हवामान अंदाज

महाराष्ट्राच्या आकाशावर पावसाचे ढग! ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) माघारी गेला असला तरी ऑक्टोबर हिटचा तडाखा कमी करणारा पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात तुरळक पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.


📞 Call Now

📞 Call Now

भारतीय हवामान विभाग (IMD)ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काल 38 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे गेल्या 11 वर्षातील दुसरे सर्वाधिक ऑक्टोबर तापमान आहे. आयएमडीने मुंबई आणि ठाण्यासाठी 14 ते 16 ऑक्टोबरसाठी गरम आणि दमट हवामानाचा (‘हीट वेव्ह’)चा यलो अलर्ट दिला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, आठवड्याच्या शेवटी दक्षिण कोकणात वादळी पावसाची शक्यता असल्याने तापमानात घट होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो. अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात 14-19 ऑक्टोबर, कोकण-गोवा मध्ये 15-19 ऑक्टोबर आणि मराठवाड्यात 16-19 ऑक्टोबर दरम्यान तुरळक पावसाची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांत पाऊस?
हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार आजपासून पुढील 5-6 दिवस म्हणजे 14 ते 19 ऑक्टोबर दरम्यान पुढील भागात पावसाची शक्यता आहे.

– कोकण: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

– पश्चिम महाराष्ट्र: पुणे (घाटमाथा), सातारा, कोल्हापूर, सांगली

– मराठवाडा: बीड, जालना

या पट्ट्यात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरींची शक्यता आहे.

सध्या पाऊस सर्वदूर नसेल, शेजारी-शेजारीच्या भागातही हवामानात फरक जाणवू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी जिल्हानिहाय हवामान बुलेटिनवर लक्ष ठेवावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)


📞 Call Now

📞 Call Now

 

ईशान्य मोसमी पावसाचे आगमन

• नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) माघार घेतल्यानंतर, आता बंगालच्या उपसागरातून, 15 ऑक्टोबरच्या आसपास दक्षिणेकडून ईशान्य मोसमी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. मन्नारच्या आखाताजवळील चक्रीय वाऱ्यांच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि लगतच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. चेन्नई आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये 14 ते 21 ऑक्टोबर दरम्यान दीर्घकाळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी पावसाचा जोर वाढू शकतो, तसेच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचीही शक्यता आहे. ईशान्य मोसमी वाऱ्यांची स्थिती अधिक मजबूत होत असल्याने तामिळनाडूच्या किनारपट्टी आणि अंतर्गत भागातही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत पावसाच्या सरी अधिक वारंवार आणि तीव्र होऊ शकतात, तसेच मेघगर्जनेसह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button