वाटाण्याचे 45 क्विंटल प्रति एकर इतके उत्पादन देण्याचा दावा करणारे काही सुधारित वाण आता बाजारात आले आहेत. वर्षभर मिळणारा वाटाणा अर्थात मटार बहुतांश अनेकांना आवडतो. वाटाणे खाणे अनेक आजारांवर गुणकारी ठरते, त्यातून शरीराला भरपूर फायदे मिळतात. आपण नव्या, उत्पादनक्षम वाणांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
वाटाण्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. याशिवाय, संधिवात, त्वचा, डोळ्यांचे आरोग्य आणि वजन कमी करण्यासाठी वाटाणा फायदेशीर असतो. त्यामुळे बाजारात वाटाण्याला कायम मागणी टिकून राहून शेतकऱ्यांना नगदी फायदा मिळवता येतो.
भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून संशोधित वाण
इथे सांगितलेल्या वाटाण्याच्या सर्व जाती 50 ते 60 दिवसात परिपक्व होतात. तसेच, यातील काही वाण प्रति एकर 40-45 क्विंटल उत्पादन देत असल्याचा उत्पादक कंपन्या दावा करतात. वाटाण्याच्या या सर्व जाती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भारतीय वनस्पती संशोधन संस्थेतील कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केल्या आहेत.
ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।
कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारे वाण
शेतकऱ्यांना वाटाणा लागवडीतून कमी कालावधीत अधिक नफा मिळवायचा असेल तर त्यांनी सुधारित वाणांची निवड करावी. आम्ही शेतकऱ्यांना वाटाण्याच्या, मटारच्या टॉप पाच सुधारित वाणांची माहिती देणार आहोत. या वाटाण्याच्या जाती म्हणजे काशी नंदनी, काशी उदया, काशी अगेती, काशी मुक्ती आणि अर्केल होत.
काशी नंदनी
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, पंजाब, उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यातील शेतकऱ्यांसाठी काशी नंदनी जातीचा वाटाणा अतिशय चांगला मानला जातो. ही जात काशी नंदनी इंडियन बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, वाराणसी यांनी विकसित केली आहे. या जातीची झाडे 45-50 सेमी उंच असतात. मटारची ही जात 60 ते 64 दिवसांत परिपक्व होते. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
काशी उदया
काशी उदया मटारची झाडे पूर्णपणे हिरव्या रंगाची असतात. वाटाणाची ही जात शेतकऱ्याला एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन देण्यास सक्षम आहे. मटारच्या या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी त्याची एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा काढणी करू शकतात.
काशी मुक्ती
या जातीचे वाटाणे खायला खूप गोड असतात, त्यामुळे त्यांना बाजारात सर्वाधिक मागणी असते; पण काशी मुक्ती जातीचे वाटाणे उशिरा पिकतात. या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

काशी अगेती
हे काशी वाणाचे प्रारंभिक स्वरूप मानले जाते. मटारचे हे वाण खायलाही खूप गोड लागते. या प्रकारच्या मटारचे सरासरी वजन 9-10 ग्रॅम असते. हे वाण शेतात 55-60 दिवसात परिपक्व होते. काशी अगेती वाणांसह शेतकरी 40-45 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळवू शकतात.
अर्केल
अर्केल हे वाटाण्याचे एक विदेशी वाण आहे. या वाणापासून शेतकरी एकरी 50 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतात. ही जात 60 ते 64 दिवसांत पूर्णतः परिपक्व होऊन काढणीस तयार होते.
Disclaimer : शेतकऱ्यांचे अनुभव, तज्ञांची माहिती आणि कृषी निविष्ठा बाजारातील खपाची आकडेवारी यावर आधारित ही ढोबळ मांडणी आहे. इतरही उत्पादक कंपन्यांचे असेच किंवा यापेक्षा अधिक उत्पादनक्षम वाण असल्यास आम्हाला जरूर कळवावे. सोबत शेतकरी यशोगाथा डिटेल्स, संदर्भ आणि असल्यास व्हिडिओही पाठवावा, म्हणजे तेही वाण तात्काळ या यादीत समाविष्ट करून घेता येऊ शकेल. marketing@eagroworld.in या ई-मेल आयडीवर किंवा 9175010120 या व्हॉटस् अप क्रमांकावर आपल्याला माहिती पाठवता येऊ शकेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇