मुंबई : जुलै महिन्यातील अतिवृष्टीने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कापूस पिकाचे दर काय राहू शकतात, ते आपण सविस्तर जाणून घेऊ. याशिवाय, चीनमधूनही कापसाला मागणी येऊ शकते, त्याचे नेमके काय परिणाम होणार? कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार का? याविषयी वायदा बाजारातील (कमोडिटी मार्केट) तज्ञ अजय केडिया यांचे हे उपयुक्त विश्लेषण.
Mansoon destroyed cotton crop, will result in low supply & growing demand. What & How China Purchase will affect? Expert Ajay Kedia’s Cotton Price & Commodity Market Analysis. Cotton Association of India CAI Outlook on Bell Production.
भारतातील एक अनोखे गाव जिथे दुकाने आहेत, पण दुकानदार नाही; आजवर कधीही झालेली नाही चोरी-लबाडी!
नुकसान वाढण्याचा अंदाज
महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाल्याने कापसाच्या भावात त्याचे परिणाम होणारच. महाराष्ट्र राज्याच्या काही भागात अजूनही अतिवृष्टी सुरू आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी वर्तवली आहे.
ॲग्रोवर्ल्ड वाचकांसाठी खास मोबाईल अपग्रेड ऑफर!
यंदा दहा टक्के अधिक पेरणी
गेल्या खरीप हंगामात 12 दशलक्ष हेक्टरमध्ये कापूस पेरणी झाली होती. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीत-कमी 10 टक्के जास्त पेरणी अपेक्षित असल्याच्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा (सीएआय) CAI च्या अहवालातील अंदाज आहे. वाढीव उत्पादन अंदाजामुळे तूर्तास कापूस दरातील चढ-उतार मर्यादित आहे.
सीएआयचा खरीप कापूस पेरणी अंदाज
सीएआयच्या अहवालानुसार, सध्याचा कल पाहता, महाराष्ट्रात कापूस पेरणी 4.2 दशलक्ष हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये ते सुमारे 2.7 दशलक्ष हेक्टर असेल. उत्तरेकडील कापसाचे क्षेत्र सुमारे 1.5 दशलक्ष हेक्टर असेल आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये तेच सुमारे 3.5-4.0 दशलक्ष हेक्टर राहण्याची शक्यता आहे.
गुजरात, पंजाबमध्ये लागवडीला फटका
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती असून, बहुतांश पेरण्या वाया गेल्या आहेत. पंजाबमध्ये यंदा, कापूस लागवडीखालील क्षेत्र 2010 पासून सर्वात कमी झाले आहे. पंजाबमधील कापूस पीक पांढऱ्या माशीच्या हल्ल्यांमुळे आणि गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्यांमुळे सलग दुसऱ्या वर्षी धोक्यात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस पीक घेणे टाळले आहे.
चीन करणार पाच लाख टन खरेदी
सीएआय अहवालानुसार. चीनने आपल्या देशातील साठ्यात वाढ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून तीन ते पाच लाख टन कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच अमेरिकेतील 2022-23चा कापूस अंदाज गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी उत्पादन, निर्यात आणि साठा दर्शवत आहे.
कापूस दरात 460 रुपयांची वाढ
काल कमोडिटी मार्केटमध्ये दीर्घकालीन सौद्यात प्रती गाठ कापूस दर 1.14% ने वाढून 42,470 वर स्थिरावले. अमेरिकी स्पॉट मार्केटमध्ये कापूस 460 रुपयांनी वाढून 41,510 रुपयांवर बंद झाला.
44,140 दराची पातळी गाठणार
तांत्रिकदृष्ट्या वायदा बाजारात नवीन खरेदी सुरू आहे, कारण बाजारातील कापसाच्या खुल्या स्वारस्यात (ओपन इंटरेस्ट) 32.36% वाढ होऊन ते 544 वर स्थिरावले आहे, तर भाव 480 रुपयांनी वर आहेत. आता कापसाला 41,800 वर समर्थन (सपोर्ट) मिळत आहे आणि त्याच्या खाली तो फारतर 41,140 पातळीची गाठेल. आता 43,300 दर पातळीवर प्रतिकार (रेझीस्टन्स) दिसण्याची शक्यता आहे. त्यावर दर गेल्यास तो 44,140 ची पातळी नक्कीच गाठू शकेल.
आजचा कमोडिटी मार्केट व्यवहार आऊटलूक
• आज, सोमवार, 25 जुलै रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवसासाठी कापूस व्यापार हा 41,140 ते 44,140 अशा रेंजमध्ये राहील.
• महाराष्ट्र राज्याच्या काही भागात अतिवृष्टी सुरू असल्याने कापसाचे नुकसान झाले आहे.
• तथापि, गेल्या वर्षीच्या 12 दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत कमीत कमी 10% जास्त पेरणी अपेक्षित आहे, सीएआयच्या अहवालानंतर चढ-उतार मर्यादित आहे.
• अमेरिकी 2022-23 कापूस अंदाज मागील महिन्याच्या तुलनेत कमी उत्पादन, निर्यात आणि साठा दर्शवितो.
• स्पॉट मार्केटमध्ये, कापूस 460 रुपयांनी वाढून 41,510 रुपयांवर बंद झाला.
प्रत्यक्ष शेतकऱ्याला काय राहू शकतात भाव
कमोडिटी मार्केटमधील दीर्घ कालीन सौद्यात सध्याच्या कापसाच्या दराची स्थिती पाहिल्यास, प्रत्यक्ष शेतकऱ्याला काय भाव राहू शकतात, ते समजून घेऊ. गेल्या वर्षीपेक्षा वाढीव पेरणीच्या सीएआय अहवालामुळे, देशांतर्गत बाजारात भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी हमीभाव हे 6,025 होते. दिवाळीत अनेक शेतकऱ्यांना 8 ते 10 हजारांचा भाव मिळाला. नंतर दरपातळी 10 हजार ओलांडून हंगामाच्या शेवटी यवतमाळमध्ये शेतकऱ्याला 50 वर्षांतील विक्रमी प्रती क्विंटल तब्बल 14,000 पर्यंतही विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळे इतर मान्सून पिकांच्या तुलनेत चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा असल्याने यंदा मोठी कापूस लागवड झाली आहे.
दिवाळीत भाव सहा हजारांच्या पातळीवर?
सध्या सरासरी 8,740 दराने प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्याकडून खरेदी सुरू आहे. गेल्या वर्षभरातील सरासरी 8,954 राहिली आहे. तथापि, किंमती सातत्याने खाली येत असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. देशात बंपर पीक झाल्यास ऑक्टोबरपर्यंत किमती 6,000 रुपयांच्याही खाली जाऊ शकतात. अतिवृष्टीमुळे नुकसान, अमेरिकेत खालावलेला अंदाज, चीनकडून मागणी, रशिया-युक्रेन युद्ध हे काही बाजारावर परिणाम करणारे घटक असले तरी वाढीव पेरणी, वाढीव उत्पादन यामुळे गेल्या वर्षी इतक्या वाढीव दरांची पातळी यंदा गाठली जाण्याची शक्यता सध्या कमी दिसतेय.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे काही…
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न काही पिकांनी खरोखरच केले दुप्पट!
बटाट्याचे 90 दिवसात तयार होणारे वाण विकसित; गहू-तांदूळ हंगामादरम्यान घेता येईल तिसरे पीक
Comments 4