• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मिश्रपिक पद्धती आर्थिक समृद्धीचा पॅटर्न

फळबागेला मिश्रपिकपद्धतीची जोड

Team Agroworld by Team Agroworld
August 25, 2021
in यशोगाथा
0
मिश्रपिक पद्धती आर्थिक समृद्धीचा पॅटर्न
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

एकाच पिकावर अवलंबून राहिल्याने आर्थिक गणित बिघडते हा अनुभव आल्यानंतर मिश्र व आंतरपिके घेऊन नवा पायंडा राजवड येथील निळकंठ पाटील यांनी पाडला आहे. सिताफळ एकरी 1 लाख व आंतरपीक पपईचे एकरी 50 हजार रुपये उत्पन्न निळकंठ पाटील यांनी मिश्र पिकातून घेतले. पपई, सूर्यफूल, भुईमूग, सीताफळ, पेरू, कापूस, मका, टरबुज, भेंडी अशी विविधता असलेली पिके घेणारे निळकंठ पाटील परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.

पारोळा (जळगाव) तालुक्यातील राजवड हे एक आदर्श गाव म्हणून सर्वदूर परिचित आहे. धरणगाव पासून 10 आणि पारोळ्यापासून 12 किमी अंतरावर टेकड्यांनी आणि झाडाझुडपांनी वेढलेले सुंदर गाव.  येथील प्रत्येक शेतकरी हा प्रयोगशील असल्याने उत्तम शेती करण्यात येथे स्पर्धा दिसून येते.  जलसंधारण आणि वृक्ष लागवडीत हे गाव अग्रेसर आहे.  येथील शेताच्या बांधावरील वृक्ष लागवड लक्ष वेधून घेणारी आहे.  अशा प्रयोगशील आदर्श गावाचे संस्कार झाल्यामुळे नीळकंठ पाटील देखील एक उत्तम आणि आदर्श शेतकरी ठरले आहेत.

गावापासून जवळच धरणगाव रस्त्याला लागून त्यांची शेती आहे. त्यांची 22 एकर शेती असून सिंचनासाठी 5 विहिरी व एक शेततळे तयार केले आहे. त्यांचे वडील ज्वारी, बाजरी, कापूस व कडधान्ये हीच पिके घ्यायचे.  नीलकंठ पाटील 2002 पासून शेती करू लागले आणि त्यांनी शेतीचे रूप पालटवायला सुरूवात केली. 2000 यावर्षी ठिबक सिंचनावर कापूस लागवड करणारे ते पहिले शेतकरी होते. या शेतात पोहोचलो तेव्हा सीताफळाच्या बागेत पपईचे जोमदार पीक उभे होते. एका फळपिकात दुसरे तेवढेच चांगले फळ उत्पादन घेण्याची किमया निळकंठ पाटील यांनी साधली होती.

सीताफळ लागवड:

राजवड शिवारात बोर उत्पादन घेण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल दिसतो. असे असून निळकंठ पाटील यांनी मात्र 2005 यावर्षी बाळानगरी सीताफळाची लागवड केली. थोडे थोडके नाही तर तब्बल 8 एकर क्षेत्रात 1750 इतक्या रोपांची 20x 13 अंतरावर लागवड केली. 2010 पासून उत्पादन यायला प्रारंभ झाला असून 16 वर्षाची बाग होऊन देखील ते आजही विविध आंतरपिके घेत आहेत.

आंतर पिकातून उत्पन्न वाढ:

बहुतांश शेतकरी फळ बागायत करतांना प्रत्यक्ष फळ उत्पादन यायच्या सुरुवातीची जास्तीत जास्त 5 वर्षे मूग, उडीद, सोयाबीन यासारखी कमी वाढणारी व कमी कालावधीची आंतरपिके घेतात. निळकंठ पाटील मात्र अपवाद आहेत. ते सीताफळाची झाडे 15-16  वर्षाची होऊनही पपई सारखे उंच वाढणारे पीक घेण्यातही यशस्वी झाले आहेत. पपई प्रमाणे त्यांनी सीताफळ पिकात भुईमूग, टरबूज,  भेंडी व कापूस देखील घेतला आहे. सीताफळाचे खर्च वजा जाता ते एकरी 1 लाख उत्पन्न घेतात.

सिंचन, खत व्यवस्थापन व रोगराई नियंत्रण :
अतिशय कमी पाण्यात येणारे हे पिक आहे. पावसाळ्याच्या पाण्यावरच हंगाम येऊ शकतो. पावसाळा सुरू होतो तेव्हाच या झाडाला फुलं येऊ लागतात. ऑक्टोबर महिना येईपर्यंत फळे पक्के होऊ लागतात.  एकूण सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाणी दिले जाते.

झाडांना बहर येतांना व पिके पक्व होण्यापूर्वी प्रतीझाड  1 किलो नत्र, स्फुरद, पालाश एकत्रित दिले जाते.  तसेच पावसाळ्यापूर्वी बुरशीनाशक मिश्रित 10 किलो शेणखत दिले जाते. मिलीबग वागळता कोणतीही कीड रोग येत नाही. फळावर मिलीबाग आल्यास कोणतेही रसशोषक किडींवर वापरावयाचे कीडनाशक किंवा निंबोळी अर्काची फवारणी केली जाते.

कमी खर्चाचे पीक:

सिताफळ हे कमी खर्चाचे व कमी पाण्यात येणारे पीक असल्याने ते परवडते असे ते सांगतात.  रोगराई फारशी येत नाही व फळ काढणी वगळता मजुरीचा खर्चही येत नाही. मालाची काढणी सुरू झाली की जळगाव, धुळे व गुजरात राज्यातील व्यापारी शेतावर येऊन माल घेऊन जातात.

पपई पासून घेतले बोनस उत्पन्न:

सिताफळ हंगाम डिसेंबर –जानेवारी महिन्यात संपतो.  त्या अनुषंगाने त्यांनी पपईच्या सह हजार रोपांची लागवड केली होती. सिताफळ नंतर लगेच फेब्रवारीपासून पपईची काढणी सुरू झाली.  आंतरपीक असून देखील पपईपासून त्यांनी 3 लाख रुपये इतके उत्पन्न घेतले.  सिताफळ उत्पादन घेतल्यानंतर हा एक प्रकारे त्यांना बोनसच मिळाला.

सूर्यफूल आंतरपीक तेही ठिबकवर:

पाच एकरात पेरूची लागवड केली असून त्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात त्यांनी सुर्यफुलाचे आंतर पीक घेतले. आंतरपीक असूनही एकरी 12 क्विंटल असे भरघोस उत्पादन घेतले. उत्तम दर्जाचे उत्पादन आल्याने त्यांना 6 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.  अशाप्रकारे फक्त 90 दिवसात सूर्यफुलपासून एकरी 72 हजार रुपये उत्पन्न मिळविले. त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाचा उपयोग करून मक्याचे एकरी 42 क्विंटल उत्पादन त्यांनी घेतले.

जलसंधारण कामातही योगदान:

निळकंठ पाटील यांच्या शेताच्या भोवतीने छोटे छोटे नाले आहेत.  पूर्वी डोंगर उतारावरील पाणी एक तर त्यांच्या शेतात घुसून पिकांचे नुकसान व्हायचे किंवा सरळ वाहून जायचे.  अलीकडे मात्र हे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी त्यांनी शिवारात ठिकठिकाणी नाला खोलीकरण केले आहे.  त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढीस मदत झाली आहे.

निळकंठ पाटील यांच्या शेतातील विविध पिकांचे नियोजन पाहता ते एकाच क्षेत्रात विविध मिश्र पिके व आंतरपिके घेऊन आपले उत्पन्न वाढवितात असे दिसून आले.

 

पोकरा योजनेचा मिळाला लाभ:
राजवडगावाची निवड शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा ) यात झाली असल्याने शेतकऱ्यांना विविध कामे अनुदानातून करून घेता आली आहेत. या योजनेचे जिल्हा अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निळकंठ पाटील यांनी आपल्या शेतीत सुधारणा केली आहे.  त्यानुसार फळबाग, ठिबक सिंचन प्रणाली, मोटार पंप, शेततळे, कांदा चाळ आदी लाभ त्यांनी मिळविला आहे. संजय पवार यांच्याप्रमाणे तालुका कृषी अधिकारी शेळके, कृषी सहायक बोरसे यांचेही त्यांना मार्गदर्शन मिळते.

 

 सिताफळ, पेरू ही फळ पिके कापूस पेक्षाही कितीतरी पटीने फायदेशीर आहेत. या पिकांना मजुरी कमी लागते.  तसेच रोगराई नगण्य असल्याने त्यावरील खर्च देखील वाचतो. फळ बागायत व मिश्र लागवडीमुळे माझी आर्थिक घडी बसली.

निळकंठ दगडू पाटील,

मु.पो. राजवड ता. पारोळा, जिल्हा जळगाव

मो.न.9766576655

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: आंतर पिकजलसंधारणपारोळापेरूपोकराराजवडसीताफळ
Previous Post

असा मिळविला दहा गुंठ्यात एक लाखाचा निव्वळ नफा

Next Post

राज्यात पावसाची उघडीप, परंतु येथे आहे पावसाची शक्यता

Next Post
राज्यात पावसाची उघडीप, परंतु येथे आहे पावसाची शक्यता

राज्यात पावसाची उघडीप, परंतु येथे आहे पावसाची शक्यता

ताज्या बातम्या

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.