5 ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
प्रतिनिधी, पुणे
मागील आठवड्यात तुरळक ठिकाणी बरसल्यानंतर राज्यात मान्सून आता पूर्ण जोराने सक्रिय झाला असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून पूरस्थिती तयार होण्याची शक्यता आहे.
कालपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर हवामान खात्याने मुंबई परिसरात आज (५ ऑगस्ट) रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भागादरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काल मंगळवारपासून ते शनिवार ७ ऑगस्टपर्यंत कोकण, घाटमाथ्यावर विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या भागात आहे शक्यता
मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठावाड्यात व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, घाटमाथ्यावर विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
का वाढत आहे पावसाचा जोर
उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भागादरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून २.१ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या सर्व घटकांचा परिणाम पावसाला अनुकूल आहे.
कोल्हापुरवर पुन्हा महापुराचं संकट; पंचगंगा नदी इशारा पातळीकडे
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची आज (दि.5)सायंकाळी ४ वाजता पाणीपातळी ३६ फूट ७ इंचावर होती. तर इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट आहे. आज सायंकाळी चार वाजता जिल्ह्यातील ९९ बंधारे पाण्याखाली गेले होते .तर एकूण कोल्हापूर जिल्ह्यातील १५ मार्ग बंद झाले आहेत
Good