छत्रपती संभाजी नगर – मध्यप्रदेशातील प्रमुख, नामांकित उच्च शिक्षणसंस्था असलेल्या सेज विद्यापीठाने समाजासाठी केलेल्या आजीवन योगदानाची दखल घेऊन नंदकिशोर कागलीवाल यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे.
दूरदृष्टी असलेले नेतृत्व व उद्योगपती म्हणून सुपरिचित असलेले श्री. कागलीवाल हे नाथ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. या समूहाचा व्यवसाय बियाणे, अन्नप्रक्रिया, कागद व औद्योगिक रसायने या क्षेत्रांत आहे. शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बियाणे उपलब्ध करून देऊन त्यांनी त्यांचे सक्षमीकरण केले आहे.

व्यवसायाबरोबरच त्यांनी शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकास क्षेत्रांतही मोठे योगदान दिले असून विविध संस्था सुरू करून व त्यांना पाठबळ देऊन समाजाची सेवा केली आहे. विद्यापीठाच्या प्रशस्तिपत्रकानुसार ही मानद पदवी त्यांचे राष्ट्रनिर्मिती, नवनिर्मिती, नेतृत्व आणि सेवायात्रेतील प्रेरणादायी योगदान यांचे द्योतक आहे.
अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना श्री. कागलीवाल हे ट्युनिशिया प्रजासत्ताकाचे मानद वाणिज्य दूत तसेच अमेरिकेतील नेब्रास्का राज्याचे वाणिज्य दूत म्हणूनही कार्यरत आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇