पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्याकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतक-यांचा सन्मान म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय :- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ शासन कृषी विभाग क्र.शेदिजा-२०१२/प्र.क. 150/3 अे, दि. 16.8.2014 अन्वये दि. 29 ऑगस्ट हा दिवस “शेतकरी दिन ” म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली होती. यानंतर दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आता सन 2019 मध्ये दि. 14 ऑगस्ट, 2019 हा दिवस राज्यात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आली आहे. सदर कार्यक्रम छोट्या प्रमाणात साजरा करण्यात प्रमाणात साजरा करण्यात यावा. शेतकऱ्याना ग्रामसभा अन्य कार्यक्रमाच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य देण्यात यावे. असा आदेश आज काढण्यात आला.
सदर कार्यक्रमास कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही . या कार्यक्रमासाठी कमीत कमी खर्च , आयुक्त कृषी यांच्या अधिनिष्ट असलेल्या तरतुदीमधून करावा अश्या सूचना या निर्णयातून करण्यात आल्या आहेत. तसेच शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालयाने निर्गमित कराव्यात अश्या सुचना देण्यात आल्या आहेत. (शासन निर्णय क्रमांक संकीर्ण – 2019/प्र.क्र. 96/3-अ)