ला सॅलिनास : हे जग म्हणजे वंडरवर्ल्ड आहे. याच जगातले एक शापित गाव आहे, जिथे वयात येताना मुलींचा होतो मुलगा! एका विशिष्ट वयानंतर मुलींमध्ये तसे शारीरिक बदल होतात. विश्वास नाही ना बसत? हे आश्चर्यकारक परंतु पूर्णपणे सत्य आहे. आज जाणून घेऊया जगातील सर्वात रहस्यमय गाव आणि तिथल्या या शापित आजाराविषयी…
कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय आपोआप होतात बदल
खरेतर, मुलगा किंवा मुलगी असणे, ही निसर्गाची देणगी आहे. आपले लिंग जन्मापूर्वीच ठरवले जाते. पण मानवाने आता एवढी वैज्ञानिक प्रगती केली आहे की शस्त्रक्रियेद्वारे चक्क लिंग देखील बदलता येते. जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी शस्त्रक्रियेद्वारे आपले लिंग बदलले आहे. हे जरी केवळ शस्त्रक्रियेद्वारे शक्य असले तरी या पृथ्वीवर एक असे गाव आहे, जिथे मुली एका वयानंतर चक्क मुले होतात, तेही कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय? हे नक्कीच आश्चर्यकारक आहे, परंतु हे पूर्णपणे सत्य आहे.
उत्तर अमेरिकेतील डोमिनिकन रिपब्लिक देशातील शापित गाव
या गावाचे नाव ला सॅलिनास आहे. डोमिनिकन रिपब्लिक या एक कोटी लोकसंख्येच्या छोट्याशा देशात हे गाव आहे. 1965 मध्ये उत्तर अमेरिकेतून स्वतंत्र झालेला हा कॅरेबियन देश कोलंबसने शोधून काढलेला आहे. या देशात लष्करी जवान आणि पोलिसांना मतदानात सहभागी होऊ न देण्याची वेगळीच परंपरा आहे. त्याच देशातील ला सॅलिनास या गावातील अनेक मुली वयाच्या 12 व्या वर्षी मुलांमध्ये बदलू लागतात. मुलींच्या बाबतीत असे का घडते, हे शास्त्रज्ञांनाही आजवर कळू शकलेले नाही, पण मुलींच्या बाबतीत होत असलेल्या या बदलामुळे लोक या गावाला शापित गाव मानतात.
मुलीचा मुलगा होणाऱ्यांची ‘गुडोचे’ म्हणून ओळख
मुलींचा मुलगा होण्याच्या या विचित्र आजारामुळे ला सॅलिनास गावातील लोक खूप अस्वस्थ आहेत. या गावावर कोणत्यातरी अदृश्य शक्तीचे सावट आहे, असाही अनेकांचा समज आहे. काही वडीलधारी मंडळी या गावाला शापित गाव मानतात. या गावातील मुलीचा मुलगा होणाऱ्या अशा मुलांना ‘स्यूडोहर्माफ्रोडाइट किंवा स्थानिक भाषेत ‘गुडोचे’ म्हणून ओळखले जाते. इथे दर 9 जणीतील एक मुलगी वयाच्या 12व्या वर्षानंतर मुलगा होऊ लागते.
घरी मुलगी जन्माला येताच कुटुंबात शोककळा
मुलींच्या जन्मावरून या गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकंच नाही तर गावात कोणाच्या घरी मुलगी जन्माला आली, की त्या कुटुंबात शोककळा पसरलेली असते, कारण आपली मुलगी मोठी झाल्यावर मुलगा होईल, अशी भीती त्यांना असते. या आजारामुळे गावातील मुलींची संख्याही लक्षणीयरीत्या कमी होत आहे.
डॉक्टर म्हणतात, ही ‘जेनेटिक डिसऑर्डर’
ला सॅलिनास हे गाव समुद्रकिनारी वसलेले असून गावाची लोकसंख्या सुमारे 6 हजार आहे. विचित्र रहस्यामुळे हे गाव जगभरातील संशोधकांसाठी संशोधनाचा विषय बनले आहे. हा आजार म्हणजे ‘जेनेटिक डिसऑर्डर’ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या गावात 9 पैकी एका मुलीला हा आजार होतो.
मुलींची मानसिक अवस्था अतिशय केविलवाणी
तसा तारुण्य हा मुला-मुलींसाठी विचित्र काळ असतो. या दरम्यान तरुण-तरुणींचे आवाज जड होऊ लागतात आणि मूड एकदम बदलतो. ला सॅलिनास गावातील मुलींची व्यथा तर शब्दात सांगता येणार नाही, अशी आहे. हा आजार असलेल्या सर्व मुलींच्या 12व्या वयानंतर त्यांच्या शरीरात पुरुषांसारखे अवयव तयार होऊ लागतात. त्याच वेळी, त्याचा आवाज जड होऊ लागतो आणि शरीरात हळूहळू बदल येऊ लागतात. ज्यामुळे नंतर हळूहळू मुलगीतून मुलगा बनतो.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
गेल्या 50 वर्षांपासून भुताटकीने झपाटलेले रेल्वे स्टेशन!
या आहेत जगातील सर्वांत तिखट मिरच्या…! दोन फूट लांबूनही डोळ्यात होते जळजळ..!
Comments 2