महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत (म. कृ. उ. वि. म.) ची स्थापना सन १९६५ साली कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणास यांत्रीक प्रक्रियेतून चालना देण्यासाठी झाली. ह्या संघटनेची स्थापना, कंपनी अधिनियम १९५६ खाली नोंदवून, करण्यात आली. आपल्या स्थापनेपासूनच, ती शेतकरी बांधवांना, शेतीमध्ये उच्च उत्पादकता प्राप्त करण्यासाठी, सक्षम बनवीत आहे.
कंपनीचे उद्दीष्ट आहे की, महाराष्ट्रातील शेतक-यांना उच्च प्रतीची खते, किटकनाशके, कृषी अभियांत्रिकी अवजारे आणि पशुखाद्य, आवश्यक प्रमाणात, वेळेवर, आणि किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे. कंपनी विवीध प्रमाणात दाणेयुक्त मिश्रीत खत (एनपीके) तयार करण्यामध्ये गुंतलेली आहे. खत कारखाने पाचोरा (जळगाव), जालना, नांदेड, वर्धा, कोल्हापूर आणि रसायनी (रायगड) येथे स्थित आहेत. ही आपल्या सहाय्यक कंपनीमार्फत [महाराष्ट्र किटकनाशके मर्यादीत (M. I. L.)], किटकनाशकांची रचना करते. या सहाय्यक कंपनीचे कारखाने अकोला आणि लोटे परशुराम (जिल्हा रत्नागिरी ) येथे आहेत. आपली खते आणि किटकनाशके ‘कृषी उद्योग’ (K. U.) या ब्रँडच्या अंतर्गत विकण्याव्यतिरिक्त कंपनी आपल्या १५०० वितरकांचा उपयोग इतर नामवंत कंपन्यांची पुरक उत्पादने विकण्यासाठी देखील करते.
कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा चिंचवड (पुणे) येथे आहे. येथे कृषीव्हेटर (ट्रॅक्टरने चालविल्या जाणारे अवजार) तयार केल्या जाते. कंपनीकडे पशुखाद्य तयार करणारा कारखाना चिंचवड (पुणे) येथे आहे. हे विविध संयोगांचे पौष्टिक पशुखाद्य तयार करून विकतात आणि यांच्यात विशिष्ट गरजेनुसार खाद्यांमध्ये बदल करण्याची क्षमता देखील आहे. कंपनीकडे नागपूर येथे एक कारखाना आहे ज्यात विविध फळांचा रस, स्क्वेश, सिरप, जाम, केचप, इत्यादी तयार केल्या जातात व नोगा या अत्यंत लोकप्रिय ब्रँडखाली विकल्या जातात. नोगा हा ‘नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन’ यापासून तयार झालेला शब्द आहे. ‘नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन’ हे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या ताब्यात १९७२ मध्ये दिले.
कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर १२ प्रादेशीक कार्यालये रत्नागिरी, कोल्हापूर, नाशीक, जळगाव, पुणे, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे स्थित आहेत. ठाणे व मुंबई जिल्ह्यासाठी ठाणे सहाय्यक प्रादेशीक कार्यालय मुख्य कार्यालयात स्थित आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे ही राज्य नोडल एजन्सी म्हणून देखील नियुक्त केली गेली आहे. ही राज्य नोडल एजन्सीच्या भुमिकेत, विवीध योजनांतर्गत उद्योजकांच्या प्रस्तावांची छाननी करून भारत सरकारला योग्य ते प्रस्ताव पाठवते. ही उद्योजकांना देखील प्रकल्प तयार करण्यास व क्षेत्र निवडण्यास मदत करते. तसेच नागपूर जवळ बुटीबोरी येथे फूड पार्क देखील विकसीत केले आहे. याव्दारे लहान ते मध्यम फूड प्रोसेसिंग युनिट्ससाठी सामान्य पायाभूत सुविधांची उपलब्धता करून दिल्या जाते. कंपनी मुंबईत फुलांचे लिलाव केंद्र स्थापन करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहे.
माहितीश्रोत- महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत.