मुंबई : Weather Alert… राज्यातील शेतकर्यांची एका संकटातून सुटका होत नाही तोच नवीन संकट समोर उभे राहत आहे. गेल्या आठवड्याभरापासून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीटीचा शेतकर्यांना सामना करावा लागला. त्यानंतर उघडीप मिळून एक दिवस होत नाही तोच राज्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. तरी शेतकर्यांनी हवामान स्वच्छ असतांना शेती कामे उरकून शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकर्यांना सातत्याने करावा लागत आहे. यंदाचा रब्बीचा हंगाम चांगला गेल्याने चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकर्यांना लागली होती. मात्र, पिक काढणीवर आलेले असतांना अचानक वातावरणात बदल होवून वादळी वार्यासह अवकाळी पाऊस तसेच गारपीट होत असल्याने काही जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट चा इशारा
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, 25 मार्च रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यात, 26 मार्च रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातुर, बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात, 27 मार्च रोजी बुलडाणा, वाशिम अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ या जिल्ह्यात तर 28 मार्च रोजी अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ या जिल्ह्यात मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
… तर शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होण्यास मदत होईल – अजित पवार
पहा सविस्तर व्हिडीओ👇
https://youtu.be/AShSLWZwD6g
गारपीटीची शक्यता
हवामान विभागाने विदर्भात गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भात 25 व 26 मार्च रोजी वादळी वार्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांनी परिपक्व झालेल्या पिकाची काढणी करून सुरक्षित स्थळी ठेवावे, फळझाडे यांचे वार्यापासून संरक्षण करण्यासाठी आधार द्यावा, गारपीटीच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.