यंदा लहरी हवामान आणि अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी नुकसानीपासून वाचण्याच्या तंत्राच्या शोधात आहेत. अशा स्थितीत द्राक्षगुरू अनिल म्हेत्रे यांच्याकडून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन तंत्र अन् मंत्र मोफत शिकून घेण्याची संधी ॲग्रोवर्ल्डच्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी प्रदर्शनात उपलब्ध झाली आहे.
प्रमिला लॉन्स, पिंपळगाव बसवंत येथे 12 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनात शनिवार, 13 जानेवारी रोजी शेतकरी बांधवांसाठी निर्यातक्षम द्राक्ष तंत्रज्ञानावर मोफत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
द्राक्ष उत्पादक परिसंवाद
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात शनिवार, 13 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता द्राक्ष उत्पादक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यात “निर्यातक्षम द्राक्ष पीक व्यवस्थापन” या विषयावर महाराष्ट्राचे द्राक्षगुरू अनिल म्हेत्रे हे मार्गदर्शन करणार आहेत.
ॲग्रोवर्ल्डतर्फे विविध पुरस्कारांचे वाटप
याप्रसंगी उद्या, शनिवारी दुपारी विविध पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ॲग्रोवर्ल्ड आदर्श द्राक्ष उत्पादक पुरस्कार, ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी मित्र पुरस्कार, ॲग्रोवर्ल्ड आदर्श द्राक्ष कृषी उद्योजक पुरस्कार तसेच ॲग्रोवर्ल्ड आदर्श फार्मर्स प्रोड्युसर कंपनी पुरस्कार वाटप करण्यात येणार आहे. द्राक्ष विज्ञान मंडळ, नाशिक या संस्थेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.