मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, आता अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल, ओडिसाच्या दिशेने येत आहे. यावेळी ताशी 100 ते 120 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ? हे जाणून घेऊया.
दाना चक्रीवादामुळे प. बंगाल, ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावरील ‘दाना’ हे तीव्र चक्रीवादळ गेल्या 6 तासांत 12 किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेकडे सरकले आहे. ते आज भारतीय वेळेनुसार 5.30 वाजता वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर पारादीपच्या (ओडिशा), धामराच्या (ओडिशा) दक्षिण-पूर्व आणि सागर बेटापासून दक्षिणेकडील बाजूस घोंघावत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. ओडिशापासून प. बंगालपर्यंत पावसाची जोरदार हजेरीसुद्धा असेल असा अंदाज असून महाराष्ट्रावर या वादळाचा परिणाम होणार नाही.
काय आहे स्कायमेटचा अंदाज
दाना हे 2024 मधील मान्सूननंतरचे पहिले चक्रीवादळ आहे. मात्र, हे वादळ समुद्रात फारसे अंतर कापत नाही. त्यामुळे त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तविली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला या वादळाचा धोका असला तरी ओडिशाला जास्त धोका आहे. ओडिशा राज्याला एक लांब समुद्रकिनारा आहे आणि तो उत्तर-पूर्व ते नैऋत्येपर्यंत पसरलेला आहे.
दाना चक्रीवादळाचा प्रभाव
दाना चक्रीवादळ जेव्हा किनाऱ्यावर त्याचा वेग 100 किमी/तास पेक्षा जास्त असेल, जो 120 किमी/तास पर्यंत जाऊ शकतो. या वादळामुळे झाडे उन्मळून पडू शकतात, विजेचे खांब आणि ट्रान्समिशन लाईन पडू शकतात. रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर एकाच वेळी परिणाम होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही – पांडुरंग बोधले
सध्या दाना चक्रीवादळ ओडिशा राज्यातील भुनेश्वर जवळ आहे. आज संध्याकाळी ते भारताच्या पृष्ठभागावर म्हणजेच भुनेश्वर जवळ येईल आणि याचे चक्रीवादळ रूपांतर होईल. त्यानंतर हे चक्रीवादळ ओडिशाकडून छत्तीसगडकडे जाईल आणि येथे त्याचा दाब कमी होवून संपुष्टात येईल. दरम्यान या दाना चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही.
पांडुरंग बोधले
संचालक, धरतीधन ॲग्रो सेल्स.