मुंबई : राज्यात अजूनही नियमित मान्सून सक्रिय असून येत्या 48 तासात बहुतांश भागात मुसळधार बरसणार आहे. विशेषत: कोकणासह मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) आज जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर व बीड या 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार
राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता आहे. सध्या राजस्थानच्या निम्म्याहून अधिक भागातून मान्सून परतला आहे. गुजरातच्याही बऱ्याच भागातून आणि पंजाब, हरियाणाच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. 30 सप्टेंबरपासून मध्यप्रदेशातून पाऊस परतण्यास सुरुवात होईल. पुढल्या आठवड्यापर्यंत बिहारमध्ये पाऊस सुरूच राहील. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास मात्र 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे.
नवरात्रीतील गरब्यावर पावसाचे सावट
आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवातील गरब्यावर पावसाचे सावट असणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज 14 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणासह पालघर, ठाणे आणि मुंबईतील काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागातून पुढील तीन-चार दिवसात पाऊस हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे. राज्यातील घाटमाथा परिसर आणि उत्तर महाराष्ट्र तसेच तळ कोकणातला पाऊस मात्र पुढे वाढण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
“या” जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
यादीत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यांसाठी त्या दिवशी ग्रीन अलर्ट.
22 सप्टेंबर 2025
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली
23 सप्टेंबर 2025
धुळे, जळगाव, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.
24 सप्टेंबर 2025
सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
25 सप्टेंबर 2025
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया.
देशभरात आज काय स्थिती?
हवामान खात्याने गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा राज्यात अनेक ठिकाणी आज यलो अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रात सध्या पडणारा पाऊस कशामुळे?
सध्या महाराष्ट्रावरील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाला असला, तरी पश्चिम बंगालच्या खाडीत नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या दिशेने जोरदार वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. त्यातून 25-26 सप्टेंबर रोजी पुन्हा चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच येत्या 48 तासांत मराठवाड्यात, तर 24 ते 27 सप्टेंबरदरम्यान विदर्भात अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- पावसामुळे राज्यातील 18 लाख हेक्टरवरील शेतीचे अब्जावधींचे नुकसान!
- राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीला सुरुवात; राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचा मुक्काम..! पहा राज्यासह जिल्हानिहाय अंदाज