देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭
हॊय… यंदा देवगड हापूसचा हंगाम अपेक्षेपेक्षा सुमारे एक महिना अगोदर संपला. यंदा कोकणात पहिला व तिसरा बहारच नसल्याने एकूणच हापूस आंब्याचा हंगाम फक्त 40 %च होता.. म्हणजे तब्बल 60 % कमी..!!
नफेखोरी नाही, सर्विसला प्राधान्य
बाजारात वाढत्या मागणीचा दबाव व 40%च उपलब्ध असलेला हापूस… अशाही परिस्थितीत ॲग्रोवर्ल्डने नफेखोरी न करता सेवाभाव अर्थात सर्विसला प्राधान्य दिले… म्हणजेच बाजारापेक्षा कमी दरात आणि शेतकरी व ग्राहक दोघांनाही परवडेल अशा माफक भावात अस्सल देवगड हापूस आंब्याची विक्री केली… हापुस आंबा विक्री हा ॲग्रोवर्ल्डचा मुख्य व्यवसाय नाही… मात्र देवगड म्हणजे अस्सल देवगड हापूससच माफक किमतीत उपलब्ध करून दिला, तो देखील नैसर्गिकरित्या पिकविलेला…
अधिक मोह नाही म्हणूनच..
देवगड व्यतिरिक्त इतर भागातील तसेच कर्नाटकातील हापूस उत्पादकांनी देखील ॲग्रोवर्ल्डशी संपर्क साधला.. ” आमचाही आंबा देवगड प्रमाणेच आहे. कमी दरात उपलब्ध करून देतो. तुम्हाला नफा देखील जास्त राहील. ” परंतु टीम ॲग्रोवर्ल्डने मोह टाळत यास नम्रपणे नकार दिला. कारण महत्त्वाचा आहे तो ग्राहक म्हणून तुम्ही आमच्यावर दाखविलेला 6 वर्षांपासूनचा विश्वास..! जो भविष्यात देखील आम्ही नक्कीच जपू..!!
ग्राहकांच्या मागणीचा विचार करता ॲग्रोवर्ल्ड लवकरच रेसिड्यू फ्री एक्सपोर्ट क्वालिटीची सिडलेस फ्लेम द्राक्ष तसेच सफरचंदही उपलब्ध करून देणार 🍇 🍎
आम्ही जे देणार ते दर्जेदारच देणार..
कारण, आम्ही आहोत… ॲग्रोवर्ल्ड..!
https://www.eagroworld.in🌱