Home बाजार भाव कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव

कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव

पुणे : गेल्या दोन वर्षात कापसाला चांगला भाव मिळाला, याच आशेने यंदा देखील कापसाला चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, अवकाळी पावसामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. अवकाळी पाऊस आणि बोंडअळी यामुळे नुकसान झाल्याने कापसाचे दर कमी झाले आहेत.

कापसाला सण 2021- 22 या वर्षात 12 ते 13 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. तर 2022- 23 मध्ये शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र, या वर्षात 6 हजार 200 ते 9 हजार 400 रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकऱ्यांचा कापूस विकला गेला आणि याचा सरासरी दर 7 हजार 800 रुपये इतका होता. यंदा 2023- 24 या वर्षात कापसाच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी चांगल्या प्रतीच्या कापसाला 6 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

 

आज आपण कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कापसाची आवक कोणत्या बाजार समितीत सर्वाधिक झाली ?, हे जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला काल (दि. 24) रोजी वरोरा-खांबाडा या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा 7 हजार 060 रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर हा 6 हजार 800 रुपये मिळाला. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही वरोरा बाजार समितीत झाली. कापसाचे सविस्तर बाजारभाव खालीलप्रमाणे..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (24/12/2023)

वडवणीक्विंटल1016980
वरोराक्विंटल19256800
वरोरा-खांबाडाक्विंटल8076800
भिवापूरक्विंटल3206725
कापूस (23/12/2023)
संगमनेरक्विंटल1006000
सावनेरक्विंटल30006675
भद्रावतीक्विंटल5806925
समुद्रपूरक्विंटल14256800
वडवणीक्विंटल656850
पांढरकवडाक्विंटल2556700
पारशिवनीक्विंटल11576660
धामणगाव -रेल्वेक्विंटल19006500
अकोलाक्विंटल1006645
अकोला (बोरगावमंजू)क्विंटल987217
उमरेडक्विंटल5666700
देउळगाव राजाक्विंटल23716800
वरोराक्विंटल27066800
वरोरा-खांबाडाक्विंटल14166800
सिंदी(सेलू)क्विंटल16506900
हिंगणघाटक्विंटल80006500
हिमायतनगरक्विंटल526700
पुलगावक्विंटल46407050
फुलंब्रीक्विंटल3256900
Nirmal Seeds

 

 

Planto Advt
Planto

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇