मुंबई : यंदा वेळेवर पाऊस होत गेल्याने पिके तगली असून खरीप हंगाम समाधानकारक पार पाडण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या काही भागात, विशेषत: मराठवाड्यात पाणी संकट उभे राहण्याची शक्यता असली तरी उर्वरित राज्यात स्थिती चांगली दिसत आहे. नाशिक विभागातील धरणात चिंब पावसाने आबादानीचे चित्र आहे. नाशिक विभागातील धरणात 77 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे महत्त्वाच्या 7 धरणातील 4 धरणात 100% पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी अत्यंत आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
जलसंपदा विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, 4 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील 2,994 छोट्या, मध्यम व मोठ्या अशा एकूण सर्व धरणात 75.51% पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत हा साठा 90.02% इतका होता. मराठवाड्यातील कमी पावसामुळे मुख्यत: हा फरक दिसत आहे. कोकण विभागात सर्वाधिक 95.22% पाणीसाठा असून तो गेल्यावर्षीपेक्षा 5% अधिक आहे. त्याखालोखाल नागपूर विभागात 91.02% साठा असून हाही गेल्या वर्षीच्या तुलनेत 2% अधिक आहे.
राज्याच्या उर्वरित महसूल विभागातील धरण पाणीसाठा असा (कंसात गेल्यावर्षीचा साठा) –
1. नाशिक – 76.93% (86.90%)
2. अमरावती – 82.15% (94.14%)
3. संभाजीनगर – 40.43% (86.38%)
4. पुणे – 89.56% (82.54%)
राज्यातील महत्त्वाच्या 49 धरणांपैकी 13 धरणातून अजूनही अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भातसा, सूर्या धामणी (ठाणे), इटियाडोह (गोंदिया), गोसीखुर्द (भंडारा), निम्न वर्धा (वर्धा), उर्ध्व वर्धा (अमरावती), दारणा (नाशिक), भंडारदरा (नगर), हतनूर, वाघूर (जळगाव), धोम-बलकवडी (सातारा), घोड व आंद्रा (पुणे) या धरणातून हा विसर्ग सुरू आहे.
नाशिक विभागातील महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठा
1. दारणा (नाशिक) – 100%
2. गंगापूर (नाशिक)- 100%
3. भंडारदरा (नगर) – 100%
4. मुळा (नगर) – 88.79%
5. गिरणा (नाशिक) – 57.03%
6. हतनूर (जळगाव) – 96.78%
7. वाघूर (जळगाव) – 100%
संभाजीनगर विभागातील महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठा
1. जायकवाडी (संभाजीनगर) – 47.66%
2. निम्न दुधना (परभणी) – 28.34%
3. पूर्णा येलदरी (परभणी) – 62.28%
4. माजलगाव (बीड) – 12.28%
5. मांजरा (बीड) – 30.21%
6. उर्ध्व पैनगंगा (नांदेड) – 84.17%
7. तेरणा (धाराशिव) – 25.92%
कोंकण, पुणे, नागपूर व अमरावती विभागातील महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठा
1. भातसा (ठाणे) – 99.81%
2. वैतरणा (नाशिक) – 99.87%
3. पेंच तोतलाडोह (नागपूर) – 100%
4. इटियाडोह (गोंदिया) – 100%
5. निम्न वर्धा (वर्धा) – 100%
6. उर्ध्व वर्धा (अमरावती) – 100%
7. अरुणावती (यवतमाळ) – 100%
8. डिंभे (पुणे) – 100%
9. पानशेत (पुणे) – 100%
10. वरसगाव (पुणे) – 100%
11. खडकवासला (पुणे) – 99.16%
12. पवना (पुणे) – 100%
13. चासकमान (पुणे) – 100%
14. नीरा देवधर (पुणे) – 100%
15. भाटघर (पुणे) – 99.71%
16. उजनी (सोलापूर) – 52.22%
17. वारणा (सांगली) – 100%
18. राधानगरी (कोल्हापूर) – 97.65%
19. कोयना (सातारा) – 89.06%
संभाजीनगर विभागातील धरणात 40 टक्के पाणीसाठा
यंदा राज्यातील धरणात गेल्या वर्षीपेक्षा 15 टक्के कमी पाणीसाठा दिसत असला तरी महत्त्वाच्या मोठ्या धरणातील स्थिती आशादायक आहे. संभाजीनगर विभागात चिंताजनक स्थिती असून तिथे फक्त 40 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील मोठ्या व महत्त्वाच्या धरणात हाऊसफुल्ल बोर्ड लागले असले तरी छोट्या व मध्यम धरण-बंधाऱ्यांत साठवण कमी झाल्याने एकत्रित आकडेवारीत थोडी तूट दिसत आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
- गिरीश महाजन यांच्याकडील तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कायम; बुलढाणा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे