मुंबई : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कांदा अनुदान जिल्ह्यानुसार यादी प्रकाशित करण्यात आली आहे. राज्यात 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत बाजार समित्यांमध्ये कांद्याची कमी दराने विक्री झाली. यामुळे राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रति क्विंटल 350 रुपये कांदा अनुदान जाहीर केले.
कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळाला. याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता कांदा अनुदान वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हानिहाय अनुदान देखील मंजूर करण्यात आले आहे. मात्र, कांदा अनुदानाची जी काही मागणी आहे त्या मागणी नुसार 53% अनुदान रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |
इतक्या शेतकऱ्यांनी दाखल केले होते अर्ज
राज्यांमधून ३० एप्रिलपर्यंत कांदा अनुदानासाठी एकूण ४ लाख १३ हजार ८३ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. यातील ३ लाख ३६ हजार ४७६ शेतकरी हे कांदा अनुदानासाठी पात्र ठरले. मात्र, यानंतर राज्य सरकारने कांदा अनुदानासाठी लावलेल्या अटी व शर्ती काढून टाकल्या आणि आता देखील यासाठी अर्ज दाखल होत आहेत. 19 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आलेले अनुदानाची रक्कम ही 844 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
शासनाचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान झाले मंजूर ?
नाशिक : 436 कोटी 61 लाख 23 हजार 578
धाराशिव : 22 कोटी 88 लाख 64 हजार 796
अहमदनगर : 102 कोटी 79 लाख 36 हजार 917
सोलापूर : 101 कोटी 16 लाख 71 हजार 448
रायगड : 68 लाख 16 हजार 631
सातारा : 3 कोटी 38 लाख 6 हजार 308
सांगली : 7 कोटी 99 लाख 12 हजार 868
पुणे : 66 कोटी 89 लाख सहा हजार 698
छत्रपती संभाजीनगर : 20 कोटी 25 लाख 9917
यवतमाळ : 5 लाख 63 हजार 707
लातूर : 1 कोटी 13 लाख 81 हजार 13
वर्धा : 5 लाख 84 हजार 692
नांदेड : 1 कोटी तेरा लाख 81 हजार 13
बीड : 22 कोटी 53 लाख 62 हजार 945
कोल्हापूर : 13 कोटी 43 लाख 67 हजार 450
जळगाव : 23 कोटी 16 लाख 17 हजार 753
धुळे : 12 कोटी 62 लाख 68 हजार 296
चंद्रपूर : 10 कोटी 24 लाख 21 हजार 676
अमरावती : 33 लाख 92 हजार 608
बुलढाणा : 33 लाख 92 हजार 608