मुंबई : राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांची अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Dr. Sharad Gadakh VC of PDKV
शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. गडाख यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ. गडाख यांची नियुक्ती पाच वर्षांकरिता किंवा ते वयाची 65 वर्ष पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर येईल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.
डॉ. गडाख यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1961 रोजी झाला. त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून वनस्पती शरीर विज्ञान विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी संपल्यानंतर कुलगुरुपद रिक्त झाले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक प्रो. एस. अय्यप्पन यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह व कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. गडाख यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ; असा घ्या PMEGP योजनेचा लाभ
- नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
Comments 1