प्रतिनिधी/ औरंगाबाद
शेतीची जाण आणि शेतकऱ्यांची जाणीव असणारे सरकारी अधिकारी बोटावर मोजण्याइतके. जर अधिकारी शेतीभिमुक असतील तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. आज तेच औरंगाबादमध्ये पाहायला मिळालं.
दरारा असलेले अधिकारी म्हणून मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची ओळख आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले सुनील केंद्रेकर जे करतात, त्याची चर्चा होतेच. पण जिथं शेतकरी दिसतो, तिथं सुनील केंद्रेकर आपण अधिकारी असल्याचं विसरून जातात आणि शेतकऱ्यांचा मुलगा होतात. आज मराठवाड्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक दाखल झालं होतं. या पथकांतील अधिकारी हे इंग्रजी आणि थोडीबहुत हिंदी बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील पथक पाहणी करताना शेतकरी त्यांची वेदना मराठीत सांगत होते. नुकसान किती झाले त्याचे दाखले देत होते. पण हे तितक्याच तळमळीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर पथकातील सदस्यांना इंग्रजीत सांगत होते, तेही शेतकरी होऊन, शेतकऱ्यांच्या अंतर्मनातलं बोलत होते. इतकंच नाही तर पथकाला लोक, माध्यमांच्या गराड्यातून बाजूला शेतीत नेऊन माहिती देत होते.
या दौऱ्यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पदरी काय पडेल हा येणारा काळ ठरवेल! पण शेतकऱ्यांची वेदना त्याच जाणिवेनं अधिकारी सांगत होते ते नाव म्हणजे सुनील केंद्रेकर.
शेतकऱ्यांना अशा अधिकाऱ्यांची गरज आहे, त्यात एखादे आहेतही. ते आज दिसून आले. #सुनील_केंद्रेकर
साभार – माधव सावरगावे यांच्या FB wall वरून