• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ओळख महामंडळांची..! महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ

Team Agroworld by Team Agroworld
December 28, 2020
in इतर
0
ओळख महामंडळांची..!    महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ म्हणजेच ‘महाबीज’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करुन दिल्या जाते. महामंडळाचे मुख्यालय अकोला येथे आहे. ‘शेतकऱ्यांचं महामंडळ, शेतकऱ्यांची संस्था’ अशी या महामंडळाची ओळख आहे. सोबतच राज्य सरकारचं नफ्यात असलेलं एकमेव महामंडळ अशीही ओळख ‘महाबीज’नं जपली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना प्रचलित वाणांचे गुणवत्तापूर्वक बियाणे मिळण्याच्या उद्देशाने साधारणतः सन 1960 च्या दरम्यान शासनाने तालुका बीज गुणन केंद्राची स्थापना करून बीजोत्पादनाला सुरुवात केली. या तालुका बीज गुणन केंद्रावरुन उत्पादित बियाणे शासनाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत सर्मितीमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत होते. घरचेच बियाणे वापरण्यापेक्षा शासनाकडून पुरवठा केलेल्या त्याच वाणाच्या बियाण्यापासून अधिक उत्पादन मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा बियाणेबदल करण्याकडील कल वाढू लागला.

साधाणतः सन 1969 पासून संकरित वाणांची सुरुवात झाल्यानंतर मुख्यत्वे ज्वारी व कपाशी पिकांमध्ये संकरित ज्वारी सीएसएच-1, संकरित कापसू एच-4 ई. हे संकरित वाण कृषि विद्यापीठांनी उपलब्ध करुन दिल्यामुळे व सुधारित वाणांपेक्षा संकरित वाणापासून भरघोस उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संकरित बियाणे मागणीत वाढ झाली.

बियाण्यांची ही वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता राष्ट्रीय बीज निगम (एनएससी) या केंद्र शासनाच्या संस्थेद्वारे निवडक बीजोत्पादक शेतकऱ्यांमार्फत बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे पुरवठा करण्यात येत होता. परंतु, मागणीच्या प्रमाणात संकरित बियाणे उपलब्धता कमी पडत होती. त्यामुळे राष्ट्रीय बियाणे योजना क्रमांक एकमध्ये विविध राज्यांमध्ये राज्य बियाणे महामंडळांची स्थापना करण्यात आली.

महाबीजची स्थापना आणि उद्देश

अकोला येथे 28 एप्रिल 1976 ला राज्य सरकारनं ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ अर्थातच ‘महाबीज’ची स्थापना केलीय. अकोल्यातील कृषीनगर भागातील राज्य महामार्ग क्रमांक सहाला लागून असलेली देखणी वास्तू ‘महाबीज’चं राज्याचं मुख्यालय आहे. ‘महाबीज’ मुख्यालयाला अगदी लागूनच अकोल्याचं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तीर्ण असा परिसर आहे. महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने खात्रीचे बियाणे सहज उपलब्ध व्हावे. तेसुद्धा शेतकऱ्यांच्याच सहभागातून व्हावे, या प्रमुख उद्देशाने ‘महाबीज’ची स्थापना करण्यात आली.

‘महाबीज’मधील समभागाची मालकी

‘महाबीज’मध्ये राज्य शासनाचा 49 टक्के, राष्ट्रीय बियाणे महामंडळाचा 35.44 टक्के, कृषक भागधारकांचा 12.70 टक्के आणि कृषी विद्यापीठांचे 2.86 टक्के समभाग आहेत. ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा’ची स्थापना 1956 च्या ‘कंपनी कायद्यां’तर्गत करण्यात आली. महामंडळाच्या स्थापनेमुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना रास्तदरात उच्चदर्जाचे गुणवत्तापूर्ण बियाणे मागणीनुसार वेळवर उपलब्ध व्हावे हा शासनाचा यामागचा मुख्य उद्देश होता. सुरुवातीला महामंडळाच्या बीजोत्पादनाचा कारभार हा राज्यातील अकोला, बुलडाणा, परभणी, नांदेड या जिल्ह्यांपुरताच मर्यादित होता. परंतु, बियाण्यांची राज्यातील वाढती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने नंतरच्या काळात महामंडळाची व्याप्ती ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील इतर राज्यातही वाढविण्यात आली.

महाबीज आणि संशोधन :

‘महाबीज’चे 50 पिकांच्या 250 जातींचे बियाणे आहे. संकरित व संशोधित वाणामध्ये असलेल्या खासगी कंपन्यासोबत स्पर्धा करुन राज्यातील शेतकऱ्यांना विविध पीक वाणांचे संशोधित आणि संकरित वाण माफक दरात उपलब्ध करुन देण्याचा मुख्य उद्देश महामंडळानं ठेवला. महामंडळाद्वारे 1992-93 मध्ये स्वतंत्र संशोधन आणि विकास विभागाची स्थापना करण्यात आली. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानेसुद्धा महामंडळाच्या संशोधन व विकास कार्यास मंजुरी दिलेली आहे. महामंडळाच्या संशोधन आणि विकास विभागाद्वारे शेतकऱ्यांच्या विविध पीक वाणांबाबतच्या अपेक्षा विचारात घेऊन संशोधनास सुरुवात झाली. अथक प्रयत्नांतून संकरित ज्वारी महाबीज-7, मूग उत्कर्षा, संकरित देशी कपाशी महाबीज 904 तथा भाजीपाला पिकांमध्ये भेडी, भोपळा, चवळी, दोडक्यासह इतर संशोधित वाण उपलब्ध करण्यात आलेत. हे सर्व संशोधित वाण शेतकऱ्यांमध्येसुद्धा लोकप्रिय झालेले आहेत.

याव्यतिरिक्त महामंडळाने अकोला, खामगाव व नागपूर येथे फुलझाडे,फळझाडे आणि शोभिवंत झाडे रोपांची वितरण व्यवस्था केली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह शहरी भागातील ग्राहकवर्गही तयार झाला. सोबतच व्यापारीदृष्ट्याही या बाबीचा फायदा होत आहे. तसेच संकरित पपई रोपांची शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन या तीन केंद्रांवरुन मागणीनुसार शेतकऱ्यांना रास्त दरात पपई रोपे पुरवठा करण्यात येतो. पूर्व विदर्भातील केळी रोपांची मागणी विचारात घेता, शासनाच्या आर्थिक सहाय्यातून नागपूर येथील जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळेमधून उती संवर्धित केळी रोपे तयार करुन शेतकऱ्यांना वितरित करण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे.

प्रशासकीय रचना आणि संचालक मंडळ :
कृषि खात्याचे प्रधान सचिव महाबीजचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कृषि आयुक्त महाबीजचे पदसिद्ध सदस्य असतात. याशिवाय शेतकरी आणि बिजोत्पादकांमधून दोन संचालकांची निवडणूक होते. याशिवाय राज्य शासनाकडून एका संचालकाची निवड केली जाते. तर राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे तीन संचालक यावर असतात. तर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे ‘महाबीज’चे प्रशासकीय प्रमुख आहे.

विपनन :
‘महाबीज’ स्वत:ची अशी विपनन व्यवस्था उभी केली. याच माध्यमातून बियाण्याचं शेतकऱ्यांपर्यंत वितरण केलं जातं. ठोक आणि घाऊक विक्रेत्यांचं जाळं ‘महाबीज’नं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर उभारलं आहे. राज्य आणि देशभरात 985 विक्रेत्यांच्या माध्यमातून खरीप आणि रब्बी बियाण्यांची विक्री केली जाते.

गुणवत्ता नियंत्रण :
बियाण्यांची शुद्धता, उगवण क्षमता यासोबतच दर्जा राखण्याच्या कामावर देखरेख करणारी ‘महाबीज’ची स्वत:ची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा आहे. बियाण्यांची विश्वासहार्यता राखणं आणि टिकून ठेवण्याची सर्वात मोठी जबाबदारी या विभागावर असते. या कामात ‘महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा’ आणि कृषी विद्यापीठांचंही सहकार्य घेतलं जातं.

दरवर्षी कोणत्या प्रमुख पिकांचे किती टन/क्विंटल बियाणे उत्पादन असतं?

यावर्षी ‘महाबीज’नं खरीपासाठी उपलब्ध करून दिलेले बियाणे :

बियाणे                       विक्रीसाठी उपलब्ध (क्विंटलमध्ये) 

सोयाबीन                                3.41 लाख क्विंटल.
तूर                                          9500 क्विंटल
मुग                                          2000 क्विंटल
उडीद                                      10000 क्विंटल.
धान                                         60000 क्विंटल
हायब्रीड ज्वारी                        5800 क्विंटल
बीटी कापूस                             3500 पॅकेट्स
मका                                        3500 क्विंटल

मागील पाच वर्षांतील ‘महाबीज’नं केलेली बियाणे विक्री :

वर्ष                   बियाणे (लाख क्विंटलमध्ये)
2016                  5.11 लाख क्विंटल
2017                    6.59 लाख क्विंटल
2018                   5.97 लाख क्विंटल
2019                     8.16 लाख क्विंटल
2020                   4.28 लाख क्विंटल

उलाढाल

महामंडळाची वर्षिक उलाढाल 600 कोटींच्यावर आहे. तर महामंडळाचा नफा साधारणत: दरवर्षी 25 कोटींच्या वर असतो. यात दरवर्षी बाजाराच्या स्थितीनुसार चढ-उतार होत असतात.

बिजोत्पादनातून शेतकऱ्यांची प्रगती :

खरीप आणि रब्बी हंगामातील बिजोत्पादक शेतकऱ्यांची एकूण संख्या 30 हजारांच्या घरात आहे. यात सात हजार शेतकरी दरवर्षी सोयाबीनचं बिजोत्पादन घेतात. बिजोत्पादक शेतकऱ्यांना बिजोत्पदनापोटी मिळणारी रक्कम दरवर्षी साधारणत: 300 कोटींच्या घरात असतेय. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात जो सर्वाधिक बाजारभाव असतो त्यापेक्षा 25 टक्के अधिक रक्कम शेतकर्यांना दिली जाते. सोबतच बियाण्यांचा दर्जा चांगला असलेल्या शेतकर्यना क्विंटलमागे 100 रूपये अधिक बोनस दिला जातो. खाजगी कंपन्यांपेक्षा हा दर दोनशे ते तीनशे रुपयांनी अधिक असतो.

‘बियाणं असेल दमदार, तर पीक येईल जोमदार’ ही ‘महाबीज’ची ‘टॅगलाईन’ आहे.
source :- ABP MAJHA And Social media

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: . धानउडीदगुणवत्ता नियंत्रणतर पीक येईल जोमदारतूरबियाणं असेल दमदारबीटी कापूसमकामहाबीजमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळमहाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणामुगशेतकरीसोयाबीनहायब्रीड ज्वारी
Previous Post

जांभूळ उत्पादनाचा संपन्न वारसा – बाहडोली गाव

Next Post

पावनखिंड भाग – 12 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

पावनखिंड भाग – 12 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

GI टॅग ते जागतिक बाजारपेठ; ‘जळगाव केळी’ची आंतरराष्ट्रीय झेप

GI टॅग ते जागतिक बाजारपेठ; ‘जळगाव केळी’ची आंतरराष्ट्रीय झेप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

GI टॅग ते जागतिक बाजारपेठ; ‘जळगाव केळी’ची आंतरराष्ट्रीय झेप

GI टॅग ते जागतिक बाजारपेठ; ‘जळगाव केळी’ची आंतरराष्ट्रीय झेप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish