• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आला पोळा कपाशी सांभाळा … पिकांवर का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी, जाणून घ्या अमावस्येचे पीक व्यवस्थापन …

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 24, 2022
in हॅपनिंग
6
आला पोळा कपाशी सांभाळा

सौजन्य गूगल

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : आला पोळा कपाशी सांभाळा … हे वाडवडील सांगून गेले. श्रावणी अमावस्या म्हणजेच पोळा अमावस्या फवारणी आणि कापूस व इतर पिकांवर रोगराई, गुलाबी बोंड अळी व इतर अळी प्रादुर्भाव यांचे जुने नाते आहे. त्यामुळेच का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी आणि आपल्या पिकांची काळजी, अमावस्येचे पीक व्यवस्थापन हे पोळा सण काळात कसे करावे, ते आपण जाणून घेऊ.

कापूस फवारणी आणि अमावस्या यांचे खूपच जुने नाते आहे. आपल्या चार पिढ्यांना अनुभवातून पोळ्याला फवारणी करायची असते हे माहिती आहे. गेले अनेक वर्षे गावागावात ते पथ्य पाळले जाते. अनेकांना असे का करावे, हे भलेही माहिती नसेल; पण तर ही परंपरा पाळतात. आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत या परंपरेमागील शास्त्र.


आला पोळा कपाशी सांभाळा ही पोळा श्रावणी अमावस्या फवारणी कशासाठी?

अमावस्येच्या काळात नेमक्या अशा काय गोष्टी घडतात, की पिकांवर फवारणी आवश्यक ठरते. विशेषत: कपाशी, कापूस पिकाला तर ते फारच आवश्यक ठरते. कापूस पिकाच विचार घेतल्यास पोळ्याची अमावस्या अतिशय महत्त्वाची ठरते. यंदा शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी पोळा सण आहे. त्याच दिवशी श्रावणी अमावस्येचा मुहूर्त आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असेही म्हटले जाते. या अमावस्या काळातच कापसाला पातेधारणा होते, फुलधारणा सुरू होते. पेरणी काळानुसार काही शेतकऱ्यांच्या शेतात तर कपाशी लागायलासुद्धा सुरुवात झालेली असते. या काळात कपाशी व इतरही उगवण झालेली पीके रोगराईमुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक असते. भाद्रपदाचे कडक उन्हं सुरू होण्यापूर्वी संततधार, उघडीप न देणाऱ्या पावसाच्या या श्रावणाच्या शेवटच्या काळात रोगराई मातू शकते. तिला नियंत्रण घालणे आवश्यक ठरते.


कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावास सुरुवात

पोळा अमावस्येच्या वेळीच कपाशी पिकावर फवारणी अतिशय महत्त्वाची असते. या फवारणीत नेमके कोणते कीटकनाशक आणि कोणती बुरशीनाशके व टॉनिक वापरणे गरजेचे आहे, तेही पाहणे आवश्यक आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोळा अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात. त्याचा परिणाम 5-6 दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे न उमललेली कळी दिसू लागते.

नेमकी कोणती फवारणी करावी?

बोंडअळीला आपण मारू शकत नाही. मात्र, तिच्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यासाठी अमावस्येच्या आदल्या दिवशी फवारणी करणे आवश्यक असते. अळी ही अति सूक्ष्म अवस्थेत कैरीच्या आत जाण्याअगोदरच अळीनाशक फवारा मारणेही आवश्यक असते. बोंडअळी अंडी घालण्याआधी तीन दिवसांपर्यंत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन 0.15 टक्के प्रवाही (एनएसकेई बेस) 25 मिली असे प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. स्प्रेडर 5/7 मिली फवारणीही चालते. वातावरणात पुरेशी आर्द्रता असल्याने बिव्हेरिया बॅसियाना 40 मिली हे प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


अमावस्येचे पीक व्यवस्थापन – पिकांवर फवारणी करताना ही काळजी अवश्य घ्या

बोंडअळीची अंडी नष्ट करण्यासाठी प्रोफेनोफॉस 40 % सायपरमेथ्रिन 04 % घटक असलेले कोणत्याही कंपनीचे कीटकनाशकसुद्धा प्रभावी ठरू शकते. याबरोबरच कपाशी पिकात पातेगळ होऊ नये यासाठी बुरशीनाशक व पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी चांगल्या दर्जाचे टॉनिकही वापरावे. पातेधारणा कमी दिसत असल्यास 12-60-00 या विद्राव्य खताचा वापर करावा. फवारणी करताना कंपनीने सूचना दिल्यानुसारच औषधाचे प्रमाण ठेवावे. ते घटक कमी-जास्त करू नयेत. याशिवाय, फवारणीचे चांगले परिणाम दिसून येण्यासाठी सिलीकॉन बेस स्टिकर अतिशय उपयुक्त ठरू शकते. फवारणीसाठी खूप दिवस साठवून ठेवलेले किंवा पावसाचे पाणी मुळीच वापरू नये.

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाच्या उत्पादनात तब्बल 40 ते 50 टक्क्यापर्यत नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पोळ्याच्या अमावस्येची फवारणी करणे अतिशय जरुरीचे आहे. त्यामागे अनेक वर्षांची परंपरा आहेच; पण कृषी विद्यापीठांनी सांगितलेले शास्त्रही आहे.

 

तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
फलटणचा उच्चशिक्षित 28 वर्षीय तरुण करतोय आधुनिक हायड्रोपोनिक शेती!
यंदा मुबलक अन्नधान्य उत्पादन; 5 वर्षांतील उच्चांक! जाणून घ्या ऊस, कापूस, कडधान्य, तेलबियांचा अंदाज…


Share this:

  • Facebook
  • X
Tags: आला पोळा कपाशी सांभाळागुलाबी बोंड अळी प्रादुर्भावपिकांची काळजीपोळा अमावस्याश्रावणी अमावस्या फवारणी
Previous Post

चौगावच्या तरुण शेतकर्‍याने फळबागेतून साधली आर्थिक समृध्दी!

Next Post

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2022 23

Next Post
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2022 23

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2022 23

Comments 6

  1. किरण मोहन पाटील मु पोस्ट दोंदवाडे ता जामनेर जि जळगाव says:
    3 years ago

    खूप सुंदर माहिती मिळाली वाट्स अप ला माहिती मिळाली पाहिजे पर डे

    • Team Agro World says:
      3 years ago

      https://chat.whatsapp.com/Jifvtj3G7cG9woNJRQVPAq

      या लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन व्हा. रोज व्हॉटस् अप वर उपयुक्त माहिती मिळेल आपणास. धन्यवाद.

  2. Nitin nemade says:
    3 years ago

    Cotton

  3. Pingback: राज्यातील धरणांत 83 टक्के पाणीसाठा
  4. Pingback: शेणखताचे महत्त्व : सेंद्रिय कर्ब उत्पादकता वाढीत शेण खताचे फायदे.. निमित्त बैल पोळा..! - Agro World
  5. Pingback: ग्राहक व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासनाने आणली 'ही' योजना जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.