पूर्वजा कुमावत
ढोबळी मिरची म्हणजे मिरचीचा एक प्रकार आहे. ढोबळी मिरचीला सिमला मिरची किंवा भोपळी मिरची असेही म्हणतात. काही लोक ढोबळी मिरची ही तिखट नसल्यामुळे तिला गोड मिरचीही म्हणतात. हरितगृहात ढोबळी मिरचीचे उत्पादन वर्षभर घेऊ शकतो. बाजारात आपल्याला विविध रंगाच्या ढोबळ्या मिरच्या बघायला मिळतात जसे की हिरवी, लाल, पिवळी, शेंदरी, जांभळी, तपकिरी इत्यादी. ढोबळी मिरची अमेरिका, युरोप मार्गे भारतात आली आहे. भारतात मुख्यतः हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटका, तामिळनाडू, गुजरात, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. ढोबळी मिरची रंगीत फळांचा मुख्य उपयोग सॅलड तयार करण्यासाठी होतो व हिरव्या रंगाच्या फळाचा उपयोग भाजी करण्यासाठी होतो.
जमीन व हवामान
ढोबळी मिरचीला जमीन कसदार व सुपीक लागते. मध्यम व भारी काळी पाण्याची उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य ठरते. ढोबळी मिरची लागवडीसाठी जमिनीचा सामू 6 ते 7 च्या दरम्यान असावा. हरितगृहामध्ये ढोबळी मिरचीचे तापमान आद्रता व सूर्यप्रकाश नियंत्रित राहतो. बियाण्याची समाधानकारक उगवण करण्यासाठी तापमान 26°C आवश्यक आहे. हरितगृहातील तापमान दिवसाचे 23° C तर रात्रीचे तापमान 20°C ते 21°C नियंत्रित ठेवावे. ढोबळी मिरचीला फळधारण झाल्यानंतर रात्रीचे तापमान 17°C ते 20°C व दिवसाचे तापमान 21°C ते 24°C इतके असावे.
लागवड
ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी उंच बेड (गादी वाफे) तयार करून घ्यावे. बेडची उंची 30 सेंटिमीटर, रुंदी 90 सेंटीमीटर ठेवावे. दोन्ही बेड दरम्यान अंतर हे 20 फुट ठेवावे. रंगीत ढोबळी मिरची ही एकाच बेडवर दोन ओळीच्या पद्धतीने लावावी. लागवडीनंतर हरितगृहामध्ये आद्रता 80% पर्यंत तीन ते चार आठवडे ठेवावेत. ढोबळी मिरचीचा कालावधी 10 ते 12 महिन्यांचा असतो. ढोबळी मिरची मोठे झाल्यानंतर त्यांना आधार द्यावा लागतो. या पिकाची उंची 10 ते 15 फूट पर्यंत वाढते. एका गादीवाफेवर साधारणपणे तीन मीटर उंचीवर तीन, अशा 12 गेज जाडीचा तार वाफेच्या समांतरपणे बांधून घ्यावे.
लागवड झाल्यानंतर काही दिवसांनी झाडांना चार अशा संखेत प्लास्टिक दोरा बांधाव्या. दोरीचे एक टोक तारेला व दुसऱ्या टोक खाली सोडून त्या झाडाच्या खुडाला बांधून घ्याव्या. रोपांची लागवड झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी रोपांचा शेंडा धारदार कात्रीने खुडून घ्यावा. शेंडे काढल्यानंतर पिकाला दोन किंवा चार फुटवे येतात व या फुटव्यांना आधार देण्यासाठी सोडलेला दोरा बांधला जातो. पिकाला फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याची छाटणी केली जाते. रोपांना योग्य आकार व फळाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
खत व्यवस्थापन
रोप लागवडीच्या अगोदर वाफेमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 2.50 किलो/10 चौ. मी. आणि मॅग्नेशियम सल्फेट 0.5 किलो/ 10 चौ. मी. या प्रमाणात मिसळून द्यावे. जास्त उत्पादन आणि उत्तम प्रत मिळण्यासाठी ठिबक सिंचनामधील पाण्याद्वारे विद्राव्य खत द्यावे. भरपूर उत्पादन व फळांचे प्रत चांगली मिळण्यासाठी हरितगृहातील ढोबळी मिरची नत्र 80 कि. ग्रॅ., स्फुरद 72 कि.ग्रॅ. आणि पालाश 80 कि.ग्रॅ विद्राव्य खते वापरून झाडांच्या वाढीच्या अनुसार अवस्थेनुसार पिकांना द्यावे. यासोबत पिकांना लोह, मॅग्नेशियम, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा द्यावीत. विद्राव्य खते वाढीच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनद्वारे पाण्याबरोबर द्यावे.
मायक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्य ढोबळी मिरचीला निरोगी आणि संतुलित वाढ होण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता व रोगप्रतिकारशक्ती, फळांचा आकार वजन आणि चव वाढण्यासाठी माइक्रोलाची 60 ते 65 दिवसांनी करावी व ही फवारणी सायंकाळच्या वेळी पानांच्या दोन्ही बाजूने करावे. माइक्रोला 2.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून त्याची फवारणी करावी. माइक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्य ढोबळी मिरचीला निरोगी आणि संतुलित वाढ होण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचीकार्यक्षमता व रग प्रतिकारशक्ती, फळाचा आकार वजन आणि चव वाढवण्यासाठी माइक्रोलाची फवारणी 60 ते 65 दिवसांनी सायंकाळच्या वेळी पानांच्या दोन्ही बाजूने करावे ही फवारणी 2.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ढोबळी मिरचीच्या पिकाला पाणी दर आठ दिवसांनी द्यावे.

परागीकरण
ढोबळी मिरचीसाठी परागीकरण हे हाताद्वारे केले जाते. त्यामध्ये फुलांचा गुच्छावरून हळुवारपणे हात फिरवतात, हाताने परागीकरण करताना फळधारणेसाठी योग्य वेळ महत्त्वाची असते. यासाठी हवेत आद्रता जास्त (40 ते 50) टक्के असलेली फायदेशीर असते. ढोबळी मिरचीची काढणी ही तीन अवस्थेमध्ये केली जाते जसे की हिरवी ब्रेकर अवस्था (फळाचा दहा टक्के पृष्ठभाग रंगीत झालेला असतो.) आणि पूर्ण रंग (90% पेक्षा जास्त पृष्ठभाग रंगीत झालेला असतो.)
काढणी
ढोबळी मिरचीच्या फळांची काढणी प्रामुख्याने जाती किंवा रंगानुसार वेगवेगळ्या वेळी करावी. लागवडीनंतर साधारणपणे 50 ते 60 दिवसांनी या फळांची काढणी करावी. दर आठवड्यातून एकदा काढणी करावी. फळ पूर्णपणे विकसित झाल्यावर आणि हिरवीगार झाल्यावर देठासहित त्याची काढणी करावी. दूरच्या बाजारपेठेत पाठवताना ढोबळी मिरचीच्या फळांना दहा टक्के रंग आल्यानंतर काढावीत. ढोबळी मिरचीची फळ काढणे ही सकाळी अथवा सायंकाळी करावी. यासाठी तीष्ण दार असलेल्या चाकूचा वापर करून फळाचे देठा सहित काढणी करावी.