नवनवीन आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानासह हाय-टेक शेती शेतकर्यांपर्यंत पोहोचावी, ती त्यांना करता यावी, या हेतूने जैन हिल्स कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हाय-टेक शेती फक्त शिक्षित माणूस किंवा कंपन्याच करु शकतात असे नाही, तर सामान्य शेतकरी देखील करू शकतो. त्यामुळे शेतकर्यांनी पारंपारिक शेतीकडे लक्ष देतांना आधुनिक शेतीकडे देखील कल वाढवावा, असा सल्ला जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी दिला आहे.
जैन हिल्स कृषी महोत्सवाने हजारो शेतकऱ्यांना नवी दिशा दिली अन् त्यांच्यातील आत्मविश्वास जागवला. खरोखरच हाय-टेक शेतीचा हा नवा हुंकार नवी उमेद जागवणारा ठरलं
सुजलाम सुफलाम झालेल्या शहादा येथे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन | Agroworld Expo 2024 |
जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलाल जैन यांनी यांच्या जयंतीनिमित्त जळगाव-पाचोरा महामार्गावरील जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि.10 डिसेंबर 2023 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान तब्बल 43 दिवसांपर्यंत सुरु असलेल्या या महोत्सवाला महाराष्ट्रासह देशभरातून शेतकर्यांनी हजेरी लावून अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज
अजित जैन मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, वातावरणातील बदल आणि खडतर परिस्थितीतून शेती जात आहे किंवा करावी लागत आहे, या गोष्टी लक्षात ठेवता आपल्याला आधुनिक शेतीकडे वळावे लागेल. आधुनिक शेतीकडे वळत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान याची जोड त्याबरोबरच दिली तर शेतीमधून आपण आपले उत्पन्न नक्की वाढवू शकू. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आधुनिक शेतीची कास धरावी लागेल. या शेतीतून आपल्याला नक्कीच शाश्वतता आणि आपले उत्पन्न या दोघांची खात्री मिळू शकेल. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावे. पारंपरिक शेतीकडे लक्ष देताना, त्याकडून थोडे वळण घेऊन आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांनी त्यांचा कल वाढवावा, हा संदेश मला आजच्या दिवशी देणे जास्त संयुक्तिक वाटते.
शेतीकडे उद्योग म्हणून पाहायला हवे
आपण बघतो की, शेतकरी शेती म्हटली की उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनच बघतो. नेमका हा विचार सीमित विचार होतो आणि तो त्याला थांबवतो. आपल्याला जर खरोखरच शेतीत प्रगती करायचे असेल तर व्यावसायिक म्हणून शेतीकडे बघावे लागेल. व्यवसाय म्हणून शेती करावी लागेल. व्यवसाय म्हटले की, आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्या लागतील आणि त्या म्हणजे एक तर माझी इनपुट कॉस्ट काय असते, म्हणजे शेती करण्यासाठी लागणारा जो काही माझा खर्च आहे, तो कसा कमी होईल आणि खर्च कमी होणे आणि उत्पादन कसे मला वाढवून मिळेल, या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल.
व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्पन्नात नक्की वाढॉ
जर आपण शेती व्यावसायिक दृष्टिकोनातून केली, तर आपल्याला ती शाश्वत करता येईल आणि शेतीमध्ये आपल्याला वाढीव उत्पन्न मिळेल. हा व्यावसायिक असा दृष्टिकोन आहे, म्हणून शेती करत असताना तिच्याकडे फक्त उदरनिर्वाहाचे साधन किंवा निव्वळ मी शेती करतोय, असा मर्यादित विचार न ठेवता त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातूनच जर बघितले गेले तर शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे नक्कीच वाढेल.
आपल्याला आधुनिक शेतीची कास धरावी लागेल…
आधुनिक शेतीकडे वळत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान याची जोड त्याबरोबरच दिली तर शेतीमधून आपण आपले उत्पन्न नक्की वाढवू शकू. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आधुनिक शेतीची कास धरावी लागेल. या शेतीतून आपल्याला नक्कीच शाश्वतता आणि आपले उत्पन्न या दोघांची खात्री मिळू शकेल. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावे.