मुंबई : राज्यात गेले 3-4 दिवस पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर कुठे रिपरिप तर कुठे नुसतेच ढगाळ वातावरण आहे. कोकण व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी कायम आहे. राज्यात बहुतांश नद्यांना पूर आला आहे. याशिवाय, सखल भागात पाणी भरणे, वाहतूक कोंडी, मार्गावर पाणी, डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका आहे. राज्यात आज 4 जिल्ह्यात रेड तर दहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, संभाजीनगरसह राज्यभराची स्थिती आपण जाणून घेऊया.
निर्मल रायझामिका 👇
मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबईसह ठाण्यात गेल्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरूच राहिला आहे. काही ठिकाणी 200 मिमीच्या जवळपास तर अनेक भागात 100 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. आजही पावसाचा हा जबरदस्त ट्रेंड चालू राहण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचा आणि पर्यटन टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महाबळेश्वरमध्ये 314.8 मिमी तर लोणावळ्यात 280.5 मिमी पाऊस बरसला.
“आयएमडी”ने जाहीर केलेले आज, 20 जुलै रोजी दिवसभरासाठीचे पूर्वानिमानित जिल्हानिहाय अलर्ट
रेड अलर्ट (अति मुसळधार पाऊस) : पालघर, रायगड, पुणे, सातारा.
ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस) : ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ.
यलो अलर्ट (चांगल्या पावसाची शक्यता) : उर्वरित विदर्भ (ऑरेंज अलर्टचे 3 जिल्हे सोडून), जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर व जालना सह उर्वरित मराठवाडा (ग्रीन अलर्टचे 2 जिल्हे सोडून).
ग्रीन अलर्ट (पावसाचा कोणताही विशेष इशारा नाही; रिमझिम, हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस शक्य) : सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, अहमदनगर.
“आयएमडी”च्या अपडेटेड निरीक्षणानुसार, आता पुढील चार तासांसाठीची जिल्हानिहाय अलर्ट स्थिती
रेड अलर्ट : सध्या कुठेही नाही.
ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव.
यलो अलर्ट : रत्नागिरी, सातारा, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, वाशिम, नागपूर.
ग्रीन अलर्ट : सांगली, अहमदनगर, पुणे, *नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा.
आज, 20 जुलै रोजी दिवसभरात अपेक्षित पुर्वानिमानित जिल्हानिहाय पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या अनुमानानुसार, येत्या 24 तासात अपेक्षित पाऊस (गुरूवार, 20 जुलै सकाळी 8:30 ते शुक्रवार, 21 जुलै सकाळी 8:30) –
जळगाव – 16 मिलिमीटर, नाशिक – 38 मिमी, नंदुरबार – 20, धुळे – 15, पुणे – 35, अहमदनगर – 20, छत्रपती संभाजीनगर – 7, जालना – 7, ठाणे – 60, पालघर – 60, रायगड – 75, रत्नागिरी – 65, सिंधुदुर्ग – 55, बुलडाणा – 32, अकोला – 23, अमरावती – 67, गडचिरोली – 46, गोंदिया – 116, चंद्रपूर – 123, भंडारा – 119, नागपूर – 71, वर्धा – 29, वाशिम – 30, यवतमाळ – 20, सोलापूर – 10, कोल्हापूर – 40, सांगली – 18, सातारा – 55, परभणी – 8, बीड – 9, हिंगोली – 10, लातूर – 5, नांदेड – 12, धाराशिव – 4 मिमी.