• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शिरसोली जळगांवचे कॅलिफोर्निया

Team Agroworld by Team Agroworld
September 23, 2019
in यशोगाथा
0
शिरसोली जळगांवचे कॅलिफोर्निया
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


केळी ,कापूस,कडधान्यव तेलबिया ही पारंपारिक पिके जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अर्थनीती ठरवित आलेली आहे. परंतु सतत होणारी नापिकी, भावातील अनिश्चितता तसेच पिकावर येणारे कीड व रोगामुळे फवारणी वर होणारा अमाप खर्च व मजुरी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित बिघडून तो कर्जाच्या फेर्‍यात अडकला आहे. या सर्व अडचणीना जळगावपासून अवघ्या 10 की. मी अंतर असणार्‍या शिरसोली येथील शेतकर्‍यांनी परिपूर्ण शास्वत असा पर्याय फुल शेतीच्या माध्यमातून शोधला आहे.


आजमितीला गावात 400 एकर क्षेत्रावर फूल शेती बहरली आहे त्यामुळे अल्पवधीत या गावाची ओळख जळगाव जिल्ह्याचे कॅलिफोर्निया अशी झाली आहे. 25000 लोकसंख्या असलेल्या गावातून दरोराज सरासरी 10 पीक अप गाडी माल हा बाहेर गावी पाठविला जातो.तो साधारणपणे पुणे, सुरत, नवसारी, बडोदा, दादर या ठिकाणी विक्रीसाठी जातो तसेच अल्पभूधारक शेतकरी त्यांचा माल हा स्थानिक जळगांव बाजारपेठमध्ये विक्री करतात. त्यामुळे आज पूर्ण गाव जवळपास फूलशेती च्या माध्यमातून प्रगती करीत आहे.
इतर शेतकर्‍यांप्रमाणेच येथील श्री नारायण विठ्ठल बारी यांनी यांनी पूर्वापार चालत आलेल्या पिक पद्धतीला फाटा देत सन 2001 पासून फुल शेतीला सुरुवात केळी . आज रोजी त्यांची संपूर्ण 2.5 एकर जमीन हि फक्त फुल शेती खाली आहे.व याकामी त्यांना त्याच्या पत्नी सौ भारती जळगांव येथे शिक्षण घेत असलेला मुलगा जयेश मुलगी प्रियांका व स्नेहल हे आपल शिक्षण सांभाळून शेतात शक्य ती मदत करतात.त्यांच्या शेतात प्रमुख्याने गुलाब व शेवंती हि प्रमुख पिक आहेत. बारी यांनी वर्षभर बाजारात गरज असणार्‍या पिकासाठी नियोजन केले आहे.त्यासाठी त्यांनी गुलाब व शेवंती सोबतच झेंडू (कलकत्ता), मोगरा, निशिगंधा, बिजली, कामिनी, अशा सुमारे 6-7 फुल पिकांची निवड केली आहे. बारी यांची जमीन साधारणपणे हलकी ते मध्यम स्वरुपाची आहे दोन्ही शेतांच्यामध्ये नाला गेला असल्याने तो भाग पडीत आहे. वडिलोपार्जित विहिरीला पाणी कमी असल्याने त्यांनी 500 फुट खोल बोअर केली आहे उन्हाळ्यातील पाणी टंचाई च्या वेळी ते पाणी विहिरीत टाकून पिकांची गरज भागवली जाते .
मार्गदर्शन व शासन मदत- अल्प भूधारक असलेल्या नारायण बारी यांना कृषी विभागाचे उल्हासराव पाटील व कमलेश पवार या कृषी सहाय्यकाचे तसेच व गावातील नर्सरी मालक बळीराम बारी यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.संपूर्ण शिरसोली गावात कृषी विभागामार्फत सुमारे 70 ते 80 बांध बंदिस्ती करून नाला खोलीकरणद्वारे गावातील पाणी गावातच मुरविल्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीवर बर्याच प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच गावातील शेतकर्‍यांना खउठ पुणे व नागपूर याठिकाणी प्रशिकक्षणासाठी पाठविले जाते तसेच फुललगावड वाढण्यासाठी त्यांना अनुदान तत्वावर रोपे, औषधी, ठिबक सिंचन यंत्रणा इ. पुरविली जातात या योजनांचा लाभदेखील बारी यांनी घेतला आहे. कृषी विभाग व गावातील नर्सरीचालक हे सतत चर्चासत्र आयोजित करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत असतात.
लागवड व नियोजन
बारी यांनी त्यांना लागणारी सर्व फुलांची रोपे ही गावात असलेल्या जनाई फ्लावर नर्सरी येथून खरेदी करतात. त्यांचे मुख्य पिक हे गुलाब व शेवंती असल्याने त्यांनी त्यांचे क्षेत्र जास्त लागवडी खाली ठेवले आहे.
शेवंती हे आठ महिन्याचे पिक असून साधारण चार महिन्यानंतर प्रत्यक्ष उत्पन्नाला सुरुवात होते. त्याची लागवड त्यांनी सरी पद्धतीने केली आहे त्यासाठी एकरी 4 ते 4.5 हजार रोपे लागली. त्याचप्रमाणे गुलाबाची सुमारे 4000 हजार रोपे जोड ओळ पद्धतीप्रमाणे लागवड करण्यात आली. गुलबामध्ये आंतरपिक म्हणून निशिगंधा लागवड करून कोणत्याही प्रकारचे क्षेत्र हे बारी यांनी खाली ठेवले नाही. इतर भागावर त्यांनी विविध प्रकारची फुलझाडे लावली आहे. शेताच्या मधोमध नाला असल्यामुळे त्या बांधावर त्यांनी कुंदकली व काफरी यासारखी बांधावर येणारी फुलझाडे लावली आहेत.
वर्षभर पुरवठा होण्यासाठी बारी खालीलप्रमाणे
पिकांची लागवड करतात
मे झेंडू जून शेवंती
जुलै गुलाब सप्टेबर झेंडू

याप्रमाणे इतर फुलपिकांचे नियोजन करून वर्षभर मार्केट मध्ये पुरवठा होईल याचे काळजी घेतात.
अंतर मशागत करताना पिकात कमीत कमी तण राहील यासाठी दर 20 दिवसांनी तण निर्मुलन करून कीड व रोगराई टाळण्यासाठी प्रत्येकी 15 दिवसांनी फवारणी केली जाते.पाणी कमी असल्यामुळे त्यांनी कृषी विभागाच्या साह्याने संपूर्ण क्षेत्रात ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला आहे त्यामुळे अती पाण्यामुळे होणारे नुकसान टाळले जाते व त्यामुळे खत सुद्धा पाण्यातून दिले जातात.
कीड व रोगनियंत्रण
अति तीव्र वारा व उष्णतेमुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी शेताच्या पूर्व पश्चिमेला जैविक कुंपण तयार केलेलं आहे. त्यामुळे त्यांना बराच फायदा झाला आहे. दर 15 दिवसांनी तण काढणी केली जाते प्रत्येक 8 दिवसांनी बुरशीनाशक व गरजेनुसार किटकनाशक फवारणी केली जाते. इतर परांपरिक पिकाप्रमाणे यावर मोठ्या प्रमाणात अळी व इतर कीटकांचा प्रभाव होत नसला तरी खबरदारी म्हणून बुरशीनाशक फवारणी केली जाते.संपूर्ण शेतात ठिबक सिंचन असल्यामुळे पूर्ण पिकाला विद्रव्य खते दिली जातात.
आंतर पिके :- एकाच फुलाची मार्केट मध्ये आवक आल्यास नुकसान भरपाई होते. ती भरून काढता यावी यासाठी बारी यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर येणारी फुलझाडे लावली असून नाल्याच्या बांधाने बोर, पेरु, हदगा, रामफळ,आंबा याची लागवड केली आहे.त्यामुळे एका पिकापासून होणारे नुकसान हे दुसर्या फूलपिकामधून भरून निघते व परांपरिक पिकाप्रमाणे होणारी हानी त्यांना या फूलपिकमुळे होत नाही.
विक्री नियोजन :- नारायण बारी यांना संपूर्ण फुल शेतीमध्ये त्यांची पत्नी ही महत्वपूर्ण मदत करीत असते. त्यांचा दिनक्रम साधारणपणे सकाळी 5 वाजता सुरु होतो सकाळी ते 5 ते 6 फुलांची तोडणी करतात रात्री फुल तोडणी साठी अंधारात हेड ल्याँम्प असलेली टोपी वापरली जाते. तोडलेल्या फुलांची प्रतवारी व प्याकिंग ही 6 ते 7 दरम्यान करून तयार फुले कृषि उत्पन्न बाजार समिति साठी रवाना केली जातात. 7 ते 7.30 दरम्यान आलेल्या मालाचा लिलाव करून सुमारे 10 वाजेपर्यंत शेतकर्यांच्या हातात रोख स्वरुपात पैसे मिळतात. गुलाब व शेवंती या दोन्ही प्रकारच्या फुलाच्या माध्यमातून आज त्यांचे अर्थकारण चालत आहे.
अर्थकारण : गुलाब लागवड साठी प्रती रोप 18 ते 20 रु प्रमाणे 4000 रोपे लागतात एकदा लागवड केलेला गुलाब हा साधारणत: 5 ते 6 वर्ष चालतो बाजारात सरासरी 100 ते 150 रु शेकडा याप्रमाणे त्याची विक्री होते. वर्षभरात साधारणपणे 2 ते 2.75 लाख रु या माध्यमातून त्यांना मिळतात त्यातून 50 % खर्च हा मजुरी ,आंतरमशागत,खते फवारणी तसेच वाहतूक यासाठी धरल्यास त्यांना 1.25 लाख रु एकरी निव्वळ नफा गुलाबापासून मिळतो शेवंती ची एकरी 4. ते 4.5 हजार रोपे प्रती रोप 1.50 रु याप्रमाणे लागवड साठी लागले एकरी उत्पन्न 25 ते 30 क्विंटल मिळते सरासरी 45 ते 50 रु किलो भाव मिळतो त्यामुळे सरासरी खर्च वजा जाता यापासून 115000/- रु मिळतता. असे सर्व फूलपिकांच्या माध्यमातून 2.5 ते 3 लाख रु हमीचे उत्पन्न मिळते.

फूलशेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी कृषि विभागामार्फत अनुदान तत्वावर रोप, औषधी व ठिबक सिंचन संच पुरविला जातो. गावात कोणतीही मोठी नदी नसल्याने पाण्याचा शाश्वत असा स्रोत नव्हता त्यामुळे पूर्ण शिवारामध्ये नाला खोलीकरण व बांध बांदिस्तीच्या माध्यमातून पाणी अडवून पानाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ केली. शेतकर्‍यांना फुलशेतीचे बारकावे व नवनवीन तंत्र माहीत व्हावे यासाठी वेळोवेळी चर्चा सत्र व अभ्यास दौरे केले जातात. व शेतकर्‍यांना प्रशिक्षणासाठी खउठ पुणे व नागपुर येथे पाठविले जाते. यामुळेच परिसरातील जवळपास 400 एकर जमीन आज फुलशेती खाली आली व शेतकर्‍यांना बारा महिने हमीचे उत्पन्न मिळाले.

उल्हासराव पाटील
कृषि सहायक मो. क्रं. 7378689781

गावात 2001 पासून फुलशेतीला मोठ्याप्रमाणात सुरुवात झाली. सुरूवातीला शेतकरी पुणे व गुजरातमधील नर्सरीमधून रोपे आणून लागवड करीत असत. त्यामुळे त्याच्या वाहतूक खर्चात मोठी वाढ होत असे. तसेच त्यांना मार्गदर्शनासाठी काही सुविधासुद्धा उपलब्ध नव्हती. आता आम्ही जवळपास शेवंतीच्या 150 प्रजातीपैकी मागणीनुसार व इतर गुलाब, झेंडू, मोगरा, निशिगंधा, बिजली, कामिनी, लिली व इतर अशा जवळपास 15 विविध फुलपिकांचे रोपे व त्यांचे लागवड पश्चात मार्गदर्शन व चर्चासत्र आम्ही आयोजित करीत असतो

बळीराम बारी
नर्सरी चालक मो. क्रं.9970085337

पूर्वी कापूस व पानमळा ही पिके होती. परंतु आर्थिक स्थिति काही सुधारत नव्हती. 2001 पासून गावातील इतर शेतकरी व कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने प्रयोग म्हणून काही क्षेत्रावर फुल लागवड केली. यात आता चांगला जम बसल्यामुळे फुलशेतीमधील उत्पन्नावर आज 1200 स्के. फुट स्वतःचे सिमेंटचे घर तयार केले व मुलांच्या शिक्षणास सुद्धा हातभार लागत आहे. आज रोजी अल्पभूधारक असलो तरी सरासरी आज 1 हेक्टर जमिनीतून 2.5 ते 3 लाख रु निव्वळ नफा मिळत आहे.

नारायण विठ्ठल बारी
शेतकरी मो. क्रं.9623339917

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कामिनीगुलाबझेंडूनिशिगंधाबिजलीमोगरालिली
Previous Post

शेळ्यांना पावसाळ्यात होणारे रोग व घ्यावयाची काळजी…

Next Post

पावसाचा जोर पुन्हा वाढणार !

Next Post
पावसाचा जोर पुन्हा वाढणार !

पावसाचा जोर पुन्हा वाढणार !

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.