मुंबई : आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून आजही बहुतांश लोक उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे उत्पादनावर परिणाम होवून शेतकर्यांचे उत्पन्न घटत आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारच्यावतीने एक योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेवू इच्छिणार्या शेतकर्यांना एक छोटेसे काम करायचे आहे. शेतकर्यांनी हे काम केल्यास सरकार त्यांना 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देणार आहे.
शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, तरुण वर्ग शेतीकडे वळावा, यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. अशीच एक योजना केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकर्यांसाठी राबविली जात आहे. प्रधानमंत्री किसान उत्पादन संस्था योजना (PMFPO) असे या योजनेचे नाव असून शेतकर्यांना कृषी व्यवसायाशी जोडून, संघटीत करुन त्यांचे उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे. शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास नक्कीच त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
… तर शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होण्यास मदत होईल – अजित पवार
पहा सविस्तर व्हिडीओ👇
https://youtu.be/AShSLWZwD6g
काय आहे योजना
देशातील अनेक शेतकरी आजही शेती करूनच आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आर्थिक अडचणींसह अनेक समस्यांचा सामना शेतकर्यांना करावा लागतो. यात वेळेवर बी-बियाणे, खते, शेती करण्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रे वेळेवर उपलब्ध न होणे यांसारख्या संमस्यांचा देखील समावेश आहे. शेतकर्यांची ही अडचण लक्षात घेवून सरकारने प्रधानमंत्री किसान उत्पादन संस्था योजना (PMFPO) कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत सहभागी शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे, पिकांसाठी आवश्यक असलेली खते, शेती करण्यासाठी लागणारी यंत्रे स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात असल्याने शेतकर्यांवरील भार कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून शेत मालाला चांगला भाव मिळवून देण्यातही मोठी मदत होणार आहे.
हे करावे लागेल काम
पीएमएफपीओ या योजनेचा लाभ घेवू इच्छिणार्या शेतकर्यांना सर्वप्रथम एक शेतकरी उत्पादक संस्था तयारी करावी लागणार आहे. यात 11 सदस्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. संस्था नोंदणी झाल्यानंतर योजनेच्या नियमानुसार अर्ज करावा लागेल. त्यानंतर एफपीओच्या अंमलबजावणीसाठ सरकार 15 लाख रुपये हस्तांतरीत करेल.
असा करा अर्ज
पीएमएफपीओ (PMFPO) या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजाराच्या https://www.enam.gov.in/ या संकेतस्थळावर जावून स्टेकहोल्डर (Stakeholder) वर क्लिक करुन त्यामधील एफपीओ (FPO) या पर्यायावर क्लिक करुन नोंदणी किंवा लॉगिनचा पर्यायावर क्लिक करुन नोंदणी करावी. अर्जासोबत त्याठिकाणी मागितलेले सर्व कागदपत्रे संलग्न करून सबमिट करावे. सरकारने ई-नाम या नावाने मोबाईल अॅप देखील लाँच केले आहे. हे अॅप डाऊनलोड करुन देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करु शकता. तसेच अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशीही तुम्ही संपर्क साधू शकता.