अहमदाबाद, गुजरातस्थित “विश्वास ॲग्री सीड्स” कंपनीचा शेअर 85 वर लिस्टेड झाल्यानंतर आजही त्याचं पातळीच्या आसपास स्थिर आहे. तीन आठवड्यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजार, एनएसईवर 86 रुपये इश्यू किमतीपेक्षा 1.2% कमी किंमतीत 85 रुपयांवर हा शेअर लिस्ट झाला होता.
विश्वास ॲग्री सीड्सच्या शेअरची किंमत इंट्राडे व्यवहारात ₹ 85.70 आणि ₹ 80.75 च्या पातळीदरम्यान आहे. लिस्ट झाल्यापासून शेअरने 77 रुपयांचा लो गाठला असून 52 वीक हाय 87.75 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सध्या तरी 1 लाख 47 हजार 200 असा समाधानकारक ट्रेड व्हॉल्यूम दिसत आहे. 88.5 ₹ हीच महत्त्वाची सपोर्ट आणि रेझिस्टन्स पातळी दिसत आहे.
विश्वास ॲग्री सीड्सचे पीअर कॉम्पीटिटर
जुबिलंट इंग्रेव्हिया, एलटी फूड्स, केआरबीएल, कावेरी सीड कंपनी, बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स, एव्हीटी नॅचरल प्रॉडक्ट्स, गुलशन पॉलिओल्स, चमन लाल सेटिया एक्सपोर्ट्स, जीआरएम ओव्हरसीज, मंगलम ग्लोबल एंटरप्राइज,अपसर्ज सीड्स ऑफ ॲग्रिकल्चर, कोहिनूर फूड्स, ॲग्री-टेक (इंडिया), समीरा ॲग्रो अँड इन्फ्रा, केसीके इंडस्ट्रीज, विकास WSP लि. या काही विश्वास ॲग्री सीड्सच्या पीअर कॉम्पीटिटर आहेत..
ॲग्रोवर्ल्डतर्फे अस्सल व नैसर्गिकरित्या पिकविलेला देवगड हापूस… आरोग्याशी खेळ नाही..
कंपनीचे संचालक मंडळ
गंगाड रोड, भायला, अहमदाबाद (गुजरात) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. अशोकभाई शिबाभाई गजेराहे व्यवस्थापकीय संचालक आहेत. व्यवस्थापन (संचालक) मंडळात दिनेशभाई माधभाई सुवागिया (कार्यकारी संचालक आणि CFO), भरतभाई शिबाभाई गजेरा (कार्यकारी संचालक), सौ.दिनकल राहुल पानसुर्या (गैर-कार्यकारी संचालक), संजय हरसुखभाई कछडिया आदींचा समावेश आहे.
उच्च-गुणवत्तेच्या बियाण्यांवर प्रक्रिया करणारी कंपनी
कंपनीच्या प्रॉस्पेक्टसमध्ये असे म्हटले आहे की, ती उच्च-गुणवत्तेच्या बियाण्यांवर प्रक्रिया करते आणि वितरकांच्या नेटवर्कद्वारे ते शेतकऱ्यांना वितरित करते. “विश्वास” ब्रँड विश्वास ॲग्री सीड्सद्वारे बियाणे बाजारात आणण्यासाठी वापरला जातो. कंपनीच्या बियाणे प्रक्रिया सुविधेमध्ये ऑप्टिकल सॉर्टिंग उपकरणे आहेत, जी आकार आणि स्वरूपातील दोषांव्यतिरिक्त परदेशी घटक, अवांछित रंग आणि किरकोळ विकृती ओळखू शकतात. शिवाय, फर्म आपल्या बियांवर उपचार करते, याचा अर्थ ते बुरशीनाशक, कीटकनाशक किंवा या दोघांच्या मिश्रणाचा वापर करून माती आणि बियाणे-जनित रोगजनक जीव तसेच साठवण कीटकांपासून स्वच्छ केले जातात.
कंपनीने आयपीओ का आणला?
विश्वास ॲग्री सीड्स IPO ची किंमत ₹ 25.80 कोटी आहे, त्यात ₹ 10 चे दर्शनी मूल्य असलेले 30 लाख इक्विटी शेअर्सचा ताज्या इश्यूचा समावेश आहे. अतिरिक्त खेळत्या भांडवलाची गरज, सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टे, कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीच्या सुसज्जतेसाठी भांडवली खर्च, बियाणे चाचणी प्रयोगशाळेसाठी उपकरणे खरेदी, हरितगृह (फॅन-पॅड सिस्टम) सेटअप आणि छतावरील सौर मोनोक्रिस्टलाइनची स्थापना यासाठी निधी उभारण्याचा निव्वळ इश्यूचा हेतू आहे.
विश्वास ॲग्री सीड्स कंपनी वेबसाईट
संपर्क पत्ता : 904, लिमडा चौक, गवळीवाड, राजकोट, गुजरात 360001
ईमेल : [email protected]
वेबसाईट : https://vishwasagriseeds.com/