• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पंतप्रधान कृषी सिंचन योजना (PMKSY) : ऑनलाइन अर्ज कसा कराल?

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 7, 2023
in शासकीय योजना
0
पंतप्रधान कृषी सिंचन योजना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी यंदा, 2023 मध्येच पंतप्रधान कृषी सिंचन योजना (PMKSY) नव्याने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील सिंचनासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत केली जाईल. या योजनेंतर्गत पाणी बचत, कमी श्रम आणि इतर प्रकारच्या कामांसाठी वाचलेला वेळ उपलब्ध होणार आहे.

यापुढे शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांना पाणी देताना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही. तुम्हालाही या योजनेत सामील व्हायचे असल्यास, या पोस्टमध्ये तुम्हाला पीएमएसकेवाय योजनेशी संबंधित माहिती, ऑनलाइन अर्ज याबाबत मराठीमध्ये इथे “ॲग्रोवर्ल्ड”च्या माध्यमातून ही सर्व माहिती मिळेल.

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

पंतप्रधान कृषी सिंचन योजना म्हणजे काय?

शेतात कोणतेही पीक चांगले येण्यासाठी शेताला योग्य पद्धतीने पाणी द्यावे लागते. शेतात पिकांची लागवड करताना जास्त पाणी द्यावे लागते. पिकाला चांगले पाणी न मिळाल्यास पिकाची वाढही नीट होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत ही समस्या दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाणी उपलब्ध करून दिले जाईल.

सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढवणे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासह जलवापर क्षमतेमध्ये वाढ करणे. अचूक सिंचन आणि तुषार व ठिबक सिंचन अशा पाणी वाचवणाऱ्या सिंचन पद्धतींच्या वापरात वाढ करणे, हा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था, निगमित कंपन्या, उत्पादक शेतकरी गटांचे सदस्य आणि इतर मान्यताप्राप्त संस्थांच्या सदस्यांनाही लाभ मिळेल. या पीएमएसकेवाय योजनेसाठी केंद्र सरकारने 50,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

 

‘पीएमएसकेवाय’चे लाभ

• या योजनेंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल आणि त्यांना सिंचनासाठी आवश्यक उपकरणांसाठी सरकार अनुदान देईल.
• शेतीतील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ही सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल.
• या योजनेचा लाभ सर्व शेतजमिनींना मिळणार आहे.
• या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांनाच होणार आहे, ज्यांच्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन आणि जलस्रोत आहेत.

 

योजनेची वैशिष्ट्ये

• पंतप्रधान कृषी सिंचन योजना 2023 मुळे शेतीचा विस्तार होईल, उत्पादनही वाढेल आणि अर्थव्यवस्थाही विकसित होईल.
• योजनेअंतर्गत येणारा खर्च 75% केंद्र सरकार आणि 25% राज्य सरकार उचलेल.
• यामुळे शेतकऱ्यांना ठिबक/स्प्रिंकलरसारख्या सिंचन योजनांचा लाभही मिळणार आहे.
• नवीन उपकरणे वापरल्यास 40-50 टक्के पाण्याची बचत होईल आणि त्यासोबतच कृषी उत्पादनात 35-40 टक्के वाढ होईल आणि उत्पादनाचा दर्जाही सुधारेल.

 

महाराष्ट्रात पंतप्रधान कृषी सिंचन योजना कशी राबविली जाते?

महाराष्ट्रात पंतप्रधान कृषी सिंचन योजना 2015-16 पासून राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनामध्ये आधुनिक पद्धतींचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना प्रति थेंब अधिक पीक हे ब्रीद वाक्य घेऊन राबवली जाते. या योजनेचा लाभ अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्याने दिला जातो.

महाराष्ट्रात कृषी सिंचन योजनेचा लाभ देताना अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अंशदान द्यावे, असा निकष आहे. राज्यातील शेतकऱ्यांना फक्त ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंतच या योजनेचा लाभ घेता येतो. शेतकऱ्याला पूर्व मंजुरी मिळाल्याशिवाय, त्याने अधिकृत विक्रेता आणि उत्तरांकडून सूक्ष्म सिंचन घेऊ नये, मंजुरी मिळाल्यानंतरच त्याने सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावी, अशी राज्य सरकारची अट आहे.

 

Om Gaytri Nursary
Om Gaytri Nursary

 

 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी पात्रता

• योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
• देशातील सर्व विभागातील शेतकरी या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात.
• योजनेंतर्गत बचत गट, ट्रस्ट, सहकारी संस्था, निगमित कंपन्या, उत्पादक शेतकऱ्यांचे गट आणि इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनाही त्याचा लाभ मिळेल.
• जो शेतकरी ती जमीन किमान सात वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतो, त्याला ही पात्रता कंत्राटी शेतीद्वारे मिळू शकते.

 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

1. ओळखीचा पुरावा – आधार कार्ड
2. पत्त्याचा पुरावा – मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
4. जमिनीची उतारा, 7/12, 8 अ व संबंधित कागदपत्रे
5. शेतकरी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असेल तर त्याबद्दलचे प्रमाणपत्र
6. सोसायटी, लोन नील दाखला
7. पूर्वसंमती पत्र
8. वीज बिल
9. मंजुरीनंतर खरेदी केलेल्या संचाचे बिल
10. बँक खाते पासबुक
11. पासपोर्ट साइज फोटो
12. मोबाईल नंबर

 

Wasan Toyota
Wasan Toyota

 

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज असा करा

• योजनेशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट http://pmksy.gov.in/ ची निर्मिती करण्यात आली आहे. या वेबसाइटवर योजनेशी संबंधित सर्व माहिती तपशीलवार स्पष्ट करण्यात आली आहे.
• योजनेसाठी अर्ज करू इच्छिणारे शेतकरी, अर्जदार हे संबंधित राज्य कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊनही माहिती मिळवू शकतात.
• पीएमएसकेवाय’ वेबसाईटवर “Water to every farm” या पर्यायावर क्लिक करा.
• आता तुम्ही येथे दिलेल्या सूचनांचे पालन करून ऑनलाइन अर्ज करू शकता.
• महाराष्ट्रात जर तुम्हाला थेट अर्ज करायचा असेल तर आपले सरकार, महाडीबीटी पोर्टलद्वारे या योजनेसाठी अर्ज करता येतात.
• अधिकृत वेबसाईट : http://www.pmksy.gov.in/

 

सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • देशातील प्रमुख बाजारपेठात आजचे कपाशी बाजारभाव
  • कृषी सल्ला : कापूस पाते व बोंड गळ कशी रोखावी

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

देशातील प्रमुख बाजारपेठात आजचे कपाशी बाजारभाव

Next Post

जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणासाठी पोलिसांचा पहारा

Next Post
जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणा

जगातील आघाडीच्या फळउत्पादक देशात कृषी माल संरक्षणासाठी पोलिसांचा पहारा

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.