राज्यात अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीकडे सरकारमधील एका मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांसह कृषी व सहकार मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या प्रश्नाचे गांभीर्य सरकार आणि शासकीय यंत्रणेने संवेदनशीलतेने जाणून घ्यावे, असे या मंत्र्यांना वाटते. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश देऊन अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षाही मंत्री महोदयांनी व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद घातली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री, कृषी मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. 27 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसाचा राज्यास मोठा फटका बसला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आग्रह राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहीले आहे.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
चंद्रपूर जिल्ह्यात 27 नोव्हेंबरला सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. काही तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप धानाचे, तूर, कापूस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे खोडकिडा, बुरशीजन्य रोग व विषाणूजन्य रोगामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे आणखी नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.
मुनगंटीवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या जिल्ह्यातील नुकसानाची तातडीने माहिती घेतली. पालकमंत्री या नात्याने त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे त्वरित आदेश दिले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश
- पंजाबमधील शेतकऱ्यांचे पेन्शन, हमीभाव, कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन