• Home
    • आमच्याविषयी
Agro World
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
Agro World
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

लम्‍पीतून 3,291 जनावरे रोगमुक्त; आज 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती

लम्पी रोग नियंत्रणासाठी पशुसंवर्धन यंत्रणेसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी; मंत्रालयात समन्वय कक्ष सुरु, संपर्कासाठी 022-22845132 क्र. जारी; मुंबईत लम्‍पी रोगाचे नियंत्रण, प्रतिबंध व निर्मूलन करण्यासाठी प्राणी प्रदर्शने, बाजार, यात्रा व जनावरांच्या ने-आण करण्यास पूर्णतः बंदी घोषित

Team Agro World by Team Agro World
September 24, 2022
in पशुसंवर्धन
2
लंपी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : राज्यातील पशुसंवर्धन विभागाला दिलेल्या सूचना, मनुष्यबळ वाढ, पुरेशा लसमात्रा, पशुधनावर करण्यात आलेले उपचार आणि निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील लम्‍पी आजार आटोक्यात येत आहे. 3 हजार 291 जनावरे औषधोपचारामुळे ठीक झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री. सिंह म्हणाले, राज्यात दि. 19 सप्टेंबर 2022 अखेर जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27 जिल्ह्यांमधील 1108 गावांमध्ये 9 हजार 375 जनावरांमध्ये लम्‍पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरितांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 49.83 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिघातील 1108 गावातील 16.45 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. मंगळवार, दि. 20 सप्टेंबर रोजी 25 लाख लसमात्रा प्राप्त होणार आहेत.


बाधित जिल्ह्यातील जळगांव 94, अहमदनगर 30, धुळे 9, अकोला 46, पुणे 22, लातूर 3, औरंगाबाद 5, सातारा 12, बुलडाणा 13, अमरावती 17, कोल्हापूर 9, सांगली 2, वाशिम १, जालना १, ठाणे 3,नागपूर 3 व रायगड 1 अशा 271 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo

मुंबईत प्राणी प्रदर्शने, बाजार, यात्रा व जनावरांची ने – आण करण्यास पूर्णतः बंदी घोषित

राज्यासह देशात अनेक ठिकाणी लम्‍पी आजार जनावरांमध्ये वेगाने फैलावत असल्याने मुंबईतही सावधगिरी बाळगली जात आहे. मुंबईत बैलगाड्या, घोडागाडी तसेच अनेक ठिकाणी गायीदेखील पाळल्या जातात. हे लक्षात घेता मुंबईत लम्‍पीचा फैलाव टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रदर्शन, जत्रा तसेच गर्दीच्या ठिकाणी प्राण्यांची ने – आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निर्देशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार, असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


मुंबईत अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आहेत. मंदिरांबाहेर गायी बांधल्या जातात. मिरवणुकांमध्ये बैलगाड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी जनावरांना नेण्यास या आदेशाद्वारे मनाई करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये या सूचना प्रसिद्ध करण्याबाबत सांगण्यात आले असून परिसरात जनावरे पाळणाऱ्यांपर्यंत संदेशही दिले जात आहेत. 13 ऑक्टोबरपर्यंत पशुपालकांनी या नियमांचे पालन करावे, असे या आदेशात नमूद आहे. तसेच लम्‍पी करीता मुंबई हे ‘नियंत्रित क्षेत्र’ घोषित करण्यात आले असून मुंबईत प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही मुंबई पोलीसांनी दिला आहे.

Shree Sai Ram Plastic And Irrigation

समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक 022-22845132

श्री.सिंह म्हणाले, लम्‍पी नियंत्रणासाठी लसीकरण करणे, बाधित पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्या, अडचणींचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी, पशुपालकांना संपर्क साधता यावा, आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये रुम नं. 520, 5 वा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे. पशुपालक समन्वय कक्षातील 022-22845132 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतील.


लम्‍पी वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरु केल्यास निश्चित बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरुन न जाता मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.1800-2330-418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सिंह यांनी केले आहे.

Poorva

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई
  • काय आहे जनावरांतील ‘लम्पी स्किन’ रोग ; जाणून घ्या.. उपचार, लसीकरणासंबंधीत माहिती


Tags: जनावरांचे लसीकरणजनावरे रोगमुक्तपशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहलम्पी रोग
Previous Post

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई

Next Post

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

Next Post
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. शरद गडाख

Comments 2

  1. Pingback: लम्पी नियंत्रणासाठी जनावरांच्या सरसकट लसीकरणास शासनाची मान्यता - Agro World
  2. Pingback: वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात ; राधाकृष्ण विखे

ताज्या बातम्या

केळी

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

by Team Agro World
March 25, 2023
0

Weather Alert

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

by Team Agro World
March 24, 2023
0

सोयाबीन

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

by Team Agro World
March 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

by Team Agro World
March 23, 2023
0

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

by Team Agro World
March 22, 2023
0

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

by Team Agro World
March 22, 2023
0

कांद्याच्या दरात

वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या दरात असा बदल ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

by Team Agro World
March 21, 2023
0

दुग्धव्यवसाय

ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवार (25 मार्चला) एक दिवशीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा

by Team Agro World
March 20, 2023
0

ॲग्रोवर्ल्ड

आता ॲग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतीची नमो बायोप्लांटची केळीची टिशू कल्चर रोपे

by Team Agro World
March 20, 2023
0

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

by Team Agro World
March 19, 2023
0

तांत्रिक

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

by Team Agro World
March 22, 2023
0

जरबेरा फुल

हरितगृहातील जरबेरा फुल पिकाची लागवड व खत व्यवस्थापन

by Team Agro World
March 1, 2023
0

Bharat- Chile

Bharat- Chile : कृषी सहकार्यासाठी भारत-चिली देशांत सामंजस्य करार?

by Team Agro World
February 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : 300 गाठींवर स्थिरावणार यंदाचे उत्पादन ; जाणून घ्या… नेमकी परिस्थिती काय ?

by Team Agro World
January 16, 2023
0

जगाच्या पाठीवर

केळी

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

by Team Agro World
March 25, 2023
0

Weather Alert

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

by Team Agro World
March 24, 2023
0

सोयाबीन

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

by Team Agro World
March 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

by Team Agro World
March 23, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group