• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कुस्तीपटू उद्धव कदमची दुग्धप्रक्रियातून भरारी

दुग्धप्रक्रीयेतून महिन्याला लाखोंचा नफा

Team Agroworld by Team Agroworld
March 10, 2021
in यशोगाथा
1
कुस्तीपटू उद्धव कदमची दुग्धप्रक्रियातून भरारी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सचीन कावडे/ नांदेड
दख्खन पठाराचाच एक भाग  असलेल्या  महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवरील, मराठवाडयातील एक प्रमुख जिल्हा नांदेड. नांदेड जिल्हा दुध व दुध प्रक्रिया उद्योगात आपली नवीन ओळख तयार करत आहे. नवनवीन युवा शेतकरी ही नवीन ओळख तयार करत असून. असेच एक दुग्धोत्पादक शेतकरी उद्धव रामराव कदम हे नांदेड शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकी या गावात आहेत. ३० वर्षीय कुस्तीपटू असलेल्या उद्धव रामराव कदम यांनी पारंपरिक शेतीला दुग्धव्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योगाची जोड देऊन महिना लाखो रुपयांचा नफा मिळवित दुग्ध व्यवसायात भरारी घेऊन नव्याने या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांपूढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

खडकी हे चहूबाजूने हिरवाईने नटलेले छोटस टुमदार गांव. शहराजवळील मरळग पोस्ट असलेल्या खडकी या गावाची लोकसंख्या जेमतेम साडेपाचशे आहे. बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे.  याच गावात उद्धव कदम हे आपल्या एकत्रित कुटुंबासह राहतात. आपली वडिलाेपार्जित शेती सांभाळत त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणापेक्षा कुस्तीचीच जास्त आवड असलेल्या उद्धवने विभागीय, राज्यस्तरीय व अशा वेगवेगळ्या कुस्ती स्पर्धा गाजविल्या आहेत. कुस्तीमल्ल विद्या महाराष्ट्र राज्य या संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. आखाड्याच्या मातीबरोबरच त्यांचे शेतीच्या मातीशी देखील एक अतूट नाते आहे. त्यामुळे त्यांनी शेतीकडे देखील सुरुवातीपासूनच विशेष लक्ष दिले आहे.
एकत्र कुटुंब हीच ताकत

आज शहरासोबतच गावातही विभक्त कुटुंब पद्धतीचा प्रसार झाला आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती नामशेष होते की काय अशी स्थिती असतांना उद्धव कदम याचे कुटुंब याला अपवाद आहे. कदम यांच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने त्यांच्या कुटुंबात वडिलांच्या दोन भावंडांचा परिवार, सुना, मुले-मुली, नातवंडे असा जवळपास ३५ ते ४० सदस्यांचा परिवार एकत्रित गुण्यागोविंदाने राहतो. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे त्यांची एकत्रित ८० एकर शेती कसायला काही अडचण येत नाहीत. इतर ठिकाणी अडचण ठरणारी एकत्र कुटुंब पद्धती कदम परिवारासाठी मात्र ताकत ठरली आहे.

व्यवसायाची सुरुवात

कदम यांच्या शेतीमध्ये ऊस, केळी, मोसंबी व हळद ही नगदी पिके घेतली जातात. सुरुवातीपासूनच प्रयोगशील असणाऱ्या उद्धव यांनी शेती करत असतांना पारंपारिक शेतीला अजून काही पर्याय उभा करता येईल का याचा विचार करतांना त्यांना कृषी विभागाच्या कार्यशाळेत दुध व्यवसायात असलेली संधी जाणवली. नांदेड शहर जवळच असल्याने दुधाला हक्काची बाजरपेठ मिळेल या हेतूने  वयाच्या २७ व्या वर्षी शेतीला जोड व्यवसाय काही तरी केला पाहिजे म्हणून त्यांनी दुध व्यवसाय करण्याचे निश्चित केले. त्यांनी जुलै २०१७ मध्ये धुळे येथून (स्वखर्चातून) जाफराबादी जातीच्या दोन म्हशी आणल्या आणि या व्यवसायाला सुरुवात केली.

एका जाफराबादी म्हशीची किंमत ७० हजार या प्रमाणे दोन म्हशी १ लाख ४० हजार रुपये खर्च करून आणल्या. एक म्हैस दिवसाकाठी १० ते १५ लिटरच्या जवळपास दुध देत असे, सदर दुध नांदेड येथील छत्रपती चौकात आणून विकण्यास सुरुवात केली. ६० रुपये लिटर दराने विक्री करुन दिवसाकाठी १ हजार रुपयांच्या जवळपास उत्पन्न त्यांना मिळू लागले होते. तर २५० ते ३०० रुपये दोन्ही म्हशींच्या खाद्यासाठी खर्च होत असे. म्हणजे महिन्याकाठी दुधाच्या व्यवसायातून ९ हजार रुपये खर्च होऊन २१ ते २२ हजार रुपयांचा नफा त्यांना मिळू लागला होता. एकाच महिन्यातच मिळणारे उत्पन्न पाहून त्यांनी पुन्हा ऑगस्ट २०१७ मध्ये धुळे येथून अजून तीन जाफराबादी म्हशी आणल्या. आणि अजून व्यवसाय वाढविला. दोन जाफराबादी म्हशीपासून सुरु झालेला व्यवसाय आज ४५ म्हशींपर्यंत पोहचला असून वाढलेल्या दुग्धव्यवसायासाठी त्यांना मोठे बंधू संदीप मारोतराव कदम हे मदत करतात. त्याचबरोबर अन्य दोन माणसे त्यांनी रोजगार देवून कामाला सोबत घेतली आहेत.
दुग्ध व्यवसायाला प्रक्रिया उद्योगाची जोड

उद्धव त्यांचे बंधू संदीप व अन्य दोघेजण असे हे चारही जण दररोज सकाळी ४ वाजता उठून म्हशींचे दुध काढून दोन दुचाकीवर दुध नेऊन छत्रपती चौकात असलेल्या कन्हैया दुध डेअरी या स्वतः सुरु केलेल्या डेअरीवरुन दुधाची विक्री करतात. सकाळी व सायंकाळी असे मिळून दिवसाकाठी जवळपास २४० लिटर दुधाची विक्री करतात. यापासून त्यांना साडेचार लाख रु पर्यंत नफा मिळतो. यातूनच ते पशुखाद्य व कामगारांचा पगार या गोष्टींचे नियोजन करतात. दुध व्यवसायात स्थिरावल्यानंतर कदम बंधूनी दुग्धजन्य पदार्थ निर्मीतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली असून. विशेषतः दिवसाकाठी शिल्लक राहणाऱ्या दुधावर ते प्रक्रिया करतात. त्यासाठी कोणतीही मशीन न वापरता घरगुती पद्धतीने पनीर, खवा आणि तूप बनविण्याचे काम केले जाते. दिवसाकाठी २० ते २५ किलो पनीर, ७ ते ८ किलो तूप तयार केले जाते तर ऑर्डरप्रमाणे खवा बनवून देण्यात येतो. त्यांनी बनविलेल्या दुग्धजन्य पदार्थांना परिसरात चांगली मागणी असून आता यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

दुग्धप्रक्रीयेतून महिन्याला लाखोंचा नफा

उद्धव कदम यांच्याकडे आजघडीला ४५ म्हशी आहेत. यापैकी २५ दुधाळू आहे तर अन्य म्हशी या गाभण आहेत. एक म्हैस दिवसाकाठी १० ते १५ लिटरच्या जवळपास दूध देते. सकाळी व सायंकाळी असे मिळून दिवसभरात एकूण २४० लिटरच्या जवळपास दुध काढून ६० लिटर दराप्रमाणे विक्री केल्या जाते. तसेच दिवसाला शिल्लक राहणाऱ्या दुधावर घरगुती पद्धतीने प्रक्रिया करून दररोज पनीर, तूप, खवा ऑर्डरप्रमाणे तयार करून दिला जातो.  १ किलो पनीर २८० रुपये तर तूप १ किलो ७०० रुपये दराने विक्री केले जाते. महिन्यात जवळपास ७५० किलो पनीर व सरासरी २५० किलो तूप वरील दराप्रमाणे विक्री केले जाते. या प्रक्रिया उद्योगातून त्यांना महिन्याकाठी साडेतीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळत आहे.

प्रतिक्रिया
शेती व मातीशी अतूट नाते

लहानपणापासूनच मातीशी माझा जवळचा संबध आहे. मग ती माती कुस्तीच्या आखाड्याची असो. शेती व मातीशी माझे अतूट नाते आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच शेतीकडेही माझे लक्ष होते. मी शेतीबाबत विविध कार्यक्रमात देखील सहभागी होत असे. वडिलोपार्जित असलेली शेती करीत असतांना सन २०१७ मध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मातंर्गत गावात दूग्ध उत्पादन शेतीशाळा कार्यशाळेतून आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रशेखर कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करतांना शेतीला जोड व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन करुन दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती सांगितली. कदम सर आणि पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश बुन्नावार यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे दूध व्यवसाय व प्रक्रिया उद्योगातून चांगला नफा मिळवित आहे.

उद्धव कदम, दूग्ध व्यवसायिक, खडकी नांदेड.
९२८४९७१७४७

कार्यशाळेच्या मध्यमातून घडताहेत युवा शेतकरी

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मातंर्गत विविध गावात मार्गदर्शन केले जाते. सन २०१७ मध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मातंर्गत खडकी या गावात दूग्ध उत्पादन शेतीशाळेच्या कार्यशाळेतून उद्धव कदम व परिसरातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना दूध उत्पादक पदार्थाच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. सहलीच्या माध्यमातून पुणे येथील कृषी प्रदर्शनात दूध उत्पादनाचे महत्त्व कदम यांच्यासह अन्य शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. तसेच आत्मातंर्गत राबविण्यात आलेल्या कार्यशाळेतून ही वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. याचा परिणाम म्हणून आता परिसरात दुग्ध व्यवसाय व प्रक्रिया उद्योगाला चालना मिळत आहे. नवनवीन युवा शेतकरी या कार्यशाळेच्या मध्यमातून घडत आहेत.

चंद्रशेखर कदम – तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, नांदेड.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कुस्तीपटूतालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मादुधदुध प्रक्रिया उद्योगनांदेड
Previous Post

इतिहास जागतिक महिला दिनाचा…

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

Comments 1

  1. satish wagare says:
    4 years ago

    उत्कृष्ट मांडणी

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.