प्रतिनिधी: जळगांव
मुंबईसह राज्यात दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान आहे. हा पट्टा आता पश्चिमकडे सरकत असून त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात ११ ते १३ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे व उत्तरेकडील थंड वारे यामुळे राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात पुढील दोन दिवसात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणातही घट होत आहे. उत्तर महाराष्ट्रात ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत वातावरणातही घट होईल असे सांगण्यात आले आहे. नंदुरबार, धुळे, जळगांव येथील वातावरण २४ ते २६ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येथे याच कालावधीत गारपीटचा अलर्ट देण्यात आहे. मात्र हे ढगाळ वातावरण १ ते २ दिवसात निवळू शकते. शेतकऱ्यांनी पशुधन व शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना हवामान विभागाने दिलेल्या आहेत.
It’s really very situation of farmers in kharif all crops not production up to cost of cultivation but in rabi also gram wheat banana crop may be affected