मुंबई : Yashogatha (Success Story).. काही तरी नवे करण्याची जिद्द असली व त्या दिशेने वाटचाल केली तर माणूस एक ना एक दिवस यशाचे शिखर गाठतोच. अशीच एक किमया करून दाखविली आहे राजस्थान येथील एका 21 वर्षीय तरूणाने. यशराज साहू असे या तरुण शेतकर्याचे नाव असून त्याने कोणत्याही मातीचा वापर करता व लटकत्या बॅगांच्या सहाय्याने ऑयस्टर मशरूमची शेती करून शेतीपासून लांब पळणार्या नव्या तरुणांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 🌱
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
यशराज साहू याने आपला 24 वर्षीय मित्र राहुल मीणा याच्या मदतीने 625 स्केअर फुट रिकाम्या पडलेल्या प्लॉटवर ऑयस्टर मशरूमच्या शेती केली आणि पहिल्याच प्रयत्नात 45 ते 60 दिवसात 80 किलो मशरुमचे उत्पादन देखील घेतले. यशराजने एवढ्यावर न थांबता एमएसव्हीओ अॅग्रो स्टेप्स प्रा.लि. नावाची कंपनी देखील स्थापन केली असून आता तो या कंपनीच्या माध्यमातून मशरुम उत्पादक शेतकर्यांकडून बाजार भावापेक्षा जास्त दराने मशरुम खरेदी करून जास्तीत जास्त शेतकर्यांना मशरुमच्या शेतीशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.
लहानपणा पासूनचे स्वप्न
एका गरीब घरात जन्मलेल्या यशराजने शालेय जिवनापासूनच मशरुमच्या व्यवसायात आपली कारकिर्द करण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इयत्ता 11 वी मध्ये शेतकी (Agriculture) मध्ये प्रवेश घेवून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने बीएस.सी (Bsc. Agri) मध्ये प्रवेश घेतला. आता तो बीएससीच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. बीएससीचे शिक्षण घेत असतांनाच त्याने देहरादून येथील कृषी वन नावाच्या संस्थेत 1 महिन्यापर्यंत मशरूमची शेती कशा पद्धतीने करावी, याचे धडे घेतले. त्यानंतर त्याने 2018 मध्ये 50 बॅगांमध्ये मशरूम उगविण्याचा प्रयोग केला, आणि त्यात त्याला यश मिळून त्यातून त्याला 80 किलो मशरूमचे उत्पन्न मिळाले.
80 हजाराचे उत्पन्न
मशरूम उगविण्याच्या प्रयोगातून झालेले 80 किलो मशरूम, यशराज याने 100 रुपये प्रति किलो दराने विकले. यशराज याचा हा प्रयोग यशस्वी तर झाला मात्र, कोरोनामुळे त्याला पुढील दोन वर्ष काही करता आले नाही. या दरम्यान त्याने कोटा येथील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून जानेवारी 2022 मध्ये नव्या पद्धतीने मशरुम उगविण्यासाठी 500 बॅग तयार केल्या आणि यावेळी त्याला 1 हजार किलो पेक्षा जास्त मशरुमचे उत्पादन मिळाले.
हे मशरुम बाजारात विकून त्याने शेती करण्यासाठी लागलेला खर्च काढून 80 हजाराची कमाई केली. ताजे ऑयस्टर मशरूम तो 100 ते 150 रुपये प्रति किलो दराने विक्री करत असून मशरुमचे पावडर बनवून ते देखिल तो 1500 ते 2000 रुपये प्रति किलो दराने विक्री करत असतो. या प्रमाणे त्याला 45 ते 60 दिवसांच्या मशरुमच्या शेतीमधून 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇