• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यातील पावसाचा जोर आजपासून काही दिवस कमी होणार; येत्या 4-5 दिवसात कोकणात मध्यम सरी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2023
in हवामान अंदाज
0
राज्यातील पावसा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यातील पावसाचा जोर आजपासून काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 4-5 दिवसात कोकणात मध्यम ते हलक्या सरी राहतील, असे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे. GFS मॉडेलनुसार हे अनुमान आज जारी करण्यात आले आहे. कोकणातून वर सरकणारा पाऊस गुजरात किनारपट्टी भागापासून उत्तर भारतात जोरदार बरसण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमध्येही अतिवृष्टीची व काही ठिकाणी ढगफुटीची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानात गेल्या 2 दिवसातील मुसळधार पावसाने अनेक शहरे पाण्यात बुडाली असून पावसाने 60 हून अधिक बळी घेतले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – एकनाथ शिंदे यांचे निर्देश
https://eagroworld.in/raj-thackeray-met-the-chief-minister-on-the-issue-of-farmers/

हवामान व पावसाच्या GFS मॉडेलनुसार, आजपासून येत्या 4-5 दिवसात कोकणात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. काही दिवस कोकण किनारपट्टी भागात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज “आयएमडी”ने जाहीर केला आहे.

 

आयएमडीच्या GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार, छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे पावसाचा जोर उत्तर भारतात वाढत जाईल.

उत्तर, मध्य महाराष्ट्रात फारशा पावसाची चिन्हे नाहीत

IMDने 8 जुलै रोजी जाहीर केलेल्या GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार, पुढील 24 तासांत कोकण, पूर्व विदर्भाच्या काही भागात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे . मुंबईत पावसाची तीव्रता कमी असू शकते. राज्यातील अंतर्गत भागात हलका तर तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस राहील. गुजरातच्या काही भागात अतिशय मुसळधार पावसाचा जोर राहू शकेल. “आयएमडी”च्या GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार, छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे पावसाचा जोर उत्तर भारतात वाढत जाईल. महाराष्ट्रात आज कोकण किनारपट्टी भागात हलका-मध्यम तर विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे खान्देशसह उत्तर महाराष्ट्र, मध्य व पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात फारसा पाऊस राहणार नाही. या भागातील तुरळक काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

 

 

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची कोणतीही घोषणा नाही – राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
https://eagroworld.in/there-is-no-announcement-of-local-body-elections/

देशभरातील पावसाच्या ढगांची स्थिती दर्शविणारे आजचे नवीनतम उपग्रह छायाचित्रानुसार, दक्षिण कोकण गोवा, कर्नाटक ते केरळ किनार्‍यापर्यंत तीव्र ढग दिसत आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत या भागात पावसाची शक्यता आहे. गुजरातचा किनारा आणि विदर्भात तसेच राज्यातील घाट भागात पुढील 2-3 तासात मध्यम ते जोरदार सरी कोसळू शकतात. पूर्व विदर्भातील काही भागांत पावसाचा जास्त जोर राहील, असे पुणे वेधशाळेचे के.एस.होसाळीकर यांनी म्हटले आहे. तरुण हवामान अभ्यासक नटराजन गणेशन यांनी पश्चिमेतील अडथळ्यांमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) मान्सून मध्य अक्षांशाकडे घुसखोरी झालेली दिसतेय. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून मोठ्या प्रमाणावर कमकुवत होण्याची चिन्हे दिसत आहेत. परिणामी, उत्तर-पश्चिम भारत आणि गुजरातमध्ये पुढील तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो.

रडार छायाचित्रानुसार, आज महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता असलेले क्षेत्र.

खान्देश, मराठवाडा विभागातील गेल्या 24 तासातील पाऊस

8 जुलै रोजी संपलेल्या 24 तासात नोंद झालेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) –

नंदुरबार जिल्हा : नवापूर – 25, तळोदा – 3, धडगाव अक्राणी – 2.

धुळे जिल्हा : शिंदखेडा – 38, शिरपूर – 23, धुळे – 13, दोंडाईचा – 4, साक्री – 2.

जळगाव जिल्हा : धरणगाव – 19, चोपडा – 10, जामनेर – 8, मुक्ताईनगर – 5, रावेर – 5, यावल – 5, एरंडोल – 2 भुसावळ – 1.6.

नाशिक जिल्हा : इगतपुरी – 103, त्र्यंबकेश्वर – 29, पेठ – 17, येवला – 12, पिंपळगाव – 3.8, सिन्नर – 3.2, चांदवड – 3, कळवण – 2, निफाड – 1.

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्हा : सोयगाव – 27, गंगापूर – 20, खुलताबाद – 20, वैजापूर – 9, सिल्लोड – 5, फुलंब्री – 3, कन्नड – 2, पैठण – 0.

परभणी जिल्हा : पूर्णा – 24.2, जिंतूर – 17, पाथरी – 16, मानवत – 12, सेलू – 6.6, पालम – 5, गंगाखेड – 2.

हिंगोली जिल्हा : कळमनुरी – 24, वसमत – 20, हिंगोली – 10.

नांदेड जिल्हा : हदगाव – 78, माहूर – 39, मुदखेड – 38, भोकर – 37, अर्धापूर – 26.5, कंधार / धर्माबाद / लोहा – 2.

रडार छायाचित्रानुसार, महाराष्ट्रातील आजची पावसाची स्थिती (लाल, पिवळ्या क्षेत्रात मुसळधार तर हिरव्या व निळ्या क्षेत्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात तुरळक ढग दिसत आहेत. या क्षेत्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस राहू शकेल.)

राज्याच्या उर्वरित विभागातील 50 मिमिपेक्षा जास्त पाऊस

पुणे जिल्हा : लवासा – 99.5, लोणावळा – 93.5.
(उर्वरित संपूर्ण पुणे जिल्ह्यात अतिशय हलका पाऊस झाला.)

पालघर जिल्हा : जव्हार – 88, विक्रमगड – 86, वाडा – 77.

ठाणे जिल्हा : अंबरनाथ – 110, शहापूर – 81, मुरबाड – 78, उल्हासनगर – 76, ठाणे – 74, कल्याण – 64.

रायगड जिल्हा : माथेरान – 158.4, श्रीवर्धन – 132, पेण – 126, सुधागड – 123, पोलादपूर – 112, महाड – 102, माणगाव – 98, म्हसळा – 97, तळा – 84, कर्जत – 83.4, खालापूर – 80, पनवेल – 79.2, रोहा – 64, उरण – 50.

रत्नागिरी जिल्हा : दापोली – 189, मंडणगड – 158, राजापूर – 140, वाकवली – 128, खेड – 102, देवरुख – 89, लांजा – 84, चिपळूण – 73.

सिंधुदुर्ग जिल्हा : दोडामार्ग – 107, कुडाळ – 83, मुळदे ॲग्री – 80, वैभववाडी – 70, कणकवली – 66, सावंतवाडी – 60, रामेश्वर ॲग्री – 55.8.

कोल्हापूर जिल्हा : गगनबावडा – 90, शाहूवाडी – 52.

Ajeet Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • पुरेसा पाऊस येईना, पेरणी होईना; राज्यात फक्त 14% पेरणी !
  • राज्यातील सात जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट : Global Warming चा फटका

Share this:

  • Facebook
  • X
Tags: GFS मॉडेलआयएमडीखान्देशपाऊसमान्सून
Previous Post

पुरेसा पाऊस येईना, पेरणी होईना; राज्यात फक्त 14% पेरणी !

Next Post

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Next Post
शेतकऱ्यांच्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.