पशुसंवर्धन

लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण 29 हजार 410 पशुधन उपचाराने झाले बरे

मुंबई : राज्यामध्ये दि. 5 ऑक्टोबर 2022 अखेर 31 जिल्ह्यांमधील एकूण 2,217 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. लम्पीबाधित गावांतील एकूण 58,131 बाधित पशुधनापैकी एकूण 29,410 पशुधन उपचाराने बरे झाले असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सरकारी अधिकृत आकडेवारीवरून राज्यातील एकूण 28,721 जनावरे अजूनही लंपीबाधित असल्याचे दिसून येत आहे.

एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4

श्री.सिंह म्हणाले, उर्वरित लम्पीबाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 115.11 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 111.05 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 79.37 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

Neem India

राज्यात दि. 05.10.2022 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील 395, अहमदनगर जिल्ह्यातील 234, धुळे जिल्हयात 34, अकोला जिल्ह्यात 371, पुणे जिल्ह्यात 136, लातूर मध्ये 25, औरंगाबाद 73, बीड 8, सातारा जिल्ह्यात 172, बुलडाणा जिल्ह्यात 335, अमरावती जिल्ह्यात 289, उस्मानाबाद 8, कोल्हापूर 109, सांगली मध्ये 23, यवतमाळ 2, परभणी – 1, सोलापूर 26, वाशिम जिल्हयात 34, नाशिक 7, जालना जिल्हयात 15, पालघर 2, ठाणे 28, नांदेड 24, नागपूर जिल्हयात 6, हिंगोली 1, रायगड 5, नंदुरबार 19 व वर्धा 2 असे एकूण 2384 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

Legend Irrigation

पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. सदरील रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे सिंह यांनी सांगितले.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button