इतरहॅपनिंग

जागतिक श्रीमंतांच्या यादीत शेती, अन्न व कृषी उद्योजकांचे दिग्गज!

मुंबई: भारतातून हटसन ॲग्रो आणि हल्दीराम उद्योगाने पटकावले स्थान

जागतिक श्रीमंतांच्या फोर्ब्स आणि ब्लूमबर्ग यादीत तंत्रज्ञान क्षेत्राचा वरचष्मा असला, तरी शेती, कृषी-तंत्रज्ञान, पशुपालन आणि अन्नप्रक्रिया या क्षेत्रांतील अनेक दिग्गज उद्योगपती आणि कुटुंबे जागतिक पातळीवर अब्जाधीशांच्या यादीत मानाचे स्थान टिकवून आहेत.


📞 Call Now

📞 Call Now

जागतिक स्तरावर या क्षेत्राशी संबंधित प्रमुख धनकुबेर आणि कंपन्यांची माहिती इंटरेस्टिंग आहे. या जागतिक श्रीमंतांच्या यादीत, कृषी व पूरक उद्योग क्षेत्रातून फेरेरो चॉकलेट्स आणि ‘स्वाइन फार्मिंग’वाले चीनचे किन यिंगलिन आघाडीवर आहेत. भारतातून हटसन ॲग्रो आणि हल्दीराम उद्योगाने या यादीत स्थान पटकावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AGROWORLD (@e_agroworld)

थेट शेती, बियाणे आणि पशुपालन

किन यिंगलिन आणि कुटुंब (मुयुआन फूड्स, चीन):
जगातील सर्वांत श्रीमंत शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘स्वाइन फार्मिंग’ (डुक्कर पालन आणि मांस प्रक्रिया) क्षेत्रात मुयुआन फूड्स ही जगातील सर्वांत मोठी कंपनी असून, त्यांची संपत्ती अनेक अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. अंदाजित संपत्ती (15 अब्ज डॉलर्स) जागतिक क्रमवारी (135)

हॅरी स्टाइन (स्टाइन सीड्स, अमेरिका):
त्यांना जगातील ‘सर्वांत श्रीमंत बियाणे व्यापारी’ मानले जाते. सोयाबीन आणि मक्याच्या उच्च दर्जाच्या जेनेटिक्स/बियाणे तंत्रज्ञानाचे पेटंट त्यांच्या कंपनीकडे असून, यातून त्यांनी अब्जावधी डॉलर्सची संपत्ती कमावली आहे. अंदाजित संपत्ती (5 अब्ज डॉलर्स) जागतिक क्रमवारी (600)

स्टुअर्ट आणि लिंडा रेसनिक (दी वंडरफुल कंपनी, अमेरिका):
ते अमेरिकेतील सर्वांत मोठे फळबागायतदार आहेत. पिस्ता, बदाम, डाळिंब आणि संत्री यांच्या शेती आणि ब्रँडेड वंडरफुल पिस्ताचिओस, पॉम वंडरफुल विक्रीतून त्यांनी जागतिक श्रीमंतांमध्ये स्थान मिळवले आहे. अंदाजित संपत्ती (10.8 अब्ज डॉलर्स एकत्रित) जागतिक क्रमवारी (800, वैयक्तिक)

ल्यु योंगहाओ आणि कुटुंब (न्यू होप ग्रुप, चीन):
पशुखाद्य, डेअरी आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रातील आशियातील सर्वांत मोठ्या उद्योग समूहांपैकी एक.

जागतिक धान्य व्यापार आणि अ‍ॅग्रो-कमॉडिटीज

कारगिल कुटुंब (अमेरिका):
‘कारगिल’ ही कृषी, अन्न आणि धान्य व्यापारातील जगातील सर्वांत मोठी खाजगी कंपनी आहे. या एकाच कंपनीतून कारगिल आणि मॅकमिलन घराण्यातील तब्बल डझनहून अधिक व्यक्ती जागतिक अब्जाधीशांच्या यादीत वेगवेगळ्या क्रमांकावर आहेत. अंदाजित संपत्ती (प्रत्येकी 4.8 ते 5 अब्ज डॉलर्स) जागतिक क्रमवारी (वैयक्तिक 700 ते 850 दरम्यान). कारगिल (Cargill) हे जगातील असे घराणे आहे, ज्या कुटुंबातील तब्बल 14 सदस्य स्वतंत्रपणे अब्जाधीश आहेत. एकत्रित कुटुंब म्हणून त्यांची एकूण संपत्ती $49 अब्ज डॉलर्सच्या घरात जाते.

धनिन चेरावानोंट आणि बंधू (सीपी ग्रुप, थायलंड):
हा आशियातील सर्वांत मोठा कृषी-उद्योग समूह मानला जातो. पशुखाद्य, पोल्ट्री (कुक्कुटपालन) आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात या कुटुंबाचे जागतिक स्तरावर मोठे साम्राज्य आहे. अंदाजित संपत्ती (13 अब्ज डॉलर्स) जागतिक क्रमवारी (150 वा, थायलंडमध्ये प्रथम)

अन्न आणि कृषी प्रक्रिया

जिओव्हानी फेरेरो (इटली):
कृषी प्रक्रिया आणि कन्फेक्शनरी क्षेत्रातील हे जगातील आघाडीचे अब्जाधीश आहेत. न्युटेला, फेरेरो रोशर आणि किंडर यांसारख्या ब्रँड्ससाठी लागणाऱ्या हेझलनट आणि कोकोच्या जागतिक कृषी साखळीवर यांचे मोठे नियंत्रण आहे. अंदाजित संपत्ती (48.3 अब्ज डॉलर्स) जागतिक क्रमवारी (37)

मार्स कुटुंब (अमेरिका):
अन्न प्रक्रिया, कन्फेक्शनरी आणि पेट फूड क्षेत्रातील दिग्गज घराणे. अंदाजित संपत्ती (प्रत्येकी 38.5 अब्ज डॉलर्स) जागतिक क्रमवारी (34)

इमॅन्युएल बेस्नियर आणि कुटुंब (फ्रान्स):
डेअरी आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी. अंदाजित संपत्ती (24.2 अब्ज डॉलर्स) जागतिक क्रमवारी (75)

भारतीय उद्योग

भारतातही कृषी-प्रक्रिया, अन्न आणि दुग्ध व्यवसायातून अनेक उद्योगपतींनी मोठी भरभारी घेतली आहे –

आर. जी. चंद्रमोगन (हट सन ॲग्रो प्रॉडक्ट): खाजगी डेअरी क्षेत्रातील भारतातील प्रमुख नाव.

अग्रवाल कुटुंब (हल्दीराम): स्नॅक्स आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील अब्जावधी रुपयांचे साम्राज्य.

अदानी विल्मर: खाद्यतेल आणि पॅकेज्ड अन्नधान्य प्रक्रिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी.

Jain Irrigation

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.

 

Related Articles

Back to top button