मुंबई : E -Peek Pahani… राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई-पीक पाहणीची अट राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्पुरती रद्द केली आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, तांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले होते. यामुळेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागतील. मात्र, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हीच सरकारची भूमिका असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार – विखे पाटील
यापूर्वी केंद्र सरकारने पीक विमा कंपनी सुरु करुन योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी केली होती. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र नंतर यामध्ये खासगी कंपन्याचा शिरकाव कसा झाला याची चौकशी आपण करणार आहे. शिवाय शेतकऱ्यांची आणि सरकारची होणारी लूट आणि फसवणूक थांबवण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. तसेच शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी ई-पीक पाहणी (E -Peek Pahani) ॲपद्वारे पीक पेरा नोंदवावा लागतो. ॲपद्वारे पीक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होते. ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वत:हून करायची आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇