पुणे : पावसाचे ताजे अपडेट्स, आज रविवार, 11 सप्टेंबर रात्रीपर्यंतची स्थिती व पुढील अंदाज जाणून घ्या. आयएमडी पुणेने आधीच Weather Alert द्वारे पावसाची पूर्वसूचना दिली होती.
पुण्यात आज, रविवारी, 11/09/2022 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वत्र अर्धा ते पाऊण तास जोरदार गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.
उपग्रहांच्या रडार प्रतिमेवरून पुणे शहर, शिवाजी नगर आणि पुणे जिल्ह्यातील दक्षिण-पूर्व भागांसह घाट परिससरात हा मुसळधार पाऊस का झाला असावा, ते सहज लक्षात येते. विजांच्या कडकडाटासह तीव्र मेघगर्जना पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात हीच स्थिती राहिली. पुढील 2 ते 3 तास म्हणजे रात्री 8 वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी ही अशी स्थिती व पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
👆 पुण्याच्या आकाशात सायंकाळी ढगांची गर्दी कशी झाली, ते दाखवणारा व्हिडिओ. (क्लाऊड फॉर्मेशन)
धायरी , सिंहगड रोड, NDA परिसरात अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला आणि अतिशय कमी दृश्यमानता Visibility होती. वडगाव शेरीतही ढगफुटीसारखा पाऊस.
- शहरात पाणी साचल्याचे मुख्य कारण – कमी वेळात जास्त पाऊस आणि पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गात झालेले बांधकाम.
मेट्रो डेपो जवळ, पौड रोड, कोथरूड… किती वाईट हालत आहे याला जबाबदार कोण? नवीन काम करण्याच्या नादात पुण्याला खड्ड्यात घालत आहात @metrorailpune @PMCPune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPGirishBapat @PMOIndia @psambhajisakal @DrManasiPawar4 @abhisanket @UjwalKeskar pic.twitter.com/PHytYDJ8ON
— चंद्रशेखर गोसावी (@Chandu_Gosavi) September 11, 2022
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये होणारा विसर्ग वाढवून सायं. 8 वाजता 2,568 क्यूसेक करण्यात येत आहे.
Today’s situation – Dighi#pune #punerain #dighi#waterlogging #PuneRain #Maharashtra pic.twitter.com/cQU58iPdTl
— Siraj Noorani (@sirajnoorani) September 11, 2022
खालील आकडेवारीनुसार पुण्यात मागील 4 तासात (रात्री 9 वाजेपर्यंत) किती पाऊस झाला, याचा अंदाज येतो –
पावसाच्या नोंदीचे आकडे मिलिमीटरमध्ये
- हडपसर – 96.5
- वानवडी – 93.5
- येरवडा – 78
- पाषाण – 73
- शिवाजीनगर – 69.5
- कोरेगाव पार्क – 58
- डुडूळगाव – 55.5
- कात्रज बोगदा – 54
- खडकवासला – 51
- कोंढवा – 50
- आळंदी – 44
- वरसगाव – 31
- पानशेत – 26
- टेमघर – 16
- कासारसाई धरण – 11
पावसाचे ताजे अपडेट्स
- औरंगाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. या पावसामुळे देवगिरी नदीला पूर आला व याती तीन महिला वाहून गेल्याची घटना घडली. यातील दोघींना वाचवण्यात यश आले असून एक 14 वर्षीय मुलगी बेपत्ता आहे.
https://t.co/clvH0Ehi5Bhttps://t.co/5xNPgUiDO9
और देखते देखते नदी की बाढ़ में बह गई 15 साल की मासूम
रेस्क्यू टीम के मेंबर्स भी नही बचा पाए
महारास्ट्र के औरनागबाद में भारी बरसात में हुआ हादसा#Aurangabad #Aurangabadrain #rain #floods #Rescue #Maharashtra pic.twitter.com/XhamQZ87li
— Jayprakash Singh ( India Tv ) (@jayprakashindia) September 11, 2022
- पोलीस कर्मचारी महिलांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने तेही पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले
- चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून 3 ठार; 2 जखमी; विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
- जुन्नरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, वाजेवाडीतील बंधारा फुटल्याने घरांमध्ये पाणी
- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, राज्यात असलेला कमी दाबाचा पट्टा या पोषक प्रणालीमुळे राज्यात विजा, मेघगर्जना, विजांसह पाऊस सुरू आहे.
- कमी दाब क्षेत्राचा प्रभाव विदर्भात काल पासून सुरू झालेला असून सद्ध्या हिंगणघाट यवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याच भागांत जोरदार पाऊस होत असून पुढील 2-3 दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता विदर्भात आहे
- अमरावतीत मुसळधार पाऊस; पावसामुळे जनजीवन विस्कळित; पुढील 3 दिवस विदर्भात सतर्कतेचा इशारा
- बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस
- पुण्याला पावसाने झोडपले, सखल भागांत साचले पाणी, वाहतुकीलाही अडथळे
- राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले
- कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे तांडव; पाटगाव, कुंभी धरण भरले, राजाराम बंधाराही पाण्याखाली
- महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, औरंगाबाद-सिंधुदुर्गात ढगफुटीसदृश पाऊस, कोल्हापुरातही कहर, निसर्गाच्या रौद्ररुपाचे भयंकर व्हिडिओ आले समोर
- माणगाव खोऱ्यात जोरदार पाऊस, 27 गावांचा संपर्क तुटला
- उस्मानाबादेत गेले 4 दिवस मुसळधार पाऊस, जिल्ह्यात शंभराहून अधिक प्रकल्प ओव्हरफ्लो
What should we call this? Hurricane in Badnapur taluqa of Jalna, Maharashtra.#rain #Hurricanes pic.twitter.com/lScy2Zawj4
— Abhijit Deshmukh (@iabhijitdesh) September 11, 2022
- जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या मसई तांडा इथं आज अंगावर वीज कोसळून श्रीराम जाधव या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दुपारी शेतात काम करत असताना पाऊस आल्यामुळे जाधव हे झाडाच्या आश्रयाला थांबले असताना त्याच वेळेस झाडावर वीज कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली.
- अंबाजोगाई परिसरात व बर्दापूर या ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडत आहे,
- सोनजांब & तळेगाव वणी (दिंडोरी, नाशिक) येथे मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.
- अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा जळगाव जिल्ह्यांत बऱ्याच भागांत तर अकोला, चंद्रपूर, नागपूर, हिंगोली जिल्ह्यात काही भागांत मध्यरात्री/ पहाटेपर्यंत पाऊस राहील
- गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस असल्याने अतिवृष्टीमुळे महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या पुलाचा जोडरस्ता वाहून गेला.
- पुढचे पाच दिवस कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज
- ओडिशाच्या किनारपट्टीलगत बंगालाच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस मुंबईसह कोकण व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. त्यामुळं शेतकऱ्यांनी पशुधनाची आणि धान्याची काळजी घ्यावी, तसंच लांबचा प्रवास टाळलेला बरा किंवा योग्य ती काळजी घेऊनच प्रवास करावा!
Depression lies over #chhattisgarh and CC over #ratnagiri. Under this influence heavy Rains possible for #Gujarat(south), #Maharashtra, #goa, #ratnagiri, coastal #Karnataka, Ghats of #kerala and #Chhattisgarh.#mumbai light to moderate Rain possible.#mumbairains #Monsoon2022 pic.twitter.com/DxNYC5Mhr5
— Rain forecast (@Rainchaser04) September 11, 2022
👆 वरील चित्रावरून सध्याच्या पावसाच्या वातावरणाची व तीव्रतेची कल्पना येऊ शकते
पुढील 5 दिवसात गुजरात आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आयएमडी पुण्याचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितले, की पुढील 3 दिवसात ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस होईल. कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले असून ओडिशाच्या किनारपट्टीवर मान्सूनच्या सामान्य स्थितीपेक्षा जास्त तीव्रता आणि सक्रियता दिसत आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टी परिसरातही हे क्षेत्र विस्तारत आहे.
#पुणे #पुणे_पाऊस
सायंकाळी सहा सव्वासहाच्या सुमारास #कोथरूड
कचरा डेपो समोरची परिस्थिती #Pune #Kothrud #Punerains #म pic.twitter.com/IeaWdttE1h— prasadpanseMT प्रसाद पानसे (@prasadpanseMT) September 11, 2022
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
पुणे आज.. pic.twitter.com/T0NeLxIUBE
— Ash🦋 (@birdyeee_) September 11, 2022
👆👆👆
आजची, 11 सप्टेंबरची सकाळची स्थिती
11/09/2022, रविवारी सकाळी 11.30 वाजेची ही ताजी उपग्रह स्थिती पाहा. सकाळी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबाव प्रणालीच्या प्रभावामुळे दक्षिण-पूर्व विदर्भाचा काही भाग व मराठवाड्याचा बहुतांश भाग दाट ढगांनी व्याप्त झाला आहे. या प्रदेशांत व संलग्न भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल. दक्षिण कोकणात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, जेथे गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला.
राज्यातील 11 सप्टेंबरच्या विजांच्या धोक्याचे अनुमान
हवामानाशी संबंधित केंद्र सरकारी संस्था आता हवामान अंदाज वर्तविण्यासाठी रिअल टाईम हाय रेझोल्यूशन सॅटेलाईट इमेजेसचा आधार घेतात. अशाच एका वेदर सिस्टिमवर, आज, रविवार, 11 सप्टेंबर रोजी राज्यात विजांचा धोका कसा राहू शकतो, ते वरील छायाचित्रातून दिसून येईल. लाल, नारंगी, पिवळसर रंग ज्या भागात आहे, तिथे धोका जास्त असू शकतो. या भागात कडकडाटासह पाऊस पडतो. गर्द हिरव्या भागातही जोरदार पाऊस होऊ शकतो. तुलनेने निळ्या भागात विजा नसतात आणि फारसा पाऊसही नसतो.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र : यामुळेच आता ओडिशाला, विदर्भाला आणि कोकण किनारपट्टीला 4-5 दिवस तडाखा बसणार आहे.
Comments 2