• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

विषारी कीटकनाशक फवारणीला पर्याय !

Team Agroworld by Team Agroworld
August 13, 2021
in तांत्रिक
0
विषारी कीटकनाशक फवारणीला पर्याय !
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आशुतोष सुरेंद्र चिंचोळकर/ यवतमाळ 
पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय म्हणजेच कामगंध सापळे यास इंग्रजीत ‘ फेरोमोन ट्रॅप किंवा ‘ फनेल ट्रॅप’ असेही म्हणतात. हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदुषणविरहीत उपाय आहे. हा नरसाळयाच्या आकाराचा असून प्लॅस्टिकचा बनविलेला असतो. त्याची खालची बाजू मोकळी असून त्यास एक प्लॅस्टिकची पिशवी लावण्यात येते. वरची बाजू एका झाकणाने झाकली असते. त्यास आतील बाजूस ‘ आमिष ‘ लावण्याची सोय असते. त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येते. नर कीटक हा मादीच्या मिलनासाठी त्या वासाने या सापळ्याकडे आकर्षित होतो, फनेलमध्ये येतो, घसरून खाली पिशवित पडतो व काही दिवसांनी मरतो. त्यांचे मिलन होत नाही, अंडी देण्याची प्रक्रिया थांबते. याद्वारे किडींच्या उत्पादनाचे नियंत्रण होते .

 कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी.

१ कीटकनिहाय सापळ्याची निवड करावी.

२ सापळ्यात अडकलेले पतंग 2-3 दिवसांनी काढून नष्ट करावेत.

३ सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकासाठी हेक्टरी 5 सापळे वापरावेत, परंतु किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी हेक्टरी 15 ते 20 सापळे वापरावेत.

४ सापळ्यामधील लिंग प्रलोभने 15 ते 20 दिवसांनी बदलावीत.

५ सापळा हा साधारणपणे पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून 2 ते 3 फुटांवर राहील याची काळजी घ्यावी.

६ सापळा वाऱ्याच्या दिशेला समांतर असावा, ज्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षिले जातील.

कामगंध सापळ्यांच्या वापराचे फायदे.

१ किडीचे प्रौढ व मादी यांची शेतातील स्थिती ठरविण्यासाठी कामगंध सापळ्याचा मुख्यत उपयोग होतो.

२ फेरोमोन सापळ्यांच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य त्या वेळी कीड व्यवस्थापन पध्दत ठरविता येते. तसेच आवश्यक त्या कीटकनाशकांची निवड करून फवारणी करता येते .

३ एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशकांच्या किंमतीचा व फवारणीचा खर्च टाळता येतो.

४ सापळ्यातील रसायनामुळे पर्यावरणावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही.

५ रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे परोपजीवी कीटक व मित्र कीटक सुरक्षित ठेवण्यास मदत होते. कीड व्यवस्थापनाची ही पद्धती वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे.

६ सापळ्यांचा खर्च किटकनाशकंच्या खर्चापेक्षा कमी आहे.

७ सापळ्यांच्या वापरामुळे मानव, पशु, पक्षी, प्राणी यांना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो.

कीडनिहाय कामगंध प्रलोभने.

किडीचे नाव फिरोमोन /ल्युर किडग्रस्त पिके
हेलीकॉवर्पा आर्मिजेरा ( अमेरिकन बोंडअळी / घाटेअळी ) हेलील्युर कापूस ,कडधान्य , सुर्यफुल ,  सोयाबीन , वांगी.
पेक्टीनोफोरा गोसिपायल्ला ( शेंदरी बोंडअळी ) पेक्टीनोल्युर

गोस्सिपल्युर

 

कापूस.
इरीयास व्हायटेला

इरीयास इन्सुलाना (ठिपक्याची बोंडअळी)

इरविटल्युर

इरविनल्युर

कापूस, भेंडी.
स्पोडोप्टेरा लीटयूरा (पाने खाणारी अळी) स्पोडोल्युर तंबाखू कापूस , सोयाबिन , मिरची .
सिफोफ्यागाल्युर इन्सरटूलस (धानावरील खोडकिडा ) सिर्फाफ्यागाल्युर भात.
प्लुटेल्ला झायलोस्टेला पेक्टीनोफोराल्युर कोबी, फुलकोबी.
ड्याकस डोर्यालीस (फळ माशी) मिथिल युजेनॉल फळपिके.
भाजीपाला वरील फळ माशी क्युल्युर भाजीपाला पिके.

 

गंधसापळे तयार करण्याची पद्धत

१) सर्वप्रथम विविध आकारांचे प्लॅस्टिकचे डबे अथवा कीडनाशकाचे रिकामे डबे घेऊन त्यास मधोमध आरपार छिद्र पाडावे. डब्याच्या झाकणाला तार जाईल एवढेच ते छिद्र असावे.

२) झाकणाच्या छिद्रातून तार घालून त्यात कापसाचा बोळा लावावा.

३) डब्यात २०० मि.लि. पाणी टाकून त्यात एक मि.लि. डायक्लोरव्हॉस कीटकनाशक टाकावे.

४) कापसाचा बोळा व डायक्लोरव्हॉस मिश्रित पाण्यात अंतर असावे.

५) कापसाच्या बोळ्याला मक्षीकारी किंवा मिथिल युजेनॉल हे गंध प्रलोभन लावावे. याकडे नर पतंग आकर्षित होतात व खालील कीडनाशकमिश्रित पाण्यात पडून मरतात.

६) एकरी आठ ते दहा सापळे लावावेत.

७) प्रत्येक आठवड्यानंतर प्रलोभन व कीडनाशकमिश्रित पाणी बदलावे .

यामध्ये कीडनाशक व प्रलोभनासाठीच खर्च येतो. एरवी हा सापळा खरेदी करण्यासाठी ३००ते ३५० रुपये लागतात. डबे विकत आणून जरी घरी सापळे तयार केले तरी ३५ ते ४० सापळे तेवढ्याच खर्चात तयार करता येऊ शकतील. त्यांचा वापर एकरी दहा सापळे याप्रमाणे चार एकर क्षेत्रासाठी करता येईल.

प्रकाश सापळे

पावसाळ्यात प्रामुख्याने अनुकूल वातावरणात किडींचा उपद्रव व प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. ह्या गोष्टीला विचारात घेऊन कोणत्याही पिक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे. प्रकाश सापळ्यांच्या मदतीने नर व मादी यांच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यास मदत होते. बाजारात वेगवेगळे प्रकारचे प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. प्रकाश सापळे वापरण्यात सोपे असतात सोबतच लाभदायक कीटकासाठी हानिकारक नाही आहे. सोबतच काही प्रकाश सापळे सौर उर्जेवर सुद्धा चाललात.

प्रकाश सापळ्याचे महत्व :

१ प्रकाश सापळे पिकातील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते.

२ हंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्याचे वापर केल्यास पिक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यात मदत होते.

३ प्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे.

४ प्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल आहे. सापळे जाड प्लास्टिकने बनले असल्यामुळे टिकाऊ आहेत.

५.प्रकाश सापळ्यांमुळे कमी वेळात हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवता येतो .

पिकांमध्ये लावण्याची पद्धती

१ प्रकाश सापळे पिकाच्या मध्यभागी लावावे उदा. १ प्रकाश सापळा प्रति हेक्टर.

२ पिकांपासून हे सापळे १.५ फुट उंच लावावे.

३ चांगल्या परिणामासाठी संध्याकाळी ७ ते ११ या दरम्यानच्या काळात चालू ठेवावे.

पिके त्यावरील किडींचे प्रकाश सापळ्यामुळे व्यवस्थापन

१) धान – खोडकिडा, पाने गुंडाळणारी, तुडतुडा, हुमणी.

२) कडधान्य शेंग पोखरणारी अळी, नाकतोडा, कटवर्म

३) मका – खोडकिडा

४) सोयाबिन -उंटअळी व लष्करी अळी

५) भाजीपाला – फळ व शेंगा पोखरणारी अळी, डायमंड बॅक मॉथ, सेमीलुपर

६) ऊस – पायरिला, हुमणी, तुडतुडा, खोड पोखरणारी अळी

७) भुईमुग- केसाळ अळी, फुलकिडे

८) आंबा – पतंग, मोल क्रिकेट.

पक्षी थांबे

हानिकारक किडींपासुन पिकांचे संरक्षण करण्यामध्ये पक्षांची महत्वाची भुमिका आहे. ९० % पक्षी मांसाहारी आहेत. सुमारे ३३ % नियंत्रण पक्षांमार्फत होऊ शकते. शेतामध्ये मध्यापेक्षा बांधावर आणि झाडाच्या जवळ किडींचे प्रमाण कमी असते. पक्षांपासुन होणारा फायदा पाहता काही प्रसंगी पक्षांपासुन होणारे नुकसान गौण ठरते.
१ कपाशी लागवड करतांना बियासोबत मका व सुर्यफुलांचे दाने मिसळुन लावावेत.

२ हरभरा किंवा कपाशी पिकांत सकाळी पक्षांना दिसेल अशा उंचीवर भात ठेवावा त्यामुळे पक्षी आकर्षित होतात.

३ टीव्ही अँटेनाप्रमाणे शेतात काही ठिकाणी लाकडी पक्षी थांबे उभा केल्यास पक्षांना बसण्यास जागा उपलब्ध होते.

४ पक्षांकरीता पाण्याची व घरटयांची सोय करावी जेणेकरुन पक्षी कायमचे शेतात थांबतात.

चिकट सापळे

कोणत्याही पिकामध्ये रससोशक किडी जसे मावा, तुडतुडे, फुलकिडे, ढालकिडे, नागबळी, पांढरी माशी इत्यादी पिकांच्या वाढीच्या अवस्थेत हल्ला करतात. त्यामुळे पिकांच्या वाढीचा वेग मंदावतो व यांनी केलेल्या घावातून बुरशीजन्य रोगांची लागन होते तसेच या किडींमुळे विषाणुजन्य रोगांचाही प्रसार होतो. त्यामुळे त्यावर पिवळे चिकट सापळे प्रभावी ठरतात .

१ शक्यतो करुगेटेड शीटपासुन बनवलेले सापळे वापरावेत.

२ विशीष्ट पिवळया किंवा निळया रंगामुळे किडयांना नवीन पालवी असल्याचा भास होतो व सापळयाकडे आकर्षित होतात, एकदा सापळयावर बसली की चिकट द्रवामुळे किड अडकते व मरते.

३ चिकट सापळयांची उंची पिकाच्या थोडी वर ठेवावी.

४ किडींचा प्रकार व संख्येचे निरीक्षण करण्यासाठी एकरी ६ सापळे लावावेत.

५ सापळयांच्या माध्यमातुन किड नियंत्रण करायचे असल्यास एकरी १२ ते १८ सापळे वापरावेत. तर किड नियंत्रणाबाहेर जात असेल तर सापळयांची संख्या वाढवत जावी.

६ जेव्हा सापळयांचा पृष्ठभाग किडींनी भरुन जाईल तेव्हा नवीन सापळ्यांचा वापर करावा.

 आशुतोष सुरेंद्र चिंचोळकर
(९१४६९६६२२२)

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कामगंधगंधसापळेपक्षी थांबेपतंगप्रकाश सापळेविषारी कीटकनाशकसापळे
Previous Post

खान्देशची केळी कोकणच्या मातीत

Next Post

१० गुंठे क्षेत्रातून २ लाखांचा निव्वळ नफा

Next Post
१० गुंठे क्षेत्रातून २ लाखांचा निव्वळ नफा

१० गुंठे क्षेत्रातून २ लाखांचा निव्वळ नफा

ताज्या बातम्या

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

ड्रोन फवारणी

ड्रोन फवारणीतून महिला करतेय 60 ते 70 हजारांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.