यासाठी दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने पर्यटक याठिकाणी दाखल होत असल्याने रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण झाल्यात. त्यातून या प्रदेशाचे अर्थकारण सुधारण्यास हातभार लागला. इनाकाडेट येथील नागरिकांच्या माहितीनुसार, दरवर्षी त्यांना राईस पॅडी आर्ट फार्मिंगची देखभाल, संरक्षण या बाबींसाठी सुमारे 35 हजार डॉलर्स एवढा खर्च येतो. तर ही कलाकृती पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांकडून देण्यात येणार्‍या वर्गणीच्या माध्यमातून त्यांना या खर्चाच्या दुप्पट म्हणजेच, सुमारे 70 हजार डॉलर्स एवढे उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे, पर्यटकांकडून कलाकृती पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. पर्यटक जी देणगी देतील, त्याचा उत्पन्नाच्या आकडेवारीत समावेश आहे.
ऐतिहासिक कलाकृतींचे म्युरल्स
इनाकाडेट व आओमोरी येथील नागरिकांनी आतापर्यंत अनेक ऐतिहासिक कलाकृतींचे म्युरल्स साकारले आहेत. त्यात जगप्रसिद्ध कलाकृती म्हणून ओळखली जाणारी मोनालिसाची प्रतिकृती, जपानमधील मर्लिन मोनेरो, सुझुकी यासारखे योद्धे, जपानच्या पारंपरिक चित्र लिपीतील अक्षरे, जपानमधील ऐतिहासिक प्रतिमा व प्रतिकृती, महत्त्वाच्या राजकीय व्यक्ती, चित्रपट अभिनेते, संगीतकार, लेखक यांच्या म्युरल्सचा समावेश आहे. आतापर्यंत साकारलेल्या म्युरल्सपैकी काही म्युरल्स अजूनही चर्चेत आहेत. त्यात लिओनार्डो दा विंची व मोनालिसा (2003), शिको मुनाकारा (2004), शराकू (2005), तावाराया सोतात्सू (2006), होकूसाई (2007), इबिसू (2008), सेंगोकू (2009), कानो होगाई (2012), जेईसा व मार्लिन मोनरुई (2015), शीन गॉडजिला (2016), यमाता नो ओरोची (2017) यांचा समावेश आहे.

कॅनव्हास नव्हे… ही तर भातशेती!
भाताच्या पारंपरिक रंगीत वाणांच्या लागवडीतून साकारलेले म्युरल्स इतके अप्रतिम असतात की ते पाहिल्यावर पर्यटकांना पेंटिंगचा कॅनव्हास आहे की, भातशेती आहे, हे ओळखता येत नाही. भातशेतीत साकारलेले म्युरल्स पाहून शेताला रंग दिला आहे, असा भास होतो. परंतु, प्रत्येक म्युरल्स हे भाताच्या पारंपरिक रंगीत वाणांद्वारेच तयार केलेले असते. ते रंग नैसर्गिक असतात. म्युरल्स पाहण्यासाठी भातशेताच्या बांधावर उंच असणारे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. या टॉवर्सवर चढून पर्यटक म्युरल्स पाहण्याचा आनंद घेतात. शिवाय म्युरल्सचे फोटो, सेल्फीही काढतात. म्युरल्स आकर्षक आणि संगणकावर तयार केलेल्या डिझाईनसारखे तंतोतंत साकारले जावेत, यासाठी भाताच्या रंगीत वाणांची लागवड अतिशय चाणाक्षपणे करावी लागते. शिवाय लागवड ते म्युरल्स साकारण्याच्या कालावधीपर्यंत प्रत्येक रोपाची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागते. तेव्हाच सप्टेंबर महिन्यात आकर्षक म्युरल्स अस्तित्त्वात येतात, असेही इनाकाडेटवासीयांनी सांगितले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आओमोरीइनाकाडेटजपानराईस पॅडी आर्ट फार्मिंग
Previous Post

पपई रोपांना बनावटीचा विळखा

Next Post

जमशेदजी टाटांनी भारतात आणली स्ट्रॉबेरी

Next Post
जमशेदजी टाटांनी भारतात आणली स्ट्रॉबेरी

जमशेदजी टाटांनी भारतात आणली स्ट्रॉबेरी

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish