• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

फर्टिगेशन : आधुनिक शेतीची वाटचाल…

Team Agroworld by Team Agroworld
September 8, 2020
in तांत्रिक
3
फर्टिगेशन :  आधुनिक शेतीची वाटचाल…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या 60% ठिबक सिंचन हे एकट्या महाराष्ट्रात केले जाते व यातून पिकांना खते पुरविल्यास फर्टिगेशन हे शेतीसाठी वरदान मानले जाते . ही पद्धत सर्वप्रथम 1960 मध्ये इस्राएल मध्ये सुरू झाली व त्यांनतर 1970 मध्ये अरस्कॉट यांनी पहिला अहवाल सादर केला ज्यामध्ये हातानी टाकण्याच्या खत पद्धतीपेक्षा सिंचनातून टाकलेल्या युरिया ची पध्दत ही अधिक लाभदायक व कार्यक्षम आढळून आली होती.” आधुनिक शेती पध्दती मध्ये पाण्याची व खताची बचत करून थेंबा  थेंबाने अथवा सुक्ष्म धारेने द्रवरूप/घनरूप खतामधील पोषक अन्नद्रव्ये पिकाला पुरवली जातात.विशेषतः फुलोऱ्यात, मोहोर येण्याच्या वेळी, फळ धारणाच्या वेळी, त्यानंतर  फळांची वाढ होण्यासाठी अन्नद्रव्यांची अधिक मात्रा हवी असते अश्यावेळी फर्टिगेशन द्वारे दिलेली खते  उपयोगी पडतात.

जमिनीत कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास त्याचा  परिणाम पिकाच्या वाढीवर  होतो . परीणाम टाळण्यासाठी शेतकरी मुख्यतः रासायनिक खतांचा वापर करतात. काही पारंपरिक खाते ही 100 % पाण्यात विरघळली जात नाही. पीकवाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत पिकांना अन्नद्रव्यांची गरज असते, हा पुरवठा असंतुलित प्रमाणात झाला की जमिनीची सुपीकता व पिकाची वाढ यात स्थगिती येते . अतिवृष्टी मुळे किवा सतत पावसामुळे जमिनीतील खते वाहून जातात ,तसेच पाण्याची कमतरता, कडक उन्हामुळे  पिकांची मूळे  सुकून जाऊन कार्यरत राहत नाही .

              या समस्येवर उपाय म्हणून पिकाला योग्य त्या वेळी संतुलित प्रमाणात पाण्याद्वारे विद्राव्य खते देने आवश्यक असते, ज्यामुळे  अन्नद्रव्यांची पूर्तता करता येते ,पाण्याची व खताची बचत होते , पिकाला गरजे नुसार खत पाणी मिळाल्या मुळे पिकाची उगवण शक्ती पाठोपाठ पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढते हे साध्य करण्यासाठी  फर्टिगेशन प्रक्रिया लाभदायक  ठरते.                                                     

 फर्टिगेशन म्हणजे काय ?
पिकाच्या मूळपाशी गरजेनुसार ठिबक सिंचनातून योग्य अन्नद्रव्ये खते व पाणी एकत्रितपणे देण्याच्या पद्धतीला  फर्टिगेशन असे म्हणतात .
खते सिंचनाद्वारे दिल्याने अधिक दर्जेदार उत्पादन मिळून पाणी आणि खतांच्या अधिक कार्यक्षमतेमुळे त्यांची बचत करता येते,सिंचनातून वापरली जाणारी खते पाण्यात सहज विरघळणारी असतात . त्याचा उत्तम परिणाम पिकाच्या वाढीवर दिसून येतो. फर्टिगेशन तंत्रामुळे पिकांची पाणी वापर क्षमता, खत वापर क्षमता ही 40-50% वाढते, जमिनीची सुपीकता वाढून पिकाची रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते .
इरिगेशन द्वारे खते देण्याची पद्धत :- सामान्यता  ठिबक सिंचन व तुषार सिंचन पद्धतीचा उपयोग करून खते वापरली जातात .यात प्रामुख्याने खताची टाकी , व्हेंच्युरी,  पंप ईत्यादींचा उपयोग होतो.
खताची टाकी :- या टाकीमध्ये खतांचे मिश्रण असून ते मूख्य पाईपलाईन ला जोडलेली असतात . इररिगेशन चे पाणी टाकीमधील खताला पूर्णपणे विरघळून टाकतात व त्यांनतर ते मिश्रण ठिबकच्या नळी  द्वारे पिकाला पुरवली जातात.
व्हेंच्युरी :- व्हेंच्युरी हे उपकरण  पाईप मध्ये दबाव निर्माण करून त्या ठिकाणी खताच्या  मिश्रनाला व इरिगेशन च्या पाण्याला ओढून ते तीव्र गतीने पाईप कडे  सोडण्यात येते. हे उपकरण कमी खर्चाचे असून कमी जागेसाठी सोईस्कर आहे.
पंप :- पम्पाद्वारे  खताचा व पाण्याचा प्रवाह हा संतुलित करता येतो .
इरिगेशन  फिल्टर :-  मुख्य पाइपलाइन ला फिल्टर लावल्यास अशुद्ध पाणी शुद्ध होते . व त्यामुळे नळ्यामध्ये घाण साचत नाही व पाण्याचा प्रवाह थांबत नाही .

 फर्टिगेशन चे फायदे :-

  1. फर्टिगेशन मुळे उत्पादनात २५-३०% वाढ होते. द्रवरूप किंवा घनरूप खते  सिंचनातून वापरल्याने ती अधिक फायदेशीर,  उपयुक्त व कार्यक्षम ठरतात आणि अवक्षेपणमुक्त असल्यामुळे ड्रीपर्स बंद होण्याची भीती नसते.                                   
  2. द्रवरूप खते सिंचनातून दिली असता तीव्र द्रावण सौम्य होते.त्यामुळे पिकांच्या मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही.
  3. द्रवरूप खतांच्या रूपाने मूख्य पोषणद्रव्याचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केला जातो.
  4. पिकांच्या वाढीची अवस्था व त्यांच्या गरजेनुसार द्रवरूप खतांचा वापर केला असता उत्पादनात वाढ होते.
  5. सिंचनाद्वारे खते दिल्यास पिकांना पाणी पोषणद्रव्यांचा साठा मुळांजवळ होतो व पीक वाढीस वेग येतो, तसेच  पोषणद्रव्याचाऱ्हासहोतनाही.
  6. खते नियमित आणि कमी प्रमाणात वापरल्या मुळे जमिनीत अन्नद्रव्यांचा साठा कमी असतो आणि नियमित असतो त्यामुळे अति पावसाचे निचऱ्याद्वारे किंवा जमिनीवरून जास्तीत जास्त पाणी वाहून गेल्याने पोषकतत्व जात नाही आणि खताचीएकूण२५-३०%बचत होते.
  7. कीटकनाशके व तणनाशके द्रवरूप खतात मिसळून दिल्याने मजूर ,यंत्रसामग्री व पर्यायाने आर्थिक बचत होते.
  8. हलक्या वालुकामय किंवा मुरमाड जमीनित  पिकाचे उत्पादन येण्यासाठी खास व्यवस्थापणेची गरज असते . कारण जमिनीत पाणी व खत या दोन घटकांचा सहभाग महत्त्वाचा असतो द्रवरूप खतामुळे या समस्येचे निराकरण करता येते.
  9. द्रवरूप खते देण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे जमीनीचा पृष्ठभाग कठीण होत नाही क्लोराईड प्रमाण नगण्य असते पिकांवर अनिष्ट परिणाम होत नाही  क्लोराईडचे प्रमाण खतामध्ये जास्त असेल तर त्या द्रावणाची क्षारता वाढते व अशी खते क्लोराईडला संवेदनशील असलेल्या पिकांना  हानिकारक ठरू शकतात म्हणून क्लोराईडमुक्त खते वापरल्यास समस्या निर्माणहोणारनाही.
  10. फर्टिगेशन मुळे खतवापर कार्यक्षमता, पाणी वापर कार्यक्षमता व जमिनीचा सुपीकता वाढते व  रोगांना बळी पडण्याचे प्रमाण थांबते.  

फर्टिगेशन करतांना घ्यावयाची दक्षता:-

  1. ठिबक तोट्या / ड्रीपर्स  मूख्य पाइपलाइन ला योग्य रीतीने  जोडावेत.
  2. ठिबक तोट्या/ ड्रीपर्स यामध्ये माती किंवा पालापाचोळा जाणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पिकाला नळ्यांचा त्रास होणार नाही एवढे अंतर ठेवावे.
  3. ठिबक /सूक्ष्म सिंचन संचामध्ये खत शेवाळे, गंधक,लोह,किंवा इतर क्षार साचू देऊ नये,त्यामुळे उत्सर्जक/ठिबक  तोट्या बंद पडतात, शेवाळ  असल्यास क्लोरीन प्रक्रिया व रासायनिक अशुद्धता असल्यास आमल प्रक्रिया करावी.
     
    कु. आचल देवेंद्र इंगळे    
    (बी.एससी.कृषी,7th,सत्र)  
    स्व.आर.जी.देशमुख कृषी महाविद्यालय, तिवसा     
                                                                                                         

                                                                                                             

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: क्लोराईडमुक्त खतेतिवसाद्रवरूप खतफर्टिगेशनस्व.आर.जी.देशमुख कृषी महाविद्यालय
Previous Post

‘पोकरा’ योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा – बच्चू कडू यांचे निर्देश

Next Post

ठिंबकच्या वापरातून वाढवले कांद्याचे उत्पादन

Next Post
ठिंबकच्या वापरातून वाढवले कांद्याचे उत्पादन

ठिंबकच्या वापरातून वाढवले कांद्याचे उत्पादन

Comments 3

  1. Chandrashekhar patil says:
    5 years ago

    Nice information…

  2. M/s Laxmi Hightech Agro Agencies, Sangli. Maharashtra says:
    5 years ago

    फर्टिगेशन बद्दल माहिती खुप सोप्या भाषेत सांगितलं आहे. तसेच ठिबक सिंचनाची देखभाल व दुरुस्ती कशा पद्धतीने करावयाची हेही माहीती दीली आहे. अशाच पध्दतीने ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हि विनंती.

  3. Gopal Chopade says:
    5 years ago

    best

ताज्या बातम्या

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2025
0

ऐन खरिपात खत का महागले..??

ऐन खरिपात खत का महागले..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2025
0

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

नाशिकमधील यशस्वी ॲग्री स्टार्टअप – ॲग्रोग्रेड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2025
0

ऐन खरिपात खत का महागले..??

ऐन खरिपात खत का महागले..??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 2, 2025
0

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

आज, 1 ऑगस्ट – पावसाची जिल्हानिहाय स्थिती…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2025
0

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.