मुंबई : तुम्हाला जर काही स्वत:चा उद्योग करावासा वाटत असेल तर फक्त 10,000 रुपयात केळी पावडरचा व्यवसाय सुरू करा. ही एक भन्नाट Agri Business Idea आहे, ज्यातून तुम्ही सहज बंपर कमाई करू शकाल. उत्तर महाराष्ट्रात कच्ची सामग्री असलेला केळीचा माल तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे केळी पट्ट्यात हा घरबसल्या अतिशय चांगला कृषी उद्योग आणि जोड धंदा ठरू शकेल.
आज आम्ही तुम्हाला ही एक सुपरहिट बिझनेस आयडिया विस्ताराने सांगणार आहोत. तुम्ही हे सुरू करताच चांगली कमाई सुरू होईल. शिवाय, यात सुरुवातीची गुंतवणूक, खर्चही खूप तुलनेने खूपच कमी आहे. शेतकरी बांधवांनी केळीची लागवड केल्यास किंवा केलेली असल्यास त्यासोबत केळी पावडरचा व्यवसायही सहज सुरू करता येईल, त्यामुळे तुमची कमाई वाढेल. केळी पावडरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला फक्त 10,000 ते 15,000 रुपये लागतील.
ड्रायर, मिक्सर मशीनची आवश्यकता
पावडर बनवण्यासाठी दोन मशीन लागतात. एक केळी मिक्सिंग मशीन आणि आणि दुसरे ड्रायर मशीन. कोणत्याही ई कॉमर्स वेबसाइटवरून तुम्ही ही मशीन्स ऑनलाइन खरेदी करू शकता. आपण आपल्या जवळच्या बाजारातून ही मशीन ऑफलाइन देखील खरेदी करू शकता. आपणास या संदर्भात नेमकी माहिती हवी असल्यास व्यवसाय करू पाहणारे इच्छुक थेट आमच्याशी व्हॉटस् अप द्वारे संपर्क साधू शकतात. आम्ही त्यांना या मशीन खरेदीबाबत संपूर्ण खात्रीशीर मार्गदर्शन करू.
पहिल्या पावसानंतर वखरणी करताना शेतकरी
https://youtube.com/shorts/tk0kZiZ551o?feature=share
केळीची पावडर कशी बनवायची?
प्रथम हिरवी केळी सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने स्वच्छ करा. नंतर हाताने सोलून साल काढून घ्या. लगेच ती सोललेले केळी सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवून ठेवा. यानंतर या केळींचे छोटे-छोटे तुकडे (काप) करा. हे केळीचे तुकडे नंतर 60 डिग्री सेल्सिअस तापमानावर 24 तास गरम हवेच्या ओव्हनमध्ये वाळवा, जेणेकरून केळीचे तुकडे पूर्णपणे कोरडे होतील. यानंतर हे वाळलेले तुकडे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. पावडर होईपर्यंत बारीक करा.
केळीच्या पावडरपासून कमाई
केळीपासून तयार होणारी पावडर फिकट पिवळ्या रंगाची असते. तयार पावडर पॉलिथिनच्या पिशव्या किंवा काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक करता येते. केळी पावडर बनवण्याचा खर्च खूपच कमी आहे. बाजारात ही पावडर 800 ते 1,000 रुपये किलो दराने विकली जाते. म्हणजेच दररोज 5 किलो केळी पावडर बनवल्यास 3,500 ते 4,500 रुपये उत्पन्न तुम्हाला मिळू शकेल. हीच केळी पावडर ब्युटी प्रॉडक्टस कंपन्या ब्युटी फेस पॅकमध्ये किंवा मेक अप किटमध्ये 50 ग्रॅमसाठी तब्बल 500 रुपये म्हणजेच 10 हजार रुपये किलो किंवा त्याहून जास्त भावात विकतात. लॅक्मे, मार्स, रेव्होल्यूशन वैगेरे सौंदर्य प्रसाधन बनविणाऱ्या कंपन्या हीच पावडर विविध उत्पादनातून विकताना दहा ग्रॅमसाठी सरासरी तब्बल 300 रुपये आकारतात.
केळी पावडरचे फायदे
त्वचेसाठी शुष्कता मिटविण्यात, अतिरिक्त कोरडेपणा शोषून घेण्यात फेस पावडर म्हणून किंवा मेकअपसाठी ही पावडर उपयुक्त ठरते. याशिवाय, केळी पावडर रक्तदाब (बीपी) नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. केळी पावडर लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. केळी पावडर पचनशक्ती मजबूत करण्यासाठीही उपयुक्त आहे. या पावडरमध्ये प्रथिने (प्रोटीन्स), लोह (आयर्न), पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन) B1, B2, B3, B 6 आणि C मुबलक प्रमाणात असतात. उच्च फायबरयुक्त असल्याने रक्त-शर्करा पातळी संतुलित राखते. आतड्या स्वच्छ ठेवते. अतिसारापासून (डायरिया) केळी पावडर आराम देते.