एका शेतकऱ्याने शोरूममधील सेल्समनचा उतरवला माज… शेतकऱ्याचा नाद न्हाय करायचा.
बंगळुरू – एक शेतकरी गाडीची विचारपूस करण्यासाठी शोरूममध्ये गेला असता शेतकऱ्याचे कपडे व त्याच्याकडे पाडून सेल्समनने त्याचा अपमान केला. यावर शेतकऱ्याने 10 लाख रुपये आणून देतो तुम्ही गाडी तात्काळ द्या, असे आव्हान सेल्समनला दिले. शेतकऱ्याने तासाभरात पैसे आणले सुद्धा.. पण सेल्समन गाडी देऊ शकला नाही. त्यामुळे वाद वाढला व तो थेट पोलिसांत पोहोचला.
कर्नाटकातील तुमकूर येथील महिंद्रा शोरूममध्ये एका सेल्समनने शेतकऱ्याचा अपमान केल्याचा प्रकार व्हायरल झाला आहे. केम्पेगौडा हे सुपारी उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जाणारे गावकरी..! केम्पेगौडा हे महिंद्रा शोरूमध्ये त्यांच्या मित्रांसोबत कार खरेदीची चौकशी करण्यासाठी गेले असता एका सेल्समनने त्यांचा अपमान केला.
खिशात 10 रुपये नसतील आणि आला…
झाले असे की, सुपारी उत्पादक शेतकरी असलेले केम्पेगौडा जेव्हा त्यांची ड्रीम कार SUV गाडीची चौकशी करण्यासाठी शोरूममध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडे पाहून तेथील सेल्समन एक्झिक्युटिव्हने आधी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर केम्पेगौडा यांनी गाडीबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता सेल्समन वैतागून त्यांना उद्धटपणे बोलला, “खिशात 10 रुपयेही नसतील, 10 लाख रुपये सोडा… आणि आले गाडी घ्यायला”, असे सांगून सेल्स एक्झिक्युटिव्हने त्याचा अपमान केला होता. त्यावर 10 लाख रुपये आणलेत तर तात्काळ गाडी द्या, असे आव्हान देत शेतकरी शोरूममधून निघून गेला.
https://www.facebook.com/AgroWorldLive/videos/621949429079451/
तासाभरात 10 लाख आणले पण..
एका तासाने शेतकरी केम्पेगौडा त्यांच्या मित्रांसोबत दहा लाख रुपये घेऊन परत आले आणि गाडीची मागणी केली. परंतु, सेल्स एक्झिक्युटिव्ह डिलिव्हरी करू शकले नाहीत. गाडीला वेटिंग असल्याने दोन ते तीन दिवस लागतील सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या केम्पेगौडा यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सेल्स एक्झिक्युटिव्हने मागितली शेतकऱ्यांची माफी
प्रत्युत्तरादाखल हादरलेल्या शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी शेतकरी केम्पेगौडा आणि त्यांच्या मित्राला तीन दिवसांत कारची डिलिव्हरी होणार असल्याची माहिती दिली. तुम्ही पैसे आणल्यास गाडी देणार होतात, आता हे पैसे घ्या व गाडी द्या, असा आग्रहच केम्पेगौडा यांनी लावून धरत मित्रांसह शोरूममध्ये ठिय्या आंदोलन केले. एव्हढेच नाही तर त्यांनी तुमकूरमधील टिळकनगर पोलिस ठाण्यात शोरूमच्या कर्मचार्यांविरुद्ध असभ्य वर्तन आणि टोमणे मारल्याबद्दल पोलिस तक्रार नोंदवली. शोरूमचा सेल्समन आणि इतर कर्मचाऱ्यांनी यानंतर केम्पेगौडा यांची माफी मागितली आणि त्यांना हस्तलिखित माफीनामा पत्रही दिले. माफीनाम्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवले. मात्र, शोरूममधून बाहेर पडता पडता यापुढे शेतकऱ्यांना कमी लेखू नका व कपड्यांवरून कोणाचीही पारख करू नका, हे सांगण्यासही केम्पेगौडा विसरले नाही.
शेतकरी आहे म्हणून दोन वेळच खायला मिळतेय,जास्त माज करायचा नाही ..स्वतः आनंद महिंद्रा जी शेतकऱ्या नचा किती मान ठेवतात.
शेतकरी आहे म्हणून दोन वेळच खायला मिळतेय..