मुंबई : महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प आता देशभर राबवला जाणार आहे.
महाराष्ट्रात ऑगस्ट 2021 पासून हा प्रकल्प राबवला जात आहे. त्यात आतापर्यंत 2 कोटी 12 लाख 76 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानं केंद्राच्या कृषी मंत्रालयानं खरीप हंगाम 2023 पासून डिजिटल क्रॉप सर्वेक्षणाचा, डीसीएस पथदर्शी प्रकल्प राबवला. आता पिकांच्या नोंदीसाठी केंद्राकडून महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये डिजिटल पीक सर्वेक्षण प्रणाली राबवली जाणार आहे. काल, सोमवारपासून त्याची सुरुवात झाली. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका अशा एकूण 34 तालुक्यांमधील 3 हजार 32 गावांची निवड करण्यात आली आहे.
अनेक राज्यामध्ये पिकाची नोंद करण्यासाठी अद्ययावत सुविधा नाही. त्यामुळं अनुदान, विमा किंवा नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होतो. म्हणून मग राज्यांकडून दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता डिजिटल स्वरूपात केंद्राला अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
ॲग्रो टॉक । एफपीओचा शेतकऱ्यांना फायदा काय ?, या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती