दुसरीकडे, जेव्हा दुधाच्या पुरवठ्याकडे आपण पाहायला सुरुवात करतो, तेव्हा अनेक समस्या समोर येतात. बहुतेकदा गरजू बालक आणि तरुण सर्वाधिक असलेल्या भागात दूध उत्पादन अन् उपलब्धता अतिशय तोकडी आहे. तसे पाहिले तर, जगात चुकीच्या ठिकाणी अधिक दूध उत्पादन केले जात आहे. सध्या चार वर्षांपेक्षा कमी वयाची 90 टक्क्यांहून अधिक मुले विकसनशील देशांमध्ये आहेत – परंतु तेच राष्ट्रे जगातील एकूण दुधाच्या जेमतेम अर्धेच दूध उत्पादन करतात. एकटा युरोप जागतिक उत्पादनाच्या एक चतुर्थांश दूध उत्पादन करतो. मात्र, अत्यंत नाशवंत दुग्धजन्य पदार्थ युरोपच्या सीमा ओलांडून इतरत्र फारसे विकले जात नाहीत. उदाहरणार्थ, संपूर्ण दूध पावडरचा एकूण जागतिक व्यापार कच्च्या दुधाच्या फक्त 2 टक्के इतकाच आहे. अर्थात, तो मर्यादित व्यापार देखील स्थानिक दूध पुरवठा साखळींना अस्वस्थ करण्यासाठी पुरेसा आहे. काही वर्षांपूर्वी चीनने देशातील कुपोषण समस्येवर मात करण्यासाठी बाळांसाठी दूध पावडरचा पुरस्कार केल्यामुळे जागतिक दुग्ध उद्योगात कमालीचे असंतुलन निर्माण झाले होते. ते चित्र आजही कायम आहे. जसे की – चांगल्या दामामुळे आणि निर्यातीतील वर्चस्वामुळे न्यूझीलंडमधील डेअरी उद्योगासाठी दुग्धजन्य उत्पादनांसाठी सौदी अरेबिया सर्वात प्रिय ग्राहक आहे.
दूध पावडर, बटरच्या किमती तीन वर्षांच्या उच्चांकावर
आग्नेय आशियाई आयातदारांकडून मागणीमुळे मे महिन्यात संपूर्ण दूध पावडरच्या किमती तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या, तर बटर महागाई 50 टक्क्यांहून अधिक झाली आहे. मुक्त व्यापारामुळे मर्यादित प्रमाणात दिलासा मिळत असला तरी, विकसनशील देशांकडून वाढती मागणी असताना मर्यादित पुरवठ्यामुळे दुधाची जागतिक टंचाई जाणवण्याची शक्यता जास्त आहे. 2030 पर्यंत जगात दुधाची तूट 30 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचेल, असे आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनने एप्रिलमध्ये म्हटले होते. आयएफसीएन डेअरी रिसर्च नेटवर्क या स्वतंत्र गटाला तर 2030 पर्यंत दुधाची ही तूट 10.5 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटतेय. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे जागतिक असंतुलन आणि टंचाईमुळे दुधाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. सुदैवाने त्या सर्वात जास्त गरज असलेल्या लोकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती आहे.
अति उष्णतेमुळे दुधाचे उत्पादन 10 टक्क्यांनी घटणार
हवामान बदलामुळे हे सर्व आणखी बिकट होते. वाढत्या तापमानामुळे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय देशांना दुधाबाबत स्वयंपूर्ण होणे आणखी कठीण होईल. या महिन्याच्या सुरुवातीला सायन्स अॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, अति उष्णतेमुळे दुधाचे जागतिक उत्पादन 10 टक्क्यांनी कमी होऊ शकते. दूध हे जागतिक तापमानवाढीचे एक प्रमुख कारण आहे. गायी गवत पचवताना मिथेनयुक्त ढेकर देतात. त्यातून गुरे दरवर्षी 2.1 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करतात, जे जगातील 67% कारच्या उत्सर्जनाइतकेच आहे. विकसनशील देशांमधील दूध उत्पादनात वायुप्रदूषण स्थिती आणखी वाईट आहे. आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये दुधाचे प्रदूषण विकसित देशांपेक्षा तीन ते चार पट जास्त आहे, कारण श्रीमंत देशांमध्ये केल्या जाणाऱ्या यांत्रिक, सघन दुग्धव्यवसायात कार्बन फूटप्रिंट खूपच कमी आहे. युरोप आणि न्युझीलंड वैगेरेमध्ये त्याबाबत अनेक सख्त उपाययोजना केल्या गेल्या आहेत. हे सारे दुरुस्त करण्यासाठी काय करता येईल? ज्या श्रीमंत राष्ट्रांची वनस्पती-आधारित पर्यायांची भूक कमी होत चालली आहे, त्यांनी पशुधन-आधारित अन्नापासून दूर जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करायला हवा.
दुधासाठी सध्या जग श्रीमंत देशांवर अवलंबून
दुग्धजन्य उत्पादन टिकवून ठेवण्याच्या आपल्या मर्यादित क्षमतेचा बराचसा भाग अजूनही श्रीमंत देशांवर अवलंबून आहे, तेही आता पुरवठा करून थकले आहेत, कारण जगभरात आपण आता शरीरसौष्ठव पूरक प्रोटीन वैगेरे आहारांसारख्या चैनीच्या वस्तूंसाठी, मूलभूत पोषणासाठी जितके दुध वापरले जाते, तितक्याच दुधाचा वापर करू लागलो आहोत. चीन आणि ब्राझीलसारखे तुलनेने समृद्ध विकसनशील देश अधिक सघन डेअरी उद्योगाकडे वळून त्यांची स्थिती सुधारू शकतात. जर त्यांनी विकसित जगाच्या पातळीपर्यंत उत्पादन वाढवले, तर ते त्यांच्या सध्याच्या दुग्धव्यवसायाच्या एक तृतीयांश इतक्याच भागावर व्यवस्थित अंतर्गत गुजराण करू शकतील.
सर्वात मोठया दुग्ध उत्पादक भारतात काय स्थिती?
सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश असलेल्या भारतात, त्याचे फायदे आणखी जास्त असू शकतात. गायींचे उत्पादन थांबल्यानंतर त्यांची कत्तल करण्यावर धार्मिक आक्षेप असल्याने, भारतात पाच दशलक्षाहून अधिक भटकी गुरे रस्त्यावर फिरत आहेत, ते रोग पसरवत आहेत, लोकांवर हल्ला करत आहेत, वाहतुकीला अडथळा आणत आहेत आणि बळीही पडत आहेत. त्यातून झुंडशाही, संघटित गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे आक्षेप आहेत. लहान, अधिक सघनतेने वाढवलेला कळप या गोवंशीय साथीचे प्रमाण कमी करेल. म्हशींचे दूध उत्पादन वाढेल, त्या तशाही आधीच भारतातील एकूण दुधाच्या निम्मे उत्पादन करतात. तरीही त्यांना गायीइतके पवित्र मानले जात नाही. तथापि, एक गोष्ट निश्चित आहे: भारतात दुधाचा कार्बन फूटप्रिंट कमी करायचा असेल, तर समस्या लगेचच दूर होईल अशी आशा करण्याऐवजी सरकारला ते अधिक कार्यक्षमतेने करावे लागेल.
दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 24 ऑगस्टला..