मुंबई : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी आता केंद्र सरकारने उठविली आहे. कांदा निर्यातबंदी जरी उठवली असली तरी शेतकऱ्यांना ठराविक टनापर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय मंत्री समितीची बैठक झाली. या बैठकीत कांदा निर्यातीबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या कांदा निर्यात बंदीवर केंद्र सरकारने मर्यादा ठेवली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 3 लाख मेट्रिक टन इतकाच कांदा निर्यात करण्याची परवानगी केंद्र समितीने दिली आहे.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ शहादा | Agroworld Agriculture Exhibition 2024
केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. आणि ही कांदा निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत चालू राहणार असल्याचे सांगितले होते मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे.
3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी
केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी कांदा निर्यातबंदी केली होती. दरम्यान आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. मात्र केंद्रीय समितीने तीन लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा निर्यातीस मान्यता दिली आहे. यासोबतच 50 हजार टन कांदा बांगलादेशमध्ये निर्यातीस मान्यता देखील दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समितीच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा पाहता कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना माहिती दिली होती. यानंतर कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇