नवी दिल्ली : शेतमाल वाहतूक करण्यासाठी सुरू झालेल्या किसान रेलच्या सर्वाधिक म्हणजे तब्बल 1838 फेऱ्या महाराष्ट्रातून झाल्या आहेत. मात्र, कृषी उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या दहामध्ये नाही, असे आकडेवारीतून दिसून येते. संसदेत सादर आकडेवारीत पश्चिम बंगाल आघाडीवर आहे.
मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानी परिसरातून किसान रेलच्या सर्वाधिक फेऱ्या झाल्या. महाराष्ट्रातील फेऱ्या या किसान रेलच्या एकूण संचालित फेऱ्यांच्या सुमारे 75 टक्के आहे. इतर राज्यातून फक्त 25 टक्के गाड्या चालवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे कृषी उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या दहामध्ये नाही, तरीही सर्वाधिक किसान रेल फेऱ्या चालविण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर आहे.
पूर्वी कृषी उत्पादने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान्य मालगाड्यांद्वारे नेली जात होती. त्यामुळे अनेकवेळा मालगाडी उशिरा आली की मालही खराब होऊ लागला, त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. अशा नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये किसान रेल सुरू केली. या गाड्यांमध्ये फक्त कृषी उत्पादने पाठवली जातात. त्यामुळे माल वेळेवर पोहोचून शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नाही.
संसदेत रेल्वे मंत्रालयाकरून दिल्या गेलेल्या उत्तरानुसार, ऑगस्ट 2020 ते जून 2022 पर्यंत एकूण 2,359 किसान रेल चालवण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक 1,838 किसान रेल महाराष्ट्रातून चालवण्यात आल्या आहेत. उर्वरित 512 किसान रेल इतर राज्यांतून चालवण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातचा समावेश आहे.
कांदा, केळी, बटाटा, आले, लसूण, आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्री, चिकू या फळांचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, ज्याचा पुरवठा देशभर केला जातो. त्यामुळे येथून अधिक किसान रेल चालवण्यात आल्या आहेत. किसान शक्ती संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह यांनी किसान रेलच्या संचालनाचे स्वागत करताना सांगितले की, सरकारने या रेलच्या भाड्याचा विचार केला पाहिजे, ज्यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होऊ शकेल.
या कृषी उत्पादनांची केली जाते वाहतूक
किसान रेलमध्ये कांदा, केळी, बटाटा, आले, लसूण, आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्री, चिकू, लिंबू, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर फळे आणि भाज्यांसह सुमारे 7.9 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे.
देशातील आघाडीची 10 कृषी उत्पादक राज्ये
बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
कृषी वीज वितरण कंपनी : राज्यात लवकरच शेतीसाठी स्वतंत्र वीज पुरवठा करण्याचा महाप्रीतचा प्रस्ताव
कृषी अवजारे नोंदणी आता बंधनकारक, त्यानंतरच वापर! जाणून घ्या Up 2 Date निर्णय …
Comments 2