• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

विक्रमगडसारख्या ग्रामीण भागातील सुधा पोल्ट्री फार्मने “लेयर पोल्ट्री”तून उभा केला आदर्श

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2023
in यशोगाथा
0
लेयर पोल्ट्री
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

विक्रमगडसारख्या ग्रामीण भागातील सुधा पोल्ट्री फार्मने “लेयर पोल्ट्री”तून नवा आदर्श उभा केला आहे. सुचिता पाटील आणि सुनील पाटील हा फार्म चालवतात. यात त्यांना अनंत अडचणी आल्या. बर्ड फ्लूचा जीवघेणा आजार आला आणि व्यवसायाचे होत्याचे नव्हते झाले. कर्जाचा डोंगर डोक्यावर होता. याही स्थितीत हिंमत न हारता पाटील कुटुंब नव्या उमेदीने उभे राहिले. ते ब्रॉयलरपासून लेयर पोल्ट्री फार्मिंगकडे वळले. आज त्यांच्याकडे 5,500 कुक्कुट पक्षी आहेत, जे वर्षभर अंडी घालतात. वार्षिक उलाढाल कोटींच्या पार गेली आहे. जाणून घेऊ सुधा पोल्ट्री फार्मची अनोखी यशोगाथा …

ठाणे, मुंबईपासून 90 किमी अंतरावर, पालघर जिल्ह्यातील, विक्रमगड तालुक्यात खानदानी शेतात पाटील कुटुंबाचा सुधा पोल्ट्री फार्म आहे. 1985 मध्ये सुचिता आणि सुनील पाटील या दांपत्याने 2 वर्षे पोल्ट्री फार्ममध्ये काम केले होते. या व्यवसायाची थोडीफार माहिती त्यांना त्यातून मिळाली होती. त्यानंतर त्यांचे मन नोकरीत रमत नव्हते. स्वतःचाच छोटासा का होईना व्यवसाय उभारायचा विचार त्यांच्या मनात तेव्हापासून रुंजी घालत होता. नोकरी सोडून शेतीत रमलेल्या पाटील कुटुंबाने 2011 मध्ये त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर स्वतःचा पोल्ट्री फार्म उभारला. ते ब्रॉयलर फार्म होते.

 

ॲग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

बर्ड फ्लूमुळे सुरुवातीलाच व्यवसायाला मोठा फटका
हळूहळू त्यांचा जम बसू लागला. व्यवसायातून कमावलेला नफा ते पुन्हा व्यवसायातच गुंतवत गेले. त्यातून पोल्ट्री व्यवसायाचा विस्तार होत गेला. व्यवसाय चांगला चालला होता; पण नंतर बर्ड फ्लूचा जीवघेणा आजार आला. त्यामुळे बाजारात पोल्ट्री उत्पादनांच्या किमती एकदम कमी झाल्या. मागणीत मोठी घट झाली. पाटील दाम्पत्याचे मोठे नुकसान झाले, जे सहन करणे अतिशय कठीण होते.

 

ब्रॉयलर फार्मकडून वळले लेयर फार्मिंगकडे
बर्ड फ्लूमुळे पाटील दाम्पत्याचे मोठे नुकसान झाले, जे सहन करणे कठीण होते. त्यामुळे त्यांनी ब्रॉयलर फार्मकडून लेयर फार्मिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्याकडे 5,500 कुक्कुट पक्षी आहेत, जे वर्षभर अंडी घालतात. लेयर फार्म ही त्यांच्या व्यवसायाची दुसरी इनिंग होती. आधीच्याच पायाभूत सुविधांचा नव्या लेयर पोल्ट्रीत सर्वोत्तम वापर करण्यात आला, परंतु त्याशिवाय अतिरिक्त भांडवल आणि गुंतवणूक आवश्यक होती. लेअर पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांना सामावून घेण्यासाठी फक्त पिंजऱ्यावरच 7.5 लाखांची तरतूद आवश्यक होती. दुर्दैवाने, ग्रामीण व्यवसायासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान उपलब्ध नव्हते. त्यामुळे पाटील कुटुंबाने मित्र, नातेवाईकांकरून हे पैसे उधारीवर घेतले. त्यानंतर आता पाच-सहा वर्षे झाली असून पोल्ट्री फार्म यशस्वीपणे सुरू आहे. त्यांनी सर्वांची कर्जाची रक्कम परत केली आहे.

 

 

हॅचरीमधून पिल्ले विकत घेण्यास प्राधान्य
सुधा पोल्ट्री फार्ममध्ये वेंकटेश्वरा हॅचरीज, पुणे येथून पोल्ट्रीची पिल्ले आणली जातात. सुनील पाटील सांगतात, “आम्ही हॅचरीमधून पिल्ले विकत घेण्यास प्राधान्य देतो, कारण ते रोग प्रतिरोधक असतात. त्या पिल्लांची फार कमी काळजी घ्यावी लागते. याउलट, जर आपण स्वतःच पिल्ले विकसित केली, तर ते थोडे लवकर अंडी घालण्यास सुरुवात करत असले तरी त्यांच्या मृत्यूची शक्यता 60% पेक्षा जास्त असते. हॅचरीमधून आलेले पोल्ट्री पक्षी 19 व्या आठवड्यात अंडी घालण्यास सुरवात करतात, तर स्व-विकसित पक्षी 17 व्या आठवड्यापासून अंडी घालतात. घरच्या पिल्लातून आपण काही पैसे वाचवू शकतो, परंतु त्यांच्या मृत्यूची शक्यता जास्त असल्याने यात खूप जास्त व्यावसायिक धोका आहे. याशिवाय, घरच्या पिल्लांचे लसीकरण हेही एक मोठे ताणाचे काम आहे. हे सारे पाहता आम्ही व्यंकटेश्वरा हॅचरीजमधून पक्षी खरेदी करण्याचा पर्याय निवडतो.”

 

सुनील पाटील स्पष्ट करतात, की फार्मसाठी पिल्ले स्वतः विकसित करण्यासाठी रु. 150 प्रती पिल्लू खर्च येतो. तर कंपनी रु. 175 प्रती पक्षी. आकारते. यात फक्त 25 रुपयांचा फरक आहे. तो विचारात घेऊ नये, कारण यातून प्रत्यक्षात बचत होत नाही तर त्याऐवजी दुहेरी मेहनत आणि जोखीम वाढते.

 

पक्ष्याचे वजन 1200 ग्रॅम झाल्यानंतरच…
पाटील कुटूंब काही महत्त्वाच्या पोल्ट्री टिप्स देतात. ते म्हणतात, “एकदा पक्ष्याचे वजन किमान 1200 ग्रॅम झाले, की मगच अंडी घालणे सुरू केले पाहिजे, अन्यथा अंड्याचा आकार लहान असेल. अशी अंडी कमी किमतीत विकली जातात. आम्ही हॅचरीतून पक्षी विकत घेतो. ते 1 किलो वजनाचे आश्वासन देतात; पण प्रत्यक्षात त्यांचे वजन 800 ग्रॅम ते 1 किलोच भरत असते. म्हणून आम्ही सर्व पक्ष्यांचे आणखी चार आठवडे पालनपोषण करतो, जेणेकरून त्यांचे वजन वाढेल. त्यानंतरच मग अंडी घालण्याची प्रक्रिया सुरू करतो.

 

 

पक्ष्यांना दिवसातून दोनदा आहार
पक्ष्यांना दिवसातून दोनदा आहार दिला जातो. सरासरी एका पक्षीसाठी दिवसाला 100-110 ग्रॅम आहार लागतो. जेव्हा ते पिल्लू असते, तेव्हा ते प्रती दिवस 60 ग्रॅम आहार खातात. पुढे जसजसे पिल्लू वाढते, तसतसे त्याचे खाद्यही वाढते. त्यामुळे पक्षी पुढे आयुष्यभर 100-110 ग्रॅम/दिवस खातात.

सुधा पोल्ट्रीमध्ये पावसाळ्यातील 3-4 महिने वगळता वर्षभर खाद्यपदार्थ फार्ममध्येच बनवले जातात. पावसाळ्यात चारा सुकवणे कठीण होते म्हणून धुळ्यातील सिमरन कंपनीकडून तो विकत घेतला जातो. सहसा एकाच ऑर्डरमध्ये 12-15 टन खरेदी केली जाते, जे एका महिन्यासाठी पुरेसे होते. जेव्हा फार्ममध्ये आहार तयार केला जातो, तेव्हा कच्चा माल बाजारातून आणला जातो आणि फीड उत्पादन मशीनमध्ये प्रक्रिया केली जाते.

 

वयोगटानुसार पिलांना 2 प्रकारचे खाद्य
सुधा पोल्ट्री फार्ममध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य बनवले जाते. एक 15-19 आठवड्यांच्या पिलांसाठी, तर दुसरे 22 आणि त्याहून अधिक आठवड्यांच्या पिलांसाठी असते. छोट्या पिल्लांसाठी, जीवनसत्व आणि खनिजांचे मिश्रण असलेले 250 किलो सांद्रता (कॉन्सट्रेट) घेऊन त्यात कॉर्न 235 किलो आणि 15 किलो सेलफीड एकत्र मिसळले जाते. हे तीनही घटक दीड टन खाद्य तयार करतात. मोठ्या पिलांसाठी, 175 किलो कॉन्सट्रेट , 250 किलो मका, 40 किलो जेआरबी, 35 kg सेलफीड आणि 750 ग्रॅम टॉक्सीन ब्रँडर्स एकत्र मिसळले जातात. थर असलेल्या (लेयर्ड) पक्ष्यांना ब्रॉयलर पक्ष्यांपेक्षा जास्त प्रथिने लागतात, तरच अंड्यांचा दर्जा चांगला राहील. पोल्ट्रीत बनवलेले खाद्य दर्जेदार असून त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. सुधा पोल्ट्री लहान असल्याने फक्त एका तासात चारा तयार होतो.

 

अंडी गोळा करायला लागतो एक तास
पोल्ट्रीत दुपारी 1 ते 4 दरम्यान अंडी गोळा केली जातात. सर्व अंडी गोळा करायला एक तास लागतो. सरासरी एक पक्षी वर्षाला 300 ते 310 अंडी घालतो. इथली अंडी दररोज स्थानिक बाजारपेठेत विकली जातात, तर आठवड्यातून एकदा ती पालघर व महाराष्ट्रातील इतर प्रमुख घाऊक बाजारात पाठवली जातात. अंड्यांचे शेल्फ लाइफ दोन आठवडे असते, म्हणून घाऊक बाजारात एक पूर्ण वाहन (मिनी ट्रक) पाठवणेच व्यवहार्य ठरते.

 

शेतात वाहन पाठवून व्यापारी खरीदतात अंडी
नॅशनल एग कॉर्पोरेशन (NECC) दररोज 100 अंड्यांची घाऊक किंमत जाहीर करते. पाटील सांगतात, “आम्हाला NECC रेटपेक्षा प्रति अंडी 10-15 पैसे कमी मिळतात. उदा. रु. 400 प्रति 100 अंडी रेट असेल तर आम्हाला रु. 385-390 प्रति 100 अंडी मिळतात. जर व्यापाऱ्याने आपले वाहन थेट शेतात अंडी नेण्यासाठी पाठवले, तर आम्हाला रु. 375 प्रति 100 अंडी मिळतात.”

 

कोंबड्यांच्या खतालाही मिळते चांगली किंमत
कोंबड्यांचे शेण बागायती पिकांसाठी उत्कृष्ट खत ठरते. दुर्दैवाने, त्याची किंमत एकतर शेतकऱ्यांना माहीत नाही किंवा त्याबाबत पद्धतशीरपणे विक्री प्रक्रियेचा अभाव आहे. सुधा पोल्ट्रीत पिंजऱ्याच्या खालून शेण गोळा करून डम्पिंग ग्राऊंडमध्ये साठवले जाते. ते 2,200 रु. प्रति टन दराने विकले जाते. तसा हा दर कमी आहे, पण त्यासाठी इतर काही वेगळा उत्पादन खर्च होत नाही. कोंबड्यांचे शेण वापरण्याचे फायदे समजून घेण्यासाठी दुर्दैवाने आपल्याकडे शेतकरी पुरेसे शिक्षित नाहीत, अशी खंत पाटील दांपत्य व्यक्त करतात.

 

दरवर्षी बदलला जातो संपूर्ण स्टॉक
पोल्ट्रीतील संपूर्ण स्टॉक दरवर्षी बदलला जातो. लेअर पोल्ट्रीतील पक्षी खरेदी करण्यात प्रसिद्ध असलेल्या व्यापाऱ्याला हे पक्षी विकले जातात. ते ब्रॉयलर पक्ष्यांपेक्षा कमी दराने विकले जातात. व्यापारी थेट पंचतारांकित हॉटेल्समध्ये लेअर पक्षी विकतात. ब्रॉयलरचा बाजारभाव रु. 100 प्रती किलो असेल तर लेअर पक्षी त्याच किंमतीला विकला जातो. अर्थात त्याचे वजन अंदाजे 1400-1600 ग्रॅम असते.

 

ब्रॉयलर पोल्ट्री कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल
ब्रॉयलर पोल्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेलबद्दल विचारले असता पाटील दाम्पत्य सांगतात, “ते चांगले आहे तितकेच वाईटही आहे. चांगले अशासाठी कारण ते कमाईचे चांगले मार्ग देते; परंतु वाईट अशासाठी कारण कंपन्याच शेतकर्‍यांपेक्षा जास्त कमावतात. संपूर्ण गुंतवणूक, जोखीम आणि कठोर परिश्रम शेतकरी करतात, तर कंपनी फक्त फीड देते. मृत्यू झाल्यास तो शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. व्यवसायात शेतकऱ्याने खर्च केलेल्या निविष्ठांच्या तुलनेत त्यांना कमी मोबदला दिला जातो. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना लेयर पोल्ट्री फार्मिंगची शिफारस करतो.”

 

Panchaganga Seeds

 

लेअर पोल्ट्रीला बाजारातील दरांचा फटका कमी
श्रीमती सुचिता पाटील आणि श्री. सुनील पाटील हे सुधा पोल्ट्री फार्म चालवतात. सातत्यपूर्ण आणि चांगली कमाई करण्यासाठी ते ब्रॉयलरपासून लेयर पोल्ट्री फार्मिंगकडे वळले. त्याच्या फायद्यांवर प्रकाश टाकताना पाटील दांपत्य सांगते, “लेअर पोल्ट्री असल्यास बाजारातील दरांचा फटका बसत नाही. कारण बाजारात घाऊक बहुतांश स्थिर राहत असल्याने पक्ष्यांच्या किमतीत फारशी चढ-उतार होत नाही. हे क्षेत्र ब्रॉयलरपेक्षा कमी स्पर्धात्मक आहे, कारण आता अनेक कॉर्पोरेट कंपन्या ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसायात गुंतलेले आहेत. त्यांचा उत्पादन खर्च आमच्यापेक्षा 7 रु. प्रति पक्षीने कमी असतो, त्यामुळे सर्वसामान्य पोल्ट्री चालकांना तोटा होण्याची शक्यता जास्त असते.”

 

स्वतः मनापासून करत असाल तरच यश
भविष्यात पाटील दाम्पत्याने पोल्ट्री फार्म विस्तार करण्याची योजना आखली आहे. या व्यवसायाबाबत त्यांनी एक मोलाचा सल्ला दिला, की सारे काही मनापासून करा. जर तुम्ही स्वत: दैनंदिन कामकाजात मनापासून गुंतलेले असाल तेव्हाच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. त्याला आउटसोर्स केले जाऊ शकत नाही. मुंबईत बसून हैदराबाद किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पोल्ट्री फार्म फायद्यात चालवणे अशक्य आहे. एक छोटासा निष्काळजीपणा घातक ठरतो, त्यात रोग वणव्यासारखे पसरतात, ज्यामुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. जर एखाद्याची प्रामाणिकपणे आणि वैयक्तिकरित्या काम करण्याची तयारी असेल तरच पोल्ट्री व्यवसायात किफायतशीर परताव्याची हमी आहे!

संपर्क तपशील :
सुधा पोल्ट्री फार्म, पोस्ट ता. विक्रमगड, जिल्हा पालघर, महाराष्ट्र – 401605, मोबाईल : 07350983556

External Link (आवश्यकतेनुसार) https://www.youtube.com/watch?v=bhXCh6tqJWI

Ellora Natural Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • बँकेची नोकरी सोडून भाड्याने घेतले शेत
  • एका बिघ्यात चार महिन्यात 9 लाखांची कमाई, ‘या’ फुलाची करा शेती

 

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: पोल्ट्री फार्मिंगबर्ड फ्लूब्रॉयलरविक्रमगड
Previous Post

बँकेची नोकरी सोडून भाड्याने घेतले शेत

Next Post

तयारी रब्बी हंगामाची : हरभरा बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया

Next Post
रब्बी हंगामा

तयारी रब्बी हंगामाची : हरभरा बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.