• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जळगावात 11 तारखेपासून चार दिवसीय अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन…; शेती पिकांवर फवारणी करणारा ड्रोन ठरणार प्रमुख आकर्षण; खान्देशात पहिलाच प्रयोग

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 10, 2022
in कृषीप्रदर्शन
0
जळगावात 11 तारखेपासून चार दिवसीय अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन…; शेती पिकांवर फवारणी करणारा ड्रोन ठरणार प्रमुख आकर्षण; खान्देशात पहिलाच प्रयोग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रदर्शनात फक्त पहिल्या दिवशी भाजीपाला बियाणे मिळणार मोफत.. ; नोंदणीधारकांना लकी ड्रॉद्वारे अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी…

जळगाव ः कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्‍या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे शुक्रवारी (11 मार्च) उद्घाटन होईल. 11 ते 14 मार्च दरम्यानचे हे कृषी प्रदर्शन मोफत असून शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

https://www.facebook.com/248604182011773/posts/1808202696051906/

कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांना या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागून होती. 11 ते 14 मार्च या चार दिवसांच्या कालावधीत होणारे हे कृषी प्रदर्शन खान्देशातील शेतकर्‍यांसाठी पर्वणी ठरणार आहे. तब्बल चार एकरच्या परिसरात 220 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, सर्व शासकीय विभाग, बँक, प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती मिळेल. प्रदर्शनात मजूर टंचाईवर पर्याय ठरेल अशी पिके तसेच कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय नामवंत ठिबक कंपनींसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठा उत्पादकांचे स्टॉल्सही राहणार आहे. सोबतच दूध काढणी यंत्र, विविध आकारातील शेततळ्यांची माहिती तसेच त्रिस्तरीय मत्स्यपालन शेतकर्‍यांना पाहता येईल. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, र्‍हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृदयालय हे सहप्रायोजक आहेत.

 

ड्रोन ठरणार शेतकर्‍यांचे आकर्षण…

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतातील पिकांवर किटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला परवानगी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनात प्रत्यक्षात पिकांवर ड्रोनद्वारे कशी फवारणी करता येते, हे शेतकर्‍यांना पाहता येणार आहे. त्यामुळे ड्रोनने शेती पिकांवर होणारी फवारणी हे या कृषी प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. प्रदर्शन तसेच ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक मोफत आहे.

शेतकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी
प्रदर्शनस्थळी भेट देणार्‍या शेतकर्‍यांची गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. यात नाक, कान, घसा, डोळे, हृदयरोग व रक्त तपासणीसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येईल. याच बरोबर टुडी इको याची देखील दोन दिवस तपासणी करण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी भाजीपाला बियाणे मिळणार मोफत
प्रदर्शनात फक्त पहिल्या दिवशी प्रत्येक नोंदणीधारक शेतकर्‍याला निर्मल सीड्सतर्फे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दहा ग्रॅम बियाण्याचे पाकीट मोफत दिले जाणार आहे. शेतकर्‍यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Director Shailendra ChavanDron technologyG. S. GroundJalgaonअॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनआरोग्य तपासणीजळगावड्रोनशिवतीर्थ मैदानसंचालक शैलेंद्र चव्हाण
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण.. ड्रोनने फवारणी.. प्रदर्शस्थळी दर तासाला प्रात्यक्षिक… खान्देशात प्रथमच…

Next Post

हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख शनिवारी (ता. 12) अ‍ॅग्रोवर्ल्ड प्रदर्शनात… ; अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख शनिवारी (ता. 12) अ‍ॅग्रोवर्ल्ड प्रदर्शनात… ; अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख शनिवारी (ता. 12) अ‍ॅग्रोवर्ल्ड प्रदर्शनात... ; अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

बंगालच्या उपसागरात

बंगालच्या उपसागरात दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रभर कोसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

पहा राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.